Tuesday, July 30, 2019

जैसी कमळकळीका  जालेपणे / ह्रदयीचिया मकरंदाते राखू नेणे /दे राय रांका पारणे / आमोदाचे //२७// अ ९

ज्या प्रमाणे पूर्ण उमळलेली कमळाची कळी  हि आपल्या आत असलेला सुवासास  दाबून ठेवू शकत नाही , तर ती राजास अथवा गरिबास सुवासाची (सारखीच) मेजवानी देते . 

Saturday, July 27, 2019

जें जें भेटे  भूतं / ते ते मानिजे भगवंत / हा भक्तियोगु निषचित / जाण माझा // १८  //अ १० श्लोक ८

जो जो प्राणी दिसेल , तोतो प्रत्यक्ष परमात्मा आहेय असे समजावे . हा माझा भक्तियोग आहे असे निष्चित समाज . 

Sunday, July 21, 2019

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 
निवडक ओव्या : 
ऎसींनी जे निजज्ञानी  /  खेळत सुखे त्रिभुवनी /  जगद्रुपा मनी  / साठवूनि  माते //१७// अ १० श्लोक ८

अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले जे आत्मज्ञानी  ते आहेत ते,  मी जो जागद्रुप  त्या मला अंतःकरणात  साठवून   त्रैलोक्यात   अणे क्रीडा  व्यवहार करीत असतात .                                       





Friday, July 19, 2019

उदारीचा गर्भु जैसा / नेणे  मायेची वयसा / देवांसी मी तैसा / चोजवेना //६५// या १० श्लोक २

पोटात असलेल  मूल   ज्याप्रमाणे आईचे वय  जाणत नाही ,  देवांना  माझे ज्ञान  होत नाही . 

Sunday, July 14, 2019

तरी किरीटी तू माते / नेणसी  ना निरुते /  तरी  गा जो मी येथे /  ते विश्व ची हें //६३// अ १० श्लोक १

तरी अर्जुना तू  मला खरोखर जाणत नाहीस ना? (जर जाणत नसल्यास तर सांगतो ) येथे जो मी तुझ्या पुढे उभा आहे तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी म्हणजे हे विश्वच आहे . 

Friday, July 12, 2019

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 

ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या :

ऐके ऐके सुवर्मा / वाक्य माझे परम/ जे अक्षरे लेउनि परब्रह्म / तुज खेवासि  आले //६२// अ १० श्लोक १

तर ऐक मर्मज्ञ अर्जुना , आमचे श्रेष्ट् बोलणे ऐक हे आमचे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांचा अंगरखा घालून तुला आलिंगन देण्यास आले आहे . 

Wednesday, July 10, 2019

अहो अळुमाळ अवधान ध्यावें / येतुलेनी आनंदाचिया  राशीवरी  बैसावें / बाप श्रवणेंद्रिया  दैवें / घातली माळ //३४//अ ९ श्लोक ३४


अहो थोड कैसे  लक्ष  ध्यावे आणि एवढ्याने  आनंदाचा राशीवर बसावे , ध्यन आहे त्या कानाची कि आज त्यास भाग्याने माळ  घातली आहे . 

Monday, July 8, 2019

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 

ऐसा मिया  अथीला  होसी /तेथ माझियाची स्वरूप पावसी / हे अंत :करणीचे तुजपाशी / बोलीजत असें //१९//या श्लोक ३४

या प्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील , तेव्हा मद्रूपास पावशील ; हे माझ्या अंतःकरणातील (गुह्य गोष्ट ) तुझ्या जवळ मी सांगत आहे. 

Sunday, July 7, 2019

माझेनि अनुसंधाने देख  / संकल्पू  जाळणे नि;शेख / मध्यजी चोख / याचि   नांव //१८// अ ९ श्लोक ३४

पाहा  जो  माझ्या  वेधाने संकल्प पूर्णपणे जाळतो , त्यालाच  माझे चांगले भजन करणारा म्हणावे . 

Saturday, July 6, 2019


तूं  मन हे मीचि करीं / माझ्या भजनी प्रेम धरीं /    सर्वत्र  नमस्कारी मज एकाते // १७// अ ९ श्लोक ३४

तूं आपले मन मंद्रूप कर . माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर ; आणि सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे असे समजून मला एकाला नमस्कार कर . 

Friday, July 5, 2019

तरि  झड़झडोनि  वहिला  निघ / इये  भक्तीचीये  वाटे लाग / जिया पावशील  अव्यंग / निज धाम माझे //१६//अ ९ श्लोक ३३

तरी या मृत्यू लोकाच्या राहाटीतून झटकन मोकळा हो , आणि या भक्तीच्या मार्गाला लाग कि , त्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील . 

Wednesday, July 3, 2019

दर्दुरा  सापे  गिळिजतु आहे उभा/ कि तों मासिया वेटाळी जिभा / तैसे प्राणिये  कवणा लोभा / वाढविती  तृष्णा  //१४//

बेडूक सपाकडून उभा गिळला जात असतांना देखील, तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरिता जीभ बाहेर काढून वेताळीत असतो , तशाच तऱ्हेनं  प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवितात .कोण जाणे 

Monday, July 1, 2019

जन्मलिया दिवसादिवसें / हो लगे काळाचियाची ऐसे / कि वाढती करिती उल्हासें /  उभविती गुढिया //२//अ ९ श्लोक ३३

जन्मल्यापासून दिवसेंदिवस   मूल अधिकाधिक काळाच्या तावडीत  जाते . असेअसून (आई बाप  ) आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा करतात व आनंदप्रदर्शन गुढ्याही उभारतात. 
सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन दांडेकर 

जेथ चहूकडे जळत वणवा  / तेथुनि न निगिजे केवी पांडवा / तेवी लोकां येऊनिया सोपद्रवा / केवीं  न भजिजे माते //९२// अ ९ श्लोक ३३

अर्जुना , जेथे चोहोंकडून वणवा लागला आहे , तेथून बाहेर कसे पडू नये ? त्याप्रमाणे अनेक दुःखानी भरलेल्या  या मृत्यूलोकांत  येऊन , मला कसे भाजू नये बरे ?