करुणाष्टके
( श्री समर्थ रामदास स्वामी )
अनुदिन अनुतापे तपलो रामराया / परमदिनदयाळा! नीरसी मोहमाया /
अचपळ मन माझे नावरे आवरीतां / तुजवीण शीण होतो धावं रे धावं आतां //१//
भजनरहित रामा! सर्वही जन्म गेला / स्वजनजनधनाचा वेर्थ म्यां स्वार्थ केला /
रघुपति मति माझी आपुलीशी करावी / सकळ त्वजुनि भावें कास तुझी धरावी //२//
तनुमनधन माझे राघवा! रूप तुझे / तुजवीण मज वाटे सर्व संसार वोझे /
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी /अचल भजनलीळा लागली आस तूझी //३//
चपळपण मनाचे मोडीता मोडवेना / सकलस्वजनमाया तोडीता तोडवेना /
घडीघडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा / म्हणुनी करुणा हे बोलते दीनवाचा /४//
जळत हृदय माझें जन्म कोट्यानुकोटी / मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी /
जळत हृदय माझें जन्म कोट्यानुकोटी / मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी /
तळमळ निवविरे राम कारुण्यसिंधु/ षडरिपूकुळ माझें तोडि याचा समंधु //५//
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी /सिणत सिणत पोटी पाहिली वास तुझी
झडकरी झड घाली धांव पंचानना रे / तुजवीण मज नेती जम्बुकी वासना रे //६//
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे / रघुपतिविण आता चित कोठे न राहे /
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनी जाती / विषय सकळ नेती मागुता जन्म देती //७//
जय जय रघुवीर समर्थ !
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे / रघुपतिविण आता चित कोठे न राहे /
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनी जाती / विषय सकळ नेती मागुता जन्म देती //७//
उपरती मज रामी जाहली पूर्णकामी / सकळजनविरामी रामविश्रामधामी /
घडी घडी मन आता रामरूपी भरावे / रविकुळटिळका रे आपुलेसे करावे //८//जय जय रघुवीर समर्थ !
No comments:
Post a Comment