जैसे शारदियेचे चंद्रकळे / माजी अमृतकण कोवळे / ते वेचिती मन मवाळें /चाकोरतलगे //ज्ञानेश्वरी१ (५६)
ज्या प्रमाणे शरदॠतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चाकोरांची पिले मृदु मानाने वेचतात ;
तियापरी श्रोतां / अनुभवावी हे कथा / अति हळुवारपणा चित्ता आणोणिया //ज्ञानेश्वरी १ (५७)
त्याप्रमाणे चित्त अगदी हळुवार करून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी //