Sunday, October 20, 2019

म्हणौनि भलतेणे ऐथ सद्भावे नाहावे /प्रयाग माधव विश्वरूप पाहावे / येतुलेनी संसारासि ध्यावे  तिलोदक //१०//अ ११

म्हणून या त्रिवेणीसंगमात  हवे  त्याने आस्तिकबुद्धीने स्नान करून, जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात , तसे येथे विश्वरूप माधवा चे दर्शन घ्यावे , अशा रीतीने संसाराला तिलांजली ध्यावी 

Saturday, October 19, 2019

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक  शंकर वामन दांडेकर 

निवडक ओव्या 

माजी गीता सरस्वती गुप्त/ आणि दोन्ही रस ते ओघ मूर्त / यालागी  त्रिवेणी हे उचित फावले बाप //७// अ ११ 

ज्या प्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांच्या ओघानंचा  संगम झाला आहे , त्या प्रमाणे या 
अध्यायात शांत व अद्भुत या दोन रसांचा मिलाफ़ होऊन , अकरावा अध्याय हा प्रयाग क्षेत्रच ,बनला आहे म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते . 


Thursday, October 17, 2019

मिया इहीच दोन्ही डोळा / झोम्बा वे विश्वरूपा सकळा / एवढी हाव तो  दैवआगळा //म्हणुनी करी//३२//अ १०श्लोक ४२

मी याच दोन डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून तो करीत होता . 

Tuesday, October 15, 2019

म्हणे हेचि  हृदयआतुली प्रतीती / बाहेरी अवतरो का डोळ्याप्रती / इये आरतीचा पाऊली मती  उठती  झाली //३१//अ १० श्लोक ४२

अर्जुन आपल्याशी  असे म्हणावयास लागला कि, (हा सर्व  विश्वात एक भगवंटाचे स्वरूप व्याप्त आहे) माझ्या अंतःकरणातील अनुभव माझ्या बाह्य दृष्टी ला दिसावा , अशा इच्छेच्या प्रवृत्ति ने माझ्या बुद्धीने  उचल घेतली . 

Tuesday, September 24, 2019

आता पै माझेनि एके  अंशे / हे जग व्यापिले  असे / यालागी भेदू    सांडूनि  सरिसें  साम्ये  भज //१७// श्लोक ४२ अ १०


माझ्या  एकाच अंशाने  हे  जग  व्यापलेले आहे ; याकरीता  भेदभावना  टाकून  ऐकदृष्टीने मला  सर्व ठिकाणी         
सारखे  भज .     

Friday, September 20, 2019

Nitya Path  पाठ :

ऊँ नमोजी आद्या /                                      
वेदप्रतिपाद्या /
जय जय स्वसंवेद्या /
देवा तूंची गणेश /
आत्मरुपा //1// 

सकलमतीप्रकाश /
म्हणे निवृत्तीदास /
अवधारिजो //२//

आता अभिनववाग्विलासिनी /
जे चातुर्यार्थकलाकामिनी /
ते श्रीशारदा विश्वमोहिनी /
नमिली मियां //३//

मज हृदयी सदगुरू /
जेणें तारिलो हा संसारपूरू/
म्हणौनि विशेषे अत्यादरू /
विवेकावरी /४//

या उपाधीमाजी गुप्त /
चैतन्य असे सर्वगत /
ते तत्त्वज्ञ संत/
स्वीकारिती //५//

उपजे तें नाशे /
नाशले पुनरपि दिसे /
हें घटिकायंत्र तैसें /
परिभ्रमे गा //६//

जैसे मार्गे चि चालता /
अपावो न पवे सर्वथा /
कां दीपाधारेवर्ततां / 
नाडळिजॆं //७//

तयापरी पार्था /
स्वधर्मे राहाटता /
सकाळकामपूर्णता /
सहजें होंय //८//

सुखी संतोषा न यावे /
दुखी विषादा न भजावे /
आणि लाभालाभ न धरावे /
मनामाजी / 9/

आपणयां उचिता /
स्वधर्मे राहाटतां /
जें पावेतें निवांता /
साहोनि जावे //१०/
  
आम्ही हि विचारि लें / 
 तंव ऐसे चि हे मना आले / 
जे न सांडिजे तुवां आपुलें /
विहित कर्म //११/

/परि कर्मफळी आस न करावी /
आणि कुकर्मी संगति न व्हावी /
हे सत्क्रिया चि आचरावी /
हेतुविन //१२//

