नमितो योगी थोर विरागी तत्व ज्ञानि संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत
http://prajaktad.blogspot.com http://prajakta-dighe.blogspot.in http://kundha.blogspot.in http://prajaktadighe.wordpress.com
Thursday, September 5, 2024
Wednesday, July 17, 2024
Thursday, November 23, 2023
|
सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर
[ओंकार हाच परमात्मा आहे असें कल्पून ज्ञानेश्वर महाराज येथे मंगल करतात] हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व
वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या श्री ओंकारा तुला नमस्कार असो ; व स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य
असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरुपी ओंकारा , तुला जय जयकार असो.
देवा तूचि गणेशु । सकलमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवाधारिजो जी ।।२।।
(वरील विशेषानी युक्त अशा ) देवा सर्वांच्या बुद्धी चा प्रकाश जो गणेश, तो तूच आहेस . निवृत्तीनाथांचे शिष्य
(ज्ञानेश्वर महाराज ) म्हणतात , महाराज एका .
हे शब्धब्रह्म अशेष । तेचि मूर्ती सुवेष । तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ।।३।।
।।
सम्पूर्ण वेद हीच (त्या गणपतीची ) उत्तम सजविलेली मूर्ती आहे; आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरुपी शरीराचे
सौन्दर्य शोभून राहिले आहे .
स्मृति तेचि अवयव । देखा आंगिकभाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ।।४।।
आता शरीराची ठेवणं पाहा (मन्वादिकांच्या ) स्मृति हेच त्याचे अवयव होत . या स्मृतीतील अर्थ सौन्दर्यानी
(ते अवयव म्हणजे ) लावण्याची केवळ खाणच बनले आहेत .
अष्टदश पुराणे । तिची मणिभूषणे । पदपद्धती खेवणे । प्रमेयरत्नांची ।। ५।।
आठरा पुराणे हेच (त्यांच्या ) अंगावरील रत्नखचित अलंकार; त्यात प्रतिपादिलेली तत्वे हीच रत्ने व
हीच शब्दांची छन्दोबद्ध रचना हीच त्यांची कोंदणे होत ..
पदबंध नागर । तेचि रंगाथिले अंबर । जेथ साहित्य वाणे सपुर ।उजाळाचे ।।६।।
उत्तम प्रकारची शब्दरचना (हेच त्या गणपतीच्या ) अंगावरील रंगविलेले वस्त्र आहे ;आणि त्या
शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम पोत आहे
देखा काव्यनाटका । जे निर्धारित सकौतुका । त्याची रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ।।७।।
पाहा , कौतुकाने काव्यनाटका विषयी विचार केला असता ती काव्यनाटके (त्या गणपतीच्या)
पायातील क्षुद्र घागऱ्या असून त्या अर्थरूप आवाज रुणझुणत आहेत ..
नाना प्रमेयांची परी । निपुणपणे पाहता कुसरी । दिसती उचित पदे माझारी रत्ने भली ।।८।।
त्यात प्रतिपादिलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता याचा बारकायीने विचार केला असता
यांमध्येही उचित पदाची काही चांगली रत्ने आदळतात .
तेथ व्यासादिकांचिया मती । तेचि मेखळा मिरवती । चोखाळपणे झळकती । पल्ल्वसॅडका ।।९।।
येथे व्यासादिकांची बुद्धि हीच कोणी (त्या गणपतीच्या ) कमरेला बांधलेली मेखला शोभत आहे व तिच्या
पदराच्या दशा निर्दोष पणाने झळकत आहे .
देखा षडदर्शने म्हणिपती । तेचि भुजांची आकृती । म्हणौनि विसंवादे धरिती आयुदे हाती ।।१०।।
पाहा , सहा शास्त्रे म्हणून जी म्हणतात , तेच गणपती चे सहा हात आणि म्हणून एकमेकांशी न मिळणारी
मते हीच कोणी त्या हातात शस्त्रे आहेत .
