Friday, September 10, 2021

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर
नमन १८
जय जय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ ।    जनमजराजलदजाळ -प्रभंजन \\।।१।।

हे निष्पापा आपल्या सेवकाचे संपूर्ण कल्याण करणाऱ्या आणि जन्म   आणि म्हातारपण  रुपी मेघाच्या फळीची धूळधाण करणाऱ्या हे वायूरुपी श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो 

जय  जय देव प्रबळ । विदळीतामंगळकुळ निगमागम  दृमफळ फलप्रद ।।२।।
हे अतिशय सामर्थ्यवान (अहंकार) आदी अशुभ समुदायाचा ज्याने नायनाट 
 केला आहेय , अशा वेद शास्त्ररुपी  वृक्ष चे  फळ असलेल्या व त्या फळा ची प्राप्ती करून देणाऱ्या , श्रीगुरुदेवा तुमचा जय जयकार असो . 

जय जय देव सकाळ  विगतविषयवत्सल । कलितकाळ कौतुहल । कालातीत ।।३।।
हे स्वरूपपत: पूर्ण असलेल्या , ज्यांचा विषयवासना नाहीसा झाल्या  आहेत  
त्यांचा कैवार घेणाऱ्या  कालाच्या कारामतीहि अंकित करून ठेवीले  व ल्या अंशा दि विभागापलीकडे असलेल्या , गुरुदेवा तुमचा जय  जयकार  असो. .


जय जयदेव  निशकळ ।  स्फुरदमंदानंद बहळ । नित्य  निरसत्ताखिलमळ 
मूळभूत ।।४।।
हे निरुपाधिक ज्याचा ठिकाणी जोराचा विपुल आनंद प्रगत आहे अशा, संपूर्ण दोष नेहमीच नाहीसे केलेल्या सर्वांस कारण असलेल्या ,श्रीगुरुदेवा तुमचा जय जयकार असो .   
  

जय जय देव स्वप्रभा । जागदमबुदगर्भनभ  भूवनोद्भवारॅभस्तमभ  झालेल्या झालेल्या 
भवध्वन्स ।।५।।
हे स्वयं प्रकाशा जगतरुपी ढगांचा गर्भ ज्यात संभवतोउन्मील  आकाशा ,स्वर्गादि लोकांच्या उत्पत्ती चे आधारभूत खाम्बच , असलेल्या, , संसाराच्या फडशा पाडणाऱ्या  श्रीगुरो , तुमचा जय जयकार असो . 


जय जय  देव निश्चळ चालितचितपानतुंदिल । जगदुन्मीलनाविरल केलिप्रिय ।।६।।
हे स्थिर असणाऱ्या  , साधकाचे चंचल चित्त पिउन तुंदिल झालेल्या ,जगत प्रगत करण्याचा एकसारखा खेळ खेळण्याची आवड असलेल्या गुरुदेवा तुमचा जय जयकार असो . 


जय जय देव विशुद्ध ।  विदुदयोद्यांद्विरद । शमदममदनमदभेद  दयार्णव ।।७।।
हे अत्यंत शुद्धा ज्ञाननोदय रुपी अरण्यातील हत्ती (म्हणजे ज्ञानाभिमान गळीत करणारे ) अशा ,तशेच शम दमे करून मदनाधुव्वा च्या भयाचा नाश करणाऱ्या  दयासागरा  श्री गुरुदेवा तुमचा जयजयकार असो . 

जय जय  देवैकरूप । अतिक्रूतकंदर्पसर्पदर्प । भक्तभावभुवनदीप । तपापह \।।८।।
हे अविकारी मदनरुपी रुपी सापाच्या घमेंडीच्या धुव्वा उडविणाऱ्या , भक्तांच्या प्रेमरूपी घरातील दिवा असणाऱ्या व तापाचा नायनाट करणाऱ्या श्रीगुरुदेवा , तुमचा जयजयकार असो .  



जय जय देव अद्वितीय । परिणतोपरमैकप्रिय } निजजनजित भजनीय । मायागम्य ।।९।।
PREVIEW

हे अद्वितीया , परिपक्व झालेल्या वैराग्यवासनाचेच काय ते फक्त प्रेम असलेल्या ,आपल्या दासाच्या स्वाधीन होऊन राहिलेल्या ,भजन करण्यास योग्य असलेल्या ,मायेच्या ताब्यात न सापडणाऱ्या श्री गुरु देवा , तुमचा जयजयकार असो . 


जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो । स्वसंविदद्रुमबीजप्ररो । हणाव नी ।।१०}}
कल्पनारहित अशी ज्याची प्रसिद्धी आहे अशा (परमात्म-)स्वरूपास प्राप्त करून देणाऱ्या कल्पवृक्षा ,स्वरूपज्ञानरूपी वृक्षा चे बी वाढण्याची जमीन असलेल्या देवा, श्री गुरो तुमचा जयजयकार असो . 














                                          




No comments:

Post a Comment