तूं योगयुक्त होऊनी /
फळाचा संग टाकुनी /
मग अर्जुना चित  देऊनी /
करी कर्मे //१३//

परि आदरिले कर्म दैवें /
जरी समाप्ती ते पावे /
तरी विशेषे तेथ तोषावें /
हे हे नको //१४//
की निमित्ते कोणे एके /
तें सिद्धीन वचतां ठाके /
तरी तेथिचेनि अपरितोखें /
 क्षोभावे ना //१५//

 देखे जेतुलाले कर्म निपजे /
तेतुलें आदिपुरुषी अर्पिजे / 
तरी परिपूर्ण सहजे / 
जाहलें जाण //१६//

म्हणौनी जें जें उचित / 
आणि अवसरेकरूनि प्राप्त / 
ते कर्म हेतुरहित / 
आचरे तूं //१७//

देखे अनुक्रमाधारे /
स्वधर्म जो आचरे /
तो मोक्ष तेणें व्यापारे /
निश्चित पावे //१८//

स्वधर्म जो बापा / 
तो नित्ययज्ञ जाण पां / 
म्हणौनी वर्ततां तेथ पापा / 
संचारू नाहीं //१९//

हा निजधर्म जैं सांडे / 
आणि कुकर्मी रति घडे / 
तैं चि बंध पडे /
 संसारिक //२०//

म्हणौनी स्वधर्मानुष्ठान /
ते अखंड यज्ञ याजन /
जो करी तया बंधन /
काही ची  न घडे //२१//


अगा  जया जें विहित /
तें ईश्वराचे मनोगत /
म्हणौनि केलिया निभृंत /
सापडे ची तो //२२//


ते विहित कर्म पांडवा /
आपुला अनन्य वोलावा /
आणि हे चि परम सेवा /
मज सर्वात्मकाची //२३//

तया सर्वात्मका ईश्वरा /
स्वकर्मकुसुमांची वीरा /
पूजा केली होय अपारा /
तोषालागी //२४//

ते क्रिया जात आघवे / 
जे जैसे निपजेल स्वभावे / 
ते भावना करोनि करावे / 
माझिया मोहरा //२५// 

आणि हे कर्म मी कर्ता / 
कां आचरेन या अर्था / 
ऐसा अभिमान झणे चित्ता /

रिगो देसी //२६//

तुवां शरीरपरा नोहावें /
कामनाजात सांडावे  /
मग अवसरोचित भोगावे /
भोग सकाळ //२७//

तुं मनसा नियम करीं /
निश्चळु होय अंतरी / 
मग कर्मेंद्रिये व्यापारु / 
वर्ततु सुखे //२८//

परिस पां सव्यसाची  / 
मूर्ती लाहोनि देहाची /
खंती करती कर्माची /
ते गावंढे //२९//


देख पां जनकादिक / 
कर्मजात अशेख /
न सांडीत मोक्क्षसुख /
पावते जाहले //३०//


देखे प्राप्तार्थ जाहले/ 
ते निष्कामता पावले / 
तयाही कर्त्तव्य असे  उरले /
लोकालागी //३१//

 
मार्गी अन्धासरिसा /
पुढे देखणाही चाले  जैसा / 
अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा / 
आचरोनी //३२//

एथ वडील जें जें करिती / 
तया नाम धर्म ठेविती /
ते ची येर अनुष्ठिती /
सामान्य सकळ //३३//
हें ऐसें असे स्वभावें /
म्हणौनि कर्म न संडावे / 
विशेषे आचरावे  /
लागे संतीं  //३४//

दीपाचेनि प्रकाशे /
गृहीचे व्यापार जैसे / 
देही कर्मजात तैसें / 
योगयुक्त //३५//

तो कर्मे करी सकळें / 
परी कर्मबंधा नाकळे / 
जैसें न सिंपे जळी जळें / 
पद्मपत्र //३६//

तयाही देह एक कीर आथी /
लौकिकी सखदुखी तयात म्हणती /
परी आम्हाते ऐसी प्रतीति /
परब्रह्म ची हां //३७//

 देह तरी वरिचीलीकडे / 
आपुलिया परी हिंडे /
परी बैसका न मोडे /
मानसीची //३८//

अर्जुना समत्व चित्ताचे /
तेची सार जाण योगाचे /
जेथ मन आणि बुद्धीचे /
ऐक्य आथी //३९// 

देखे अखंडित प्रसन्नता /
आथी जेथ चित्ता /
तेथ रिगणे नाही समस्ता /
संसारदुःखां//४०//

जैसे अमृताचा निर्झरु /
प्रसवे जयाचा जठरु /
तया क्षुधेतृषेचा अडदरू /
कहीचि नाही //४१//