तरी तर्कू तोचि परशु । नीतिभेदु अंकुशु । वेदांतू तो महारसु| मोदकु मिरवे ।।११।।
(कानादशास्त्ररूपी) हातामध्ये अनुमानरूपी परशु आहे . (गौतमीयन्याय दर्शनरुपी ) हातात
प्रमाणप्रमेयादि षोडश पदार्थाचा तत्वभेदरूपी अंकुश आहे. (व्यासकृत वेदान्तसूत्ररूपी) हातात
ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे
एके हाती दंतु । जो स्वभावता खंडितु । तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ।।१२।।
बौद्धमताचें निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत , हाच कोणी स्वभावात;
खंडित असलेला दांत तो (पतंजलदर्शनरूपी) एकासां हातात धरला आहे.
मग सहजे सत्कारवादु । तो पद्माकरु वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू । अभयहस्तु ।।१३।।
मग बौद्धाच्या (शून्यवादाचे खंडनझाल्यावर ) सहजचे (निरीश्वर सांख्याचा )सत्कारवाद हाच
(गणपतीचा) वर देणारा कमलासारखा हात होय व (जेमिनीकृत धर्मसूत्रे) हा धर्माची सिद्धी
करणारा व अभय देणारा (गणपतीचा) हात होय.
देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु| । जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा|| १४।।
पाहा ,ज्या (गणपतीच्या) ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ ,अति निर्मल
व बऱ्यावाईटची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे .
तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु । देवो उन्मेष सू क्ष्मएक्षनु विघ्नराजु ।।१५।।
तर संवाद हाच दात असून त्यातील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा रंग आहे ;ज्ञानरूप बारीक डोळे असलेला
विघ्नांचा नियामक असा हा देव आहे .
मज अवगमालिया दोनी । मीमांसाश्रवणस्थानी । बोधमदामृत मुनी । अलि सोविती ।।१६।।
पूर्वमीमांसा व उत्तर मीमांसा हि शास्त्रे हीच त्या (गणपती) दोन्ही कानाच्या ठिकाणी मला वाटतात व
बोध हेच त्याचे मदरुपी अमृत असून मुनीरूपी भ्रमर त्याचे सेवन करतात ..
प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसें एकवटत इम --। मस्तकावरी ।।१७।।
वर सांगितलेल्या श्रुती स्मृत्यादिकांत प्रतिपादिलेली तत्वेहीच (गणपतीच्या) अंगावरील तेजदार पोवळी
होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गाजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून, ती तुल्यबळाने
तेथे एकत्र राहिली आहेत .
उपरी दशोउपनिषदें । जिये उदारे ज्ञानमकरंदे । तिये कुसुम मुगुटीं सुगंधे । शोभती भली ।।१८।।
ज्ञानरूप मध देण्यात उदार असलेली ईशावास्यादि दशोउपनिषद सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुगुटावर
चांगली शोभतात .
आकार चरणयुगल । उकार उदर विशाल । मकार महामंडळ मस्तकाकारे ।।१९।।
ओंकाराची प्रथम या अकार मात्रा , हे (गणपतीचे) दोन पाय असून , दुसरी उकारमात्रा , हे त्याचे
मोठे पोट आहे ; आणि तिसरी मकारमात्र हाच त्याचा मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे.
हे तिन्ही एकवटले । तेथे शब्धब्रह्म कवळले । ते मियाँ गुरुकृपा नेमिले । आदिबीज ।।२०।।
ह्य तिन्ही मात्रा एकवटल्या म्हणजे त्यात संपूर्ण वेद कवटळला जातो . त्या बीजरुप ओंकारूप गणपतीला मी गुरुकृपेने नमस्कार करतो .
आता अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमस्कारिली मियाँ ।।२१।।
आता त्यानंतर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून , चातुर्य वागर्थ व कला याची देवता आहे व जिने सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो .
मज हृदयीं सद्गुरू । जेणे तारिलो हा संसारपुरू । म्हणउनि विशेषे अत्यादरु । विवेकवारी ।।२२।।
ज्यांनी मला या संसारपुरातून तारिले , ते सद्गुरू माझ्या हृदयात आहेत , म्हणुन माझे विवेकावर फार प्रेम आहे .
