सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर
अध्याय बारावा :नमन
जय जय शुद्धे । उदारे प्रसिद्धे । अनव्रत आनंदे वर्षतिये ।।१।।
विषयव्याळे मिठी । दीधलीया नुठी ताठी । ते तुझिये गुरुकृपाद्रीष्टी निर्विष होय ।।२।।
तरि कवणाते तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी । जरी प्रसादरसकल्लोळी । पूरे येसी तू ।।३।।
योगसुखाचे सोहळे । सेवका तुझेनि स्नेहाळे । सोSहंसिद्धीचे लळे । पाळीसी तू ।।४।।
आधारशक्तीचा अंकी । वाढविसी कौतुकी । हृदयाकाश पल्लकी । परिये देसी निजे ।।५।।
प्रत्यगज्योतीची वॊवाळणी । करिसी मानपवनाची खेळणी । आत्मसुखाची बाळलेणी । लेवविसी ।।६।।
सतरावियचे स्तन्य देसी । अनाहताचा हल्लरू गासी । समाधिने बोधे निजविसी ।बुझाउनि ।।७।।
म्हणौनी साधका तू माउली। पिके सारस्वत तू झा पावली । या कारणे मी साउली न सँडी तुझी ।।८।।
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझे कारुण्य जयते आधष्टी । तो सकळ विध्याची ये सृष्टी धात्री होय ।।९।।
म्हणौनि आंबे श्रीमंते । निजजनकल्पलते । आज्ञापी माते । ग्रंथनिरूपणी ।।१०।।
तू शुद्ध आहेस , तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस . गुरुकृपादृष्टीरुपी माते तुझा जयजयकार असतो . १.
विषय रुपी सर्पाने दंश केला असता मूर्च्छा येते , ती काहीकेल्यास जात नाही ,हे गुरुकृपादृष्टी , तुझ्या योगाने ती मूर्च्छा नाहींशीं होते आणि जर सर्पदंश झालेल्या (त्या) प्राण्याची त्या (विषय ) विषापासून सुटका होते. २.
जर प्रसन्नतारूप पाण्याच्या लाटांची तुला भरती येईल , तर संसाराच्या त्रासाचे (अध्यात्मदि त्रिविध (तापाचे )
चटके कोणाला बसतील ? व खेद कसा बरे जळू शकेल ? ३.
हे प्रेमळ माते ,भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्या मुळे प्राप्त होतात व भक्तांची , ते ब्रम्ह मी आहे अशा स्वरूपस्थितिच्या प्राप्तीची हौस तू पुरवितेस ( ती कशी पुरवितेस हे स्पष्ट करतात ) ४.
आधारवि चक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवितेस व त्यांना झोप येण्याकरिता हृदयाकाश रुपी पाळण्यात घालून झोके देतेस ५.
आत्मप्रकाशरूप ज्योती ने साधकरूपी बालकास ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा निरोध करणे हि खेळणी त्यांच्या हातात देतेस व स्वरूपानंदांचे (लहान मुलांना घालावयाचे ) दागिने साधकरूपी बालकांच्या
अंगावर घालतेस ६.ती
सतरावी जीवनकलारुपी (व्योमचक्रातील चंद्रामृतरुपी दूध देतेस आणि अनाहत ध्वनी चे गाणे गातेस , आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून (स्वरूपी) निजवीतेस.७.
म्हणून साधकांना तू आई आहेस व सर्व विध्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात ; म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही.. ८..
हे सद्गुरूंची कृपादृष्टि ,तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल तो सर्व विघ्या रूप श्रुष्टी चा (उत्पन्नकर्ता ) ब्रह्म देवाचं बनतो .९.
एवढ्या करिता हे आपल्या भक्तांचा कल्पतरू व श्रीमंत अशा आई तू मला हा ग्रंथ सांगण्याला आज्ञा दे . १०. .