तैसे हृदय प्रसन्ना होये /
तरी दुख कैचे के आहे /
तेथ आपैसे बुद्धी राहे /
परमात्मरूपी //४२//

जैसा निर्वातीचा दीपु /
सर्वथा नेणे कंपु /
तैसा  स्थिरबुद्धी  स्वस्वरूपु /
योगयुक्त //४३//

जया पुरुषांचा ठायी /
कर्माचा तरी खेदु नाही /
आणि फलापेक्षा काही /
संचरेना //४४//
आणि हे कर्म मी करीन / 
अथवा आदरिले सिद्धी नेईन /
येणे संकल्पेही जयाचे मन /
विटाळेना //४५//
ज्ञानाग्नीचेनि मुखे /
जेणे जाळिली कर्मे अशेखे /
तो परब्रह्मचि मनुष्यवेखें /
वोळख तूं //४६//

ते ज्ञान पैं गा बरवें /
जरी मनी आथी जाणावें /
तरी संतां यां भजावें /
सर्वस्वेंसीं //४७//

जे ज्ञानाचा कुरुठा /
तेथ सेवा हा दारवंटा /
तो स्वाधीन करी सुभटा /
वोळगोनी //४८//
तरी तनुमनु जीवें /
चरणासी लागावें /
आणि अगर्वत्ता करावें /
दास्य सकाळ // ४९//

मग अपेक्षित जे आपुलें / 
तेही सांगति पुसिलें / 
जेणें अन्तःकरण बोधले / 
संकल्पा न ये //५०// 

ते  वेळी आपणपेयां सहिते /
इये अशेषेही भूतें /
माझ्या स्वरूपीं अखंडितें /
देखसी तूं //५१//
ऐसें ज्ञानप्रकाशे पाहेल / 
ते मोहांधकारू जाईल / 
जैं गुरुकृपा होईल / 
पार्था गा //५२//
जरी कल्माशाचा आगरु /
तूं भ्रांतीचा सागरू /
 व्योमोहाचा डोंगरु /
होऊन अससी //५३//

तरी ज्ञानशक्तीचेनि पाडें /
हें आघवें चि गां थोकडें /
ऐसे सामर्थ्य असे चोखडे /
ज्ञानी इये //५४//

मोटके गुरुमुखे उदैजत दिसे /
 हृदयी स्वयंभची असे /
प्रत्यक्ष फावो लागे तैसे /
आपैसायाचे //५५//

सांगे अग्नीस्तव धूम होये /
 तिये धूमीं काय अग्नी आहे /
तैसा विकारु हा मी नोहें /
जरी विकाराला असे //५६//

देह तंव पांचाचे जालें /
हें कर्माचे गुणी  गुंथले /
भंवतसे चाकीं सूदलें /
जन्ममृत्यूच्या //५७//

हे काळानळाच्या तोंडी /
घातली लोणियांची उंडी /
माशी पांख पाखडीं /
तंव हे सरे //५८//

या देहाची हे दशा /
आणि आत्मा  तो एथ ऐसा /
पै नित्य सिद्ध आपैसा  /
अनादिपणे //५९//

सकळ ना निष्कळु /
अक्रीय ना क्रियाशीलु /
कृश ना स्थूलु /
निर्गुणपणें //६०//

आनंद ना निरानंदु /
एक ना विविधु /
मुक्त ना बद्धु /
आत्मपणें //६१//

तें परमतत्व पार्था /
होती ते सर्वथा /
जे आत्मानात्मव्यवस्था /
राजहंस //६२//
ऐसेनि जे निजज्ञानि /
खेळत सुखे त्रिभुवनी /
जगद्रूपा मनीं /
सांठऊनि मातें //६३//

हे विश्वचि माझे घर /
ऐसी मती जयाची स्थिर /
किम्बहुना चराचर  /
आपण जाहला //६४//
मग याहीवरी पार्था /                                     
माझिया भजनी आस्था /
तरी तयातें मी माथां /
मुकुट करीं //६५//

तो मी वैकुंठी नसें /
वेळु एक भानुबिम्बी न दिसें /
वारी योगीयांचीही मनसें/
उमरडोनि जाय //६६//

परी तयापाशी पांडवा /
मी हारपला गिंवसावा / 
जेथ नामघोषु बरवा /
करिती माझा //६७//

कृष्ण  विष्णु  हरि  गोविन्द /
या नावाचे निखळ प्रबंध /
माजी आत्मचार्चा विषध /
उदंड गाती //६८/

जयाचिये वाचे माझे आलाप /
दृष्टी भोगी माझे ची रूप /
तयाचे मन संकल्प /
माझा ची वाहे //६९//