म्हणौनि जाणतेनो गुरु भजिजे । तेणे कृतकार्य होईजे । जैसे मूळ सिंचन सहज ।शाखापल्लव संतोषती ।।२५।।
एवढ्याकरिता अहो ज्ञाते पुरुषहो गुरूला भाजावे आणि त्या योगाने कृत्याकृत्य व्हावे . ज्या प्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते.
तेवीची ऐका आणिक एक । एथुनी शब्दश्री सच्चछाश्रिक । आणि महाबोध कोवळीक । दुणावली ।।३४।।
या च प्रमाणे याची आणखि एक महति एका . यापासूनच शब्दाच्या संपतीला निर्दोष शास्त्रीयता आली व त्यामुळे
ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली .
ऐथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले । आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ \\३५।।
येथे चतुरता शहाणी झाली तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर्य येथे पुष्ट झाले .
जे अपेक्षिजे विरक्ती । सदा अनुभविजे संती । सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ ।।५३।।
वैराग्यशील पुरुष ज्याची इछ्या करतात , संत जे नेहमी अनुभवितात व सोहंभावनेने पार पावलेले जेथे रममाण
होतात.
जैसे शारदियेचे चंद्रकळे । माजी अमृतकण कोवळे । ते वेंचिती मने मवाळे । चकोरतलगे ।।५६।।
ज्या प्रमाणे शरदऱ्हीतुच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिले मृदु मानाने वेचतात ..
तियापरी श्रोता । अनुभवावी हे कथा । अति हळुवारपण चित्ता । आणूनिया ।।५७।।
त्याप्रमाणे चित्त अगदी हळुवार करून ( वासनाने जाड्य काढून ) मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी .
हे शब्देविण संवादिजे । इंद्रिया नेणता भोगिजे । बोलाआदि झोंबिजे । प्रमेयासी ।।५८।।
हिची चर्चा शब्दावाचून करावी (मनातल्यामनात हीचा विचार करावा) , इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रदीपदक शब्दांचा अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांताचे आकलन करावे.
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळे नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये ।।५९।।
कमलातील पराग भुंगे घेऊन जातात , परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्यांची खबरहि नसते ;या ग्रंथाचे सेवन
करण्याची रीत तशी आहे ;
का आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंदू प्रगटता । हा अनुरागु भोगिता } कुमुदिनी जाणे ।।६०।।
किंवा चंद्र दिसू लागताच चंद्राविकासी कमलिनी प्रफुल्ल होऊन , आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते ;
हे प्रेमसौख कसे भोगावे हे एक तिचे तिलाच ठाऊक .
अहो अर्जुनाचिये पान्ति । जे परिसणया योग्य होती । तीही कृपाकरुनिया संती । अवधान द्यावे ।।६२।।
अहो, अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेलं त्या
संतांनी कृपाकरुन इकडे लक्ष द्यावे .
हे सलगी म्या म्हणितले । चरणा लागोनी विनविले । प्रभू सखोल हृदय आपुले । म्हणउनिया ।।६३।।
अहो महाराज आपले अंतःकरण सखोल आहेय म्हणून हे (वरील ओवीतील) विधान मी केवळ
लडिवाळपणाने केले हे (वास्तविक) आपल्या पायाजवळ विनंती आहे.
