Tuesday, June 30, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर :

अध्याय तेरावा नमन :


आत्मरूप गणेशु । सकाळ विध्याचे अधिकरण । तेचि वंदू श्रीचरण। ।श्रीगुरुचे ।।१।। 
जयाचनि आठवें। शब्द श्रृष्टि आगवे।सारस्वत आघवे।  जिवेसी ये ।।2।।
वक्तृत्व गोड़पणे । अमृता ते परू म्हणे ।
रस होती  वोळगणे अक्षारासी।।३।।
भवाचे अवतरण। अवतरविती खूण।हाता चढे सम्पूर्ण तत्व भेदे।।४।।
श्रीगुरूंचे पा य। जे गिवसुनी ठाय। ते ऐव ड्ढे भाग्य होय। उन्मेपा शी।।5।।


Saturday, June 27, 2020

तयाचे आम्हा व्यसन । तो आमुचे निधीनिधान । किंबहुना समाधान । तो मिळे तै ।। २३७।। श्लोक २
 ० अ १२

त्याचे  आम्हास व्यसन (छन्द  )असते  व  तेच आमच्या ठेव्याची खाण आहेत  फार काय सांगावे ते  आम्हाला 
भेटतात तेव्ह्स आम्हाला समाधान वाटते  

Wednesday, June 24, 2020

मग याहीवरी पार्था । माझा भजनी  आस्था ।तरी तयाते मी माथा  । मुकुट  करी ।।१४।। श्लोक १९ अ ११२


अर्जुना , इतके असूनही आणखीही ज्यांची माझ्या भजनाच्या ठिकाणी आस्था असते , तर त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो . 

Monday, June 22, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 

हे विश्वाची माझे घर । ऐसी मति ज्याची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ।।१३।।   श्लोक १९ अ १२


हे विश्वच माझे घर  आहे असा त्याचा दृढ निश्चय झालेला असतो , फार काय सांगावे ! सर्व स्थावरजंगमात्मक जग  जो (अनुभवाच्या अंगाने ) आपणच बनला आहे . 

Saturday, June 20, 2020

तयालागी मज रूपा येणे । तयाचेनि मज एथे असणे । तया लोन कीजे जीवे प्राणे । ऐसा पढिये ।।८९।।श्लोक १६ अ १२

त्याच्याकरीता  मला सगुन मूर्ती धारण करावी लागते ; आणि त्याच्या करीताच  मला (सगुण विग्रहाने) या जगात  रहावे लागते , तो मला इतका आवडतो , कि त्यावरून जीव व प्राण ओवाळून टाकावेत . 

Friday, June 19, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन दांडेकर


तयाचे आम्हा व्यसन । आमुचे तो निजध्यान । किंबहुना  समाधान । तो मिळे तै ।।८८।। श्लोक १६ अ १२

त्या भक्ताचा आम्हाला छंद  असतो . तो भक्त आमच्या स्वताच्या ध्यानाचा विषय  असतो . फार काय सांगावे ,त्याची जेव्हा आम्हास  भेट होते , तेव्हाच आम्हाला समाधान वाटते . 

Thursday, June 18, 2020

मग कर्मफळत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगू । शांतीसुखाचा ।।४२।। श्लोक १२ अ १२

मग कर्मफळत्याग जो आहे तो , ध्यानापेखा चांगला आहे आणि  कर्मफळत्यागापेक्षा  शांतीसुखाचा भोग (म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव ) चांगला आहे . 

Wednesday, June 17, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 

अभ्यासाहुनि  गहन । पार्था  मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ।।४१।। श्लोक १२ अ १२


अर्जुना , मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे , आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे आहे . 

Tuesday, June 16, 2020

माळिये   जेउते नेले  ।तेउते निवांतचि गेले । तया पाणिया ऐसे केले । होआवेगा ।।१२०।।

अरे माळ्याने जिकडे नेले तिकडे  काही एक तक्रार न करता जाणाऱ्या पाण्याप्रमाणे तुझे   जीवित् निरभिमान होऊन कर्म करणारे होऊ दे . 