माझिया कीर्तीविण /
जयाचे रिते नाही श्रवणं /
जया सर्वांगी भूषण /
माझी सेवा //७०//

ते पापायोनीही होतु का /
ते श्रुताधीतही न होतु का /
परी मजसी तुकिता तुका /
तुटी नाही  //७१//

ते चि भलतेणे भावें /
मन मत आंतु येते होआवे /
आलें तरी आघवें /
मागील वावो //७२//

जैसे तव चि वहाळ वोहळ /
जंव न पवती गंगाजळ /
मग होऊनी ठाकती केवळ /
गंगारूप //७३//

तैसे क्षत्री  वैश स्त्रिया  /
कां शुद्र अंत्यजादी इया /
जाती तव चि वेगळालिया /
जाव न पवती मातें //७४//


 यालागी पापयोनीही अर्जुना /
कां वैष शुद्र अंगना /
माते भजतां सदना /
माझिया येती //७५//

पैं भक्ती एकी मी जाणें /
तेथ सानें थोर न म्हणे /
आम्ही भावाचे पाहुणे / 
भलतेया //७६//

येर  पत्र पुष्प फळ /
हे भजावया मिस केवळ / 
वाचुनी आमुचा लाग निष्कल / 
भक्तितत्त्व //७७//

मग भूते हे भाष विसरला /
जे दिठी मी चि आहे सूदला / 
म्हणौनि निर्वैर झाला / 
सर्वत्र भजे //७८//

हे समस्थही श्रीवासुदेव /
ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भाव /
म्हणोनि भाक्तामाजी राव /
आणि ज्ञानिया तो चि //७९ //

तुं मन हे मीचि करी /
माझिया भजनी प्रेम धरी /
सर्वत्र नमस्कारी /
मज एकाते //८०//

माझेनि अनुसंधाने देख /
संकल्पु जाळणे निःशेख /
मध्याजी चोख /
याची नाव//८१//

ऐसा मियां आथिला होसी /
तेथ माझीयासी स्वरुपा पावसी /
हें अंतःकरणीचे तुजपासी /
बोलिजत असे //८२//

तू मन बुद्धी साचेसी / 
जरी माझिया स्वरूपी अर्पिसी / 
तरी मते जी गा पावसी /
हे माझी भाक //८३//

अथवा हे चित / 
मनबुद्धीसहित  /
माझ्या हाती अचुंबित /
न शकसी देवो //८४//
तरी गा ऐसें करी / 
यया आठा प्राहारामाझारी / 
मोटके निमिषभरी / 
देतु जाय //८५//

मग जें जें का निमिख /
देखेल माझें सुख /
तेतुले आरोचक / 
विषयीं घेईल //८६//

 पुनवेहुनी जैसे /
शशी बिंब दिसें  दिसें /
हारपत अंवसें / 
नाही चि होये  //८७//

 तैसे भोगाआंतूनि  निगता / 
चित मजमाजी रिगता  / 
हळू हळू पंडुसुता / 
मिची होईल //८८//

म्हणौनी अभ्यासासी काहीं / 
सर्वथा दुष्कर नाही /
यालागीं माझ्या ठायीं / 
अभ्यासें मीळ //८९//  

कां जे यया मनाचें एक निकें /
जें देखिले गोडीचिया ठाया सोके / 
म्हणौनी अनुभवसुखचि  कवतिके / 
दावित जाइजे //९०//

बळियें इंद्रियें येती मना / 
मन ऐकवते पवना / 
पवन सहजे गगना /
मिळोची लागे //९१//

ऐसे नेणो काय आपैसे /
तयातेचि कीजे अभ्यासें /
समाधि घर पुसे /
मानसाचे //९२//

ऐसा जो कामक्रोध लोभा / 
झाडी करुनी ठाके उभा / 
तोची येवढिया लाभा / 
गोसावी होय //९३//


पाहे पां ॐ तत्सत् ऐसे /
हें बोलणें तेथ नेतसे /
जेथुनी का हें  प्रकाशे /
दृश्यजात //९४//


 सुवर्णमणि सोनया /
ये कल्लोळु जैसा पाणिया /
तैसा मज धनंजया /
शरण ये तुं // ९५//
म्हणौनी मी होऊनी मातें /
सेवणें आहे आयितें /
तें करीं हाता येतें /
ज्ञानें येणें //९६//

यालागी सुमनु आणि शुद्धमती / 
जो अनिंदकु अनन्यगति / 
पैं गा गौप्यही परी तया प्रती /
चावळिजे सुखे //९७//


तरी प्रस्तुत आता  गुणीं इहीं /
तू वाचून आणिक नाही / 
म्हनौनी गुज तरी तुझ्या ठायी /
लपवू नये // ९८//

ते हे मंत्ररहस्य गीता / 
मेळवी जो माझिया भक्ता / 
अनन्यजीवना माता /
बळका जैसी //९९//      
तैसी भक्तां   गीतेसी /
भेटी करी जो आदरेसी /
तो देहापाठीं मजसी / 
एकचि होय //१००//

ऐसे सर्व रूपरूपसें / 
सर्व दृष्टीडोळसे / 
सर्वदेशनिवासे / 
बोलिले श्रीकृष्णे //१०१// 

हे शब्देविण संवादिजे /
इंद्रिया नेणतां भोगिजे /
बोला आदी झोंबिजे / 
प्रमेयासी //१०२/

 जे अपेक्षिजे विरक्ती /
सदा अनुभविजे संती /
सोहंभावे पारंगतीं/
 रमिजे जेथ //१०३ //

हे गीतानाम विख्यात /
सर्व वांग्मया चे मथित/
 आत्मा जेणे हस्तगत /
रत्न होय // १०४ //

वत्साचेनी वोरसे /
दुभते होय घरोदेसे /
जाले पांडवाचेनि मिशे /
जगदुधरण //१०५//


आता विश्वात्मके देवे / 
येणे वाग्यज्ञे तोषवे  / 
तोषोनि मज द्यावें /
 पसायदान //१०६//

जे खळांची व्यंकटी सांडो/
तयां सत्कर्मी रति वाढो  / 
भूता परस्परे पडो / 
मैत्र जीवांचे //१०७//



तेथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो / 
हा होईल दानपसावो / 
हेणें वरे ज्ञानदेवो / 
सुखिया झाला // १०८ //



 भरोनि  सद्भावाची अंजुळी /
मियां वोवियाफुलें मोकळीं /
अर्पिली अन्घ्रीयुगली / 
विश्वरुपाच्या //१०९//

Monday, September 9, 2019

तेवी  माझे विभूती विशेष / जरी जाणो पाहिजेती अशेष / तरी स्वरूप एक निर्दोष / जाणिजे माझे //६२//अ १० श्लोक ६२

त्या प्रमाणे मझ्या मुख्य मुख्य विभूती जर सर्वच जाणण्याची इच्छा असेल तर एक मझेच दोष रहित स्वरूप जाणावे . 

Thursday, August 29, 2019

एर्हवी मी कैसा केवढा / म्हणोनि अपानपयाही नव्हेचि फुडा / यालागी प्रधान जिया रूढा / तिच्या विभूती आइके //११ अ १० श्लोक १९.

खरोखर मी कैसा  व केवढा  आहे , हे माझे मला देखील ठाऊक नाही , म्हणून ज्या मुख्य नामाकीत विभूती आहेत त्या ऐक . 

Monday, August 19, 2019

अंगीचिया रोम किती / जयाचिये तयासी न गाणावती / तैसिया माझिया विभूती / असंख्य मज //२१०// अ १० श्लोक १९

आपल्या अंगावर किती केस आहेत , हे ज्याचे त्याला मोजता येत नाहीत , त्याचप्रमाणे माझ्याच विभूती असून त्यांची गणना मला होत नाही . 

Saturday, August 10, 2019

विषय विषाचा परिपडू / गोड  परमाथु  लागे कडू /विषय तो गोडु / जीवासी जाहला // ५९// अ १० श्लोक १३

विषय रूप विषाचा एवढा मोठा पराक्रम आहे कि,   वस्तुतः गोडं   असलेला पर मार्थ , तो त्या विषयाच्या योगाने कटू वाटू लागतो व स्वाभाविक कडू असलेले शब्दादिक जे विषय ते प्राण्यांना गोड  वाटतात . 

Tuesday, August 6, 2019

जी जन्मलेपण आपुले / हे आजि मि या डोळा देखील / जीवित हाता चढले मज आवडतसे //४६ //अ १० श्लोक ११

महाराज  मी आपला जन्म हा आज डोळ्यांनी पहिला ( आत्मज्ञान होणे  हा  नवा जन्म आहे  व तोआज  माझा झाला ) त्यामुळे माझे जीवित माझ्या हाती आले , असे मला वाटते . 

Tuesday, July 30, 2019

जैसी कमळकळीका  जालेपणे / ह्रदयीचिया मकरंदाते राखू नेणे /दे राय रांका पारणे / आमोदाचे //२७// अ ९

ज्या प्रमाणे पूर्ण उमळलेली कमळाची कळी  हि आपल्या आत असलेला सुवासास  दाबून ठेवू शकत नाही , तर ती राजास अथवा गरिबास सुवासाची (सारखीच) मेजवानी देते . 