Monday, January 2, 2023
सार्थ ज्ञानेश्वरी संपादक : शंकर वामन दांडेकर
पसायदान
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे } पसायदान हे ।।९३।। जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।।९४।। दुरितांचे तिमिर जावो ।विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ।।९५।।
वर्षत सकळ मंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।अनवरत भूमंडळी। भेटतु भूता ।।९६।। चला कल्पतरूंचे आरव । चेतनाचिंतामणीचे गाव| ।
बोलते जे अर्णव पियूषाचे ।।९७।। चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे ताप हीन । ते सर्वा हि सदा सज्जन। सोयरे हो तू।।९८।। किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होउनी तिन्ही लोकी । भाजीजो आदि पुरुखी । अखंडित ।।९९।। आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इये । द्रिष्टद्रिष्ट विजये ।होआवेजी ।।१८००।।येथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दान पसावो । येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला ।। १।।
Monday, November 28, 2022
सार्थ ज्ञानेश्वरी संपादक :शंकर वामन दांडेकर
निवडक ओव्या अठरावा अद्याय :
हा अठरावा अद्ययावो नोहें } हे एकाध्यायी गीताचि आहे । जै वासरूंची गे दुहे । तैं वेळु कायसा ।।८४।।
हा अठरावा अध्याय नाही , तर हि एकाद्यायी गीताचं आहे . ज्या वेळेला वा सरूच स्तनाला लागेल ,त्या वेळेला पन्हा सोडण्यास गायीस कितीसा वेळ लागेल ? ८४
आणि हा ग सव्यसाची । मूर्तीची होऊनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ।। २१८।।श्लोक।। ११।।
आणि अरे अर्जुना , देहाची मूर्तीच होऊन जे कर्म करण्याचा कंटाळा करतात, ते खेडवळ (अज्ञानी) होत .
वाचे बर्वे कवित्व । कवित्त्वि बर्वे रसिकत्व । रसिकत्त्वि परतत्व । स्पर्शु जैसा ।।३४७।।
जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे व त्या कवित्वात जशी सुरसतेची बहा र असावी व ह्या सुरसतेत ज्याप्रमाणे परमात्मवर्णन् चा संबंध यावा.
हे विहित कर्म पांडव । आपुला अनन्य वोलावा । आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ।।९०६।।श्लोक ४५
अर्जुना , हे विहित कर्म आपले केवळ एकच जीवन आहे, व हे विहित कर्म करणे हेच ,मी जो सर्वात्मक ,त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे.
अगा जया जे विहित । ते ईश्वराचे मनोगत । म्हणौनि केलिया निभ्रांत । सांपडेची तो ।। ९११।।
अरे अर्जुना ज्याला जे विहित कर्म सांगितलेले आहे तेच त्याने करावे असेइश्वराचे मनोगत आहे ;म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर नि:संशय प्राप्त होतो.
तया सर्वात्मका ईश्वरा ।स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपरा । तोषालागीं ।।९१७।। श्लोक ४६ अ १८
हे वीरा अर्जुना ,त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता , ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते.
हे गीता नाम विख्यात । सर्व वाङ्मयाचें मथित । आत्मा जेणे हस्तगत । रत्न होय ।।१३२३।। श्लोक ६३ अ १८
हे गीता नावाने प्रसिद्द असलेल्या सर्व वाङ्मयाचें सार आहे व ज्याच्या योगाने आत्मरुपी रत्न स्वाधीन होते .
मन्मना भव मद भक्तो माध्याजी माम नमस्कुरु । मामेवैष्यसि सत्यम ते प्रतिजा प्रियो-सी मे ।। श्लोक ६५।। अ १८
माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझा भक्त हो,माझे यजन करणारा हो,मला नमस्कार कर; (म्हणजे तू) माझ्याप्रत येशील . तू मला प्रिया असल्यामुळे हे मी तुला प्रतिज्ञेवर सत्य सांगत आहे.
सर्वधर्मानं परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिश्यामि मा शूच :।।श्लोक ६६।।
सर्व धर्माचा (धर्माधर्मा चा म्हणजे त्यांना कारणीभूत असणारे जे अज्ञान ,त्यांचा)त्याग करून मला एकट्यालाच (अद्वैत भावाने) शरण ये (म्हणजे) मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन ; तू शोक करू नकोस .
सुवर्णमणि सोनया ।ये कल्लोळु जैसा पांणिया । तैसा धनंजया । शरण ये तू ।।१४००।।
अर्जुना सोन्याचा मणि जसा सोन्याला शरण येतो, अथवा लाट जशी पाण्याला शरण येते (ऐक्याला पावते,) त्या प्रमाणे तू मला (अभिन्नत्त्वाने ) शरण ये.