Monday, June 15, 2020

म्हणौनि अभ्यासासी काही ।सर्वथा दुष्कर नाही । या लागी माझा ठायी । अभ्यासे मिळ ।।१३।। श्लोक ९ अ १२

म्हणून अभ्यासाला कोणतीही गोस्ट मुळीच कठीण नाही , या करीता  माझ्या स्वरूपी तू अभ्यासाने एक रूप हो .  

Sunday, June 14, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन  दांडेकर:
निवडक ओव्या :

आगा अभ्यास योगु म्हणिजे । तो हा ऐकू जाणिजे । येणे काही न निपजे ऐसे नाही ।।११०।।                                  
अरे अभ्यासयोग जे  म्हणतात तो हाच एक  आहे  असे समज  याच्या  योगाने  कोणतीही गोष्ट   होनार  नाही .असे नाही . 

Saturday, June 13, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपावदक शंकर  वामन दांडेकर : 
निवडक ओव्या :


तैसे भोगाआतुनि। चित्त माजमाजी रिगता । हळू  हळू  पांडुसुता  मीचि होईल ।।९।।सं श्लोक ९ अ १२

त्याप्रमाणे भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करता करताअर्जुन, ते तूझे चित्त  हळू हळू  मंद्रूप होईल   . 

Friday, June 12, 2020

मग पुनवेहूनि जैसे।  शशिबिंब दिसे दिसे ।   हारपत अवसे   नाहीचि होय  ।।१०८।। श्लोक ९ अ १२

मग  ज्या प्रमाणे पौर्णिमेपासून  दीवसे दिवस चंद्राचे बिंब  कमी होत होत अमावस्याला अगदी नाहीसे होते 
 मग जे जे का निमिख । देखेल माझे सुख तेतुले आरोचक । विषयी घेईल ।।१०६।। श्लोक ९ अ १२

मग जितके जितके निमिष , तुझे चित्त माझे सुख पाहिलं , तितके तितके तुझे चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल . 
तरी गा ऐसे करी । या आठा पाहारामाझारी । मोटके निमिषभरी । देतू  जाय ।।१०५।।श्लोक ९ अ १२

तर अर्जुना , असे कर कि, या आठ प्रहरामध्ये नेमके निमिषभर (चित्त) मला देत जा  . 

Wednesday, June 10, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक  शंकर  वामान दांडेकर :

अथवा हे चित्त मनबुद्धीसहित ।  माझ्या हाती अचुंबित । न शकसी देवो ।।४।। श्लोक ९ अ १२

अथवा जर  मनबुद्धीसहित हे चित्त माझ्या हाती  (साकळवासना रहित असे ) संपूर्ण तू देऊ शकणार नाहीस 

Wednesday, June 3, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 
  अध्याय बारावा :नमन 

जय जय शुद्धे । उदारे प्रसिद्धे । अनव्रत  आनंदे वर्षतिये ।।१।
विषयव्याळे  मिठी । दीधलीया नुठी ताठी । ते तुझिये गुरुकृपाद्रीष्टी निर्विष होय ।।२।।
तरि कवणाते तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी । जरी प्रसादरसकल्लोळी  । पूरे येसी  तू ।।३।।
योगसुखाचे सोहळे । सेवका तुझेनि स्नेहाळे । सोSहंसिद्धीचे लळे । पाळीसी तू ।।४।।
आधारशक्तीचा अंकी । वाढविसी कौतुकी । हृदयाकाश पल्लकी । परिये देसी निजे ।।५।।
प्रत्यगज्योतीची वॊवाळणी । करिसी मानपवनाची खेळणी । आत्मसुखाची बाळलेणी । लेवविसी ।।६।।
सतरावियचे स्तन्य देसी । अनाहताचा हल्लरू  गासी । समाधिने बोधे निजविसी ।बुझाउनि ।।७।।
म्हणौनी साधका तू माउली। पिके  सारस्वत  तू झा पावली । या कारणे मी साउली न  सँडी तुझी ।।८।।
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी ।  तुझे  कारुण्य जयते   आधष्टी । तो सकळ विध्याची ये सृष्टी  धात्री होय ।।९।।
म्हणौनि आंबे  श्रीमंते । निजजनकल्पलते । आज्ञापी माते । ग्रंथनिरूपणी ।।१०।।