Saturday, July 27, 2019

जें जें भेटे  भूतं / ते ते मानिजे भगवंत / हा भक्तियोगु निषचित / जाण माझा // १८  //अ १० श्लोक ८

जो जो प्राणी दिसेल , तोतो प्रत्यक्ष परमात्मा आहेय असे समजावे . हा माझा भक्तियोग आहे असे निष्चित समाज . 

Sunday, July 21, 2019

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 
निवडक ओव्या : 
ऎसींनी जे निजज्ञानी  /  खेळत सुखे त्रिभुवनी /  जगद्रुपा मनी  / साठवूनि  माते //१७// अ १० श्लोक ८

अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले जे आत्मज्ञानी  ते आहेत ते,  मी जो जागद्रुप  त्या मला अंतःकरणात  साठवून   त्रैलोक्यात   अणे क्रीडा  व्यवहार करीत असतात .                                       





Friday, July 19, 2019

उदारीचा गर्भु जैसा / नेणे  मायेची वयसा / देवांसी मी तैसा / चोजवेना //६५// या १० श्लोक २

पोटात असलेल  मूल   ज्याप्रमाणे आईचे वय  जाणत नाही ,  देवांना  माझे ज्ञान  होत नाही . 

Sunday, July 14, 2019

तरी किरीटी तू माते / नेणसी  ना निरुते /  तरी  गा जो मी येथे /  ते विश्व ची हें //६३// अ १० श्लोक १

तरी अर्जुना तू  मला खरोखर जाणत नाहीस ना? (जर जाणत नसल्यास तर सांगतो ) येथे जो मी तुझ्या पुढे उभा आहे तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी म्हणजे हे विश्वच आहे . 

Friday, July 12, 2019

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 

ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या :

ऐके ऐके सुवर्मा / वाक्य माझे परम/ जे अक्षरे लेउनि परब्रह्म / तुज खेवासि  आले //६२// अ १० श्लोक १

तर ऐक मर्मज्ञ अर्जुना , आमचे श्रेष्ट् बोलणे ऐक हे आमचे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांचा अंगरखा घालून तुला आलिंगन देण्यास आले आहे . 

Wednesday, July 10, 2019

अहो अळुमाळ अवधान ध्यावें / येतुलेनी आनंदाचिया  राशीवरी  बैसावें / बाप श्रवणेंद्रिया  दैवें / घातली माळ //३४//अ ९ श्लोक ३४


अहो थोड कैसे  लक्ष  ध्यावे आणि एवढ्याने  आनंदाचा राशीवर बसावे , ध्यन आहे त्या कानाची कि आज त्यास भाग्याने माळ  घातली आहे . 

Monday, July 8, 2019

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 

ऐसा मिया  अथीला  होसी /तेथ माझियाची स्वरूप पावसी / हे अंत :करणीचे तुजपाशी / बोलीजत असें //१९//या श्लोक ३४

या प्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील , तेव्हा मद्रूपास पावशील ; हे माझ्या अंतःकरणातील (गुह्य गोष्ट ) तुझ्या जवळ मी सांगत आहे. 

Sunday, July 7, 2019

माझेनि अनुसंधाने देख  / संकल्पू  जाळणे नि;शेख / मध्यजी चोख / याचि   नांव //१८// अ ९ श्लोक ३४

पाहा  जो  माझ्या  वेधाने संकल्प पूर्णपणे जाळतो , त्यालाच  माझे चांगले भजन करणारा म्हणावे . 

Saturday, July 6, 2019


तूं  मन हे मीचि करीं / माझ्या भजनी प्रेम धरीं /    सर्वत्र  नमस्कारी मज एकाते // १७// अ ९ श्लोक ३४

तूं आपले मन मंद्रूप कर . माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर ; आणि सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे असे समजून मला एकाला नमस्कार कर . 

Friday, July 5, 2019

तरि  झड़झडोनि  वहिला  निघ / इये  भक्तीचीये  वाटे लाग / जिया पावशील  अव्यंग / निज धाम माझे //१६//अ ९ श्लोक ३३

तरी या मृत्यू लोकाच्या राहाटीतून झटकन मोकळा हो , आणि या भक्तीच्या मार्गाला लाग कि , त्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील . 

