हे शब्देविण संवादिजे / इंद्रीये नेणता भोगिजे / बोलाआदी झोंबिजे / प्रमेयासी //५८ //ज्ञान ...१
हिची चर्चा शब्दावाचून करावी (मनातल्या मनात हिचा विचार करावा ) ,इंद्रीयाना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक धाब्दांच्या आगोदर त्यात सांगितलेय सिद्धांताचे आकलन करावे //५८//
जैसे भ्रमर परागु नेती / परी कमळ दळे नेणती / तैसे परी आहे सेविती / ग्रंथी इये // (५९)......(१)
कमळातील पराग भुंगे घेऊन जातात , परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते; या ग्रंथाचे सेवन करण्याची रीत तशी आहे.(५९)....(१)