  तू शुद्ध आहेस , तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस . गुरुकृपादृष्टीरुपी माते तुझा जयजयकार असतो . १. 
विषय रुपी सर्पाने दंश केला असता मूर्च्छा येते , ती काहीकेल्यास जात नाही ,हे गुरुकृपादृष्टी , तुझ्या योगाने ती मूर्च्छा नाहींशीं होते आणि जर सर्पदंश झालेल्या (त्या) प्राण्याची त्या (विषय ) विषापासून सुटका होते. २. 
जर प्रसन्नतारूप  पाण्याच्या लाटांची तुला भरती येईल , तर संसाराच्या त्रासाचे (अध्यात्मदि त्रिविध (तापाचे )
चटके कोणाला बसतील ? व खेद कसा बरे जळू शकेल ? ३.  
हे प्रेमळ माते ,भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्या मुळे प्राप्त  होतात व भक्तांची , ते ब्रम्ह मी आहे अशा  स्वरूपस्थितिच्या प्राप्तीची हौस तू पुरवितेस ( ती कशी पुरवितेस हे स्पष्ट  करतात ) ४. 
आधारवि चक्रावर  असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवितेस व त्यांना  झोप येण्याकरिता  हृदयाकाश रुपी पाळण्यात घालून झोके देतेस ५. 
आत्मप्रकाशरूप ज्योती ने साधकरूपी बालकास ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा निरोध करणे हि खेळणी त्यांच्या हातात देतेस व स्वरूपानंदांचे (लहान मुलांना घालावयाचे ) दागिने साधकरूपी  बालकांच्या 
अंगावर घालतेस ६.ती 
सतरावी जीवनकलारुपी (व्योमचक्रातील चंद्रामृतरुपी दूध देतेस आणि अनाहत ध्वनी चे गाणे गातेस , आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून (स्वरूपी) निजवीतेस.७.  
म्हणून साधकांना तू आई आहेस व सर्व विध्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात ; म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही.. ८.. 
हे सद्गुरूंची कृपादृष्टि ,तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल तो  सर्व विघ्या रूप श्रुष्टी चा (उत्पन्नकर्ता ) ब्रह्म  देवाचं बनतो  .९. 
एवढ्या करिता हे आपल्या भक्तांचा कल्पतरू व श्रीमंत अशा आई तू मला हा ग्रंथ सांगण्याला आज्ञा दे . १०. . 


Tuesday, June 2, 2020

भरुनी सद्भावाची अंजुळी । मिया ओविया फुले मोकळी । अर्पिली अंघरी युगली विश्वरूपाचा  ।।७०८।।श्लोक ५५ अ ११

मी शुद्ध भावनारूप ओंवजळीत हि ओव्यारुपी मोकळी फुले भरून विश्व रूपाच्या दोन्ही पायावर अर्पण केले, (असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 

Monday, June 1, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन वामन दांडेकर 

निवडक ओव्या 

भुते हे भाष् विसरला । जे दिठी मीचि आहे बांधला । म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे  ।। ९८।।श्लोक ५५अ ११

तो भुते हि भाषा विसरला ; कारण त्याचा दृष्टीला माझ्या शिवाय दुसरा विषय नाही ; म्हणून तो निर्वैर झाला असता तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझी भक्ती करतो .