Wednesday, July 3, 2019

दर्दुरा  सापे  गिळिजतु आहे उभा/ कि तों मासिया वेटाळी जिभा / तैसे प्राणिये  कवणा लोभा / वाढविती  तृष्णा  //१४//

बेडूक सपाकडून उभा गिळला जात असतांना देखील, तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरिता जीभ बाहेर काढून वेताळीत असतो , तशाच तऱ्हेनं  प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवितात .कोण जाणे 

Monday, July 1, 2019

जन्मलिया दिवसादिवसें / हो लगे काळाचियाची ऐसे / कि वाढती करिती उल्हासें /  उभविती गुढिया //२//अ ९ श्लोक ३३

जन्मल्यापासून दिवसेंदिवस   मूल अधिकाधिक काळाच्या तावडीत  जाते . असेअसून (आई बाप  ) आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा करतात व आनंदप्रदर्शन गुढ्याही उभारतात. 
सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन दांडेकर 

जेथ चहूकडे जळत वणवा  / तेथुनि न निगिजे केवी पांडवा / तेवी लोकां येऊनिया सोपद्रवा / केवीं  न भजिजे माते //९२// अ ९ श्लोक ३३

अर्जुना , जेथे चोहोंकडून वणवा लागला आहे , तेथून बाहेर कसे पडू नये ? त्याप्रमाणे अनेक दुःखानी भरलेल्या  या मृत्यूलोकांत  येऊन , मला कसे भाजू नये बरे ?

Sunday, June 30, 2019

अजुनी पाऊलांची  मुद्रा / मी ह्रदयी वाहतेय गा सुभद्रा / जे आपुलिया दैवसमुद्रा / जतनेलागी //८१//९ श्लोक ३३

अर्जुना अजूनपर्यंत (त्या ) पावलांची खूण मी ह्र्दयाच्या ढिकाणी   वागवीत आहे, ती मी का वागवितो म्हणून म्हणशील , तर आपल्या षडगुण ऐश्वर्याभाग्यरूप समुद्राचे रक्षक होण्या करीता .

Thursday, June 27, 2019


सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 

मिया लक्ष्मी डावलोनी केली पारोती / फेडोनी कौस्तुभ  घेतला हाती /मग वोढविली वक्षस्थळांची वाखती / चरणरजा //४८०//अ ९ श्लोक ३३

मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली,  गळ्यांतील कौस्तुभ काढून हातात घेतला व मग ज्याचा पायधुळीकरितां छातीचा खळगा पुढे केला . 

Monday, June 24, 2019

तैसे क्षत्री  वैश्य स्त्रिया / का शूद्र अंत्यादि  इया /  जाति तवचि वेगळालिया/ जव   न पवति मातें //६०// अ ९ श्लोक ३२

त्या प्रमाणे क्षत्रिय वैश्य  शूद्र व अंत्यज आणि स्त्रिया , या जाति जेथपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झाले  नाही तेथपर्यंत  वेगवेगळ्या असतात.


Saturday, June 22, 2019

तेचि भलतेने भावे / मन मजआंतु येते होआवे  / आले तरी आघवे / मागील वावो //५७//अ ९ श्लोक ३२

तेच मन वाट्टेल त्या हेतूने का होईना , पण माझ्या स्वरूपात येईल असे करावे आणि एकदा माझ्या स्वरूपात आले तर मागील(जातिकूल)गोष्टी निष्फळ होतात. 

Thursday, June 20, 2019

पाहेपा  भक्तीचेनि आथिलेपणे / दैत्यी  देवा आणिले उणें / माझेरनार्सिहत्व  लेणे / जयाचिये  माहिमे //४५०//अ ९ श्लोक ३२

अर्जुना पहा  , भक्तीच्या संपन्नतेने राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला ज्या प्रल्हादाच्या भक्तिमाहात्म्यासाठी मला नार्सिहरूप अलंकार धारण करावा लागला


Monday, June 17, 2019

Sarth Dyaneshwari sampadak Shankar Vaman Dandekar

 ते पापयोनीही होतु कां / ते श्रुताधितही  न होतु कां / परि मजसी तुकिता / तुटी  नाही //४९//अ ९ श्लोक ३२

ते दुष्ट   देखील जन्माला आलेले असेनातं  का ? ते एकुन  व शिकून विद्धवान झ्हालेले नसेनात  का ; परुंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता , ते वजनात कमी भारत नाही 

Saturday, June 15, 2019

जयाचिये  वाचे माझे आलाप / द्रीष्टी भोगी माझे चि रूप / तयाचे मन संकल्प माझ चि  वाहे //६९//अ ९ श्लोक ३२

ज्यांचा वाणीत माझीच कथा आहे . ज्याचे डोळे माझंच रूप पाहण्यात गुंतले आहेत , ज्यांचे मन माझ्या विषयांचा विचार करीत राहते . //६९// अ ९ श्लोक ३२

Friday, June 14, 2019

माझीया भक्तिवीण / जळो ते जियालेपण / आगा पृथ्वीवरी पाषाण / नसती काई //३६//अ ९ श्लोक ३१

त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे आहे त्याला आग लागो.  अर्जुन, या पृथ्वीवर दगड नाहीत काय ?३६ अ ९ श्लोक ३१

Thursday, June 13, 2019

Gyaniyancha raja Guru maharaj guru


Sarth Dnyaneshwari sampadak Shankar Vaman Dandekar

जैसा दीपे  दीपू लाविजे / तेथ आदील कोण हे नोळखिजे / तैसा सर्वस्वे जो मज भजे / तो मी होऊनि ठाके //२८//अ (९) श्लोक ३१//

ज्या प्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता , त्यातील पहिला कोणता , हे ओळखता येत नाही ; त्या प्रमाणे जो सर्व भावांनी माझे  भजन करतो तो मंद्रूपच होऊन राहतो .//२८//अ (९) श्लोक ३१

Wednesday, June 12, 2019

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 

या देहचिया बंदोडी न पडिजे / सुखदुःखाचा सागरी न बुडिजे / सुखे सुखरूपा घडिजे / माझीयाची  अंगा //६//श्लोक २८  अ ९

(वर सांगितलेली युक्ती अमलात आणली असता )  देह रुपी बंदीखान्यात पडावे लागत नाही .  आणि सुखरूप जे माझं स्वरूप त्या होते त्याच्याशी  अनायासे एकक होते . 

Tuesday, June 11, 2019

ते क्रियाजात आघवे / जे जैसे निपजेल स्वभावे / ते भावना करोनि करावे/ माझीया मोहरा //४००// अ ९ श्लोक २७.

जें जें  कर्म जसे तुझ्या कडून स्वभावतः घडेल( मग ते सांग असो अथवा असांग ) ते सर्व कर्म माझ्या प्रीतीयार्थ  आहे. 

Monday, June 10, 2019

Sarth Dnyaneshwari by Shankar Vaman Dandekar.

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर :  निवडक ओव्या अध्याय नववा (९)श्लोक (२६)

येर पत्र पुष्प फळ / ते भाजावया मिस केवळ / वाचूनि  आमु चा लाग निष्कल / भक्तितत्व //९६//अ ९

बाकी पान  फुल फळ यांचे  अर्पण करणे , ते मला भाजण्याचे केवळ निमित्त्य  आहे . वास्तविक पाहिले तर आम्हाला  आवडते असें म्हटले म्हणजे भक्तांच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्तितत्वच  होय . 

Sunday, June 9, 2019

पै भक्ति एकि मी जाणे /तेथ साने थोर न म्हणे / आम्ही भावाचे पाहुणे /भलतेया //९५//(९)

मी ऐक भक्तीच ओळखतो . मग त्या ठिकाणी लहानथोर अशी निवड करीत नाही . आम्ही वाटेल त्याच्या भक्तीरूपी मेजवानीचे पाहुणे होतो . 

Saturday, June 8, 2019

यालागी शरीरसांडोवा कीजे /सकळ  गुणांचे लोण उतरिजे /संपत्तीमदु  सांडिये / कुरवंडी  करुनि //८१//(९)

याकरिता  परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निंबलोण करावे  तसेच संपत्तीचा फुंज ओवाळून टाकून ध्यावा . //८१//(९)

Friday, June 7, 2019

म्हणौनि थोरपण पर्हचि सांडिजे / व्युत्पत्ति आघवी विसरिजे / जै जागा धाकुटे होईजे / तैं जवळीक माझी //३७८// अ ९
एवढ्याकरिता आपले ठिकाणचा मोठेपणा दूर टाकून द्यावा शास्त्रअध्यन केल्याचा फुंज असला तर तो सर्व टाकून, जसे काही आपण शास्त्रअध्यन केलेच नाही , अशी वृत्ती ठेवावी . जगतात अशा प्रकारचा सर्व प्रकारे लहानपण जेव्हा घ्यावा ; तेव्हा माजे सांन्निध्य  प्राप्त होते . 
तैसे लक्षमियेचे थोरपण न सरे / जेथ  शंभूचेही  तप न पुरे /तेथ  येर  प्राकृत  हेंदरे / केवी जाणो  लाहे //३८०// (९)

त्या प्रमाणे लाक्ष्मि चा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे  तपहि  पुरे पडत नाही ,  त्या   मला  (परमात्मा ) सामान्यं व  अजागळ  लोकं कशे जणू शकतील ?