म्हणौनि मी होऊनि माते । सेवणे आहे आयिते । ते करी हाता येते । ज्ञाने येणे ।।१४०५।।
म्हणून मंद्रूप होऊन माझी सेवा (भक्ती) करणे , हि माझी सहज भक्ती आहे. ती माझी सहज भक्ती या ज्ञानाने हस्तगत होईल असे कर.
ऐसे सर्व रूपरूपसें । सर्व द्रीष्टीडोळसै । सार्वदेशनिवासे । बोलिले श्रीकृष्णे ।।१४१७।।
सर्व रूपांच्या योगाने जो रूपवान आहे, सर्व द्रीष्टीच्या योगाने जो डोळस आहे व जो सर्व देशात राहाणारा आहे, त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला सांगितले
हृदया ह्रुदय एक झाले । ये हृदयीचे ते हृदयी घातले । द्वैत न मोडिता केले
आपणा ऐसे अर्जुनाला|| ।।१४२१।।
तेव्हा आलिंगनाच्या वेळी देवाचे व अर्जुनाचे हृदय एक झाले , देवांनी आपल्या हृदयात असलेला बोध अर्जुनाच्या हृदयात घातला आणि देवा व भक्त हे द्वैत न मोडता देवांनी अर्जुनाला आपल्यासारखे केले.
मोक्षदानी स्वतंत्र ।ज्ञानप्रधान हे शास्त्र । येतुलले दुजी सूत्र ।उभारले ।।१४३६।।
हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे . इतकेच दुसऱ्या अद्यायात थोडक्यात सांगितले आहे .
परी वतसाचेनि वोरसे । दुभते होय घरोद्देशें ।जालेपांडवाचेनि मिषें । जगद्द उद्धरण ।। १४६७।।
परंतु वासऱ्याच्या प्रेमाने लाभणारे गायीचे दुभते,जसे घरातील सर्व माणसाच्या उपयोगास येते, त्याप्रमाने अर्जुनाच्या निमित्याने जगाचा उद्धार झाला .
ते हे मंत्र रहस्य गीता । मेळवी जो माझिया भक्ता । अनन्य जीवना माता । बाळका जैसी ।।श्लोक ६८ (१२)
आई शिवाय बालकाला दुसरे जीवन नाही त्या बालकाची व आईची जशी गाठ घालून द्यावी त्या प्रमाणे गायत्री मंत्राचे रहस्य सांगणाऱ्या त्या गीतेची माझ्या भक्तांना ओळख करून देतो .
तैसी भक्ता गीतेसी । भेटी करी जो आदरेसी । तो देहापाठी मजसी एकचि होय ।।१३।।
(आईचीं व तिच्याशी अनन्य असणाऱ्या बालकाची जशी गाठ घालून द्यावी )त्या प्रमाणे भक्ताची गीतेशी जो प्रेमाने भेट करील , तो देहपातानंतर मंद्रूपच होईल .
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: । तत्र श्रीविजयो भूतिरध्रुवा नीतिर्मतीर्मम ।।७८।।
जेथे योगेश्वर कृष्ण व जेथे धनुर्धर पार्थ असतील , तेथे श्री , विजय ,ऐश्वर्य आणि अढळ नीति हि आहेतच , असे माझे (निष्चित) मत आहे.
गुरु तेथ ज्ञान । ज्ञानी आत्मदर्शन । दर्शनांनी समाधान । आथी जैसे ।।३६।।
,
\जेथे गुरु तेथे ज्ञान ,जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन तेथे असे समाधान असते .
तैसा व्यासाचा मागोवा घेतु । भाष्यकाराते वाट पुसुतु| । अयोग्यही मी न पवतु। के जाईन ।।१७२२।।
त्याप्रमाणे व्यासाचा माग चंदनाचेनि घेत घेत व भाष्यकारां ना वाट पुसत पुसत मी अयोग्य असलो तरी, तेथे (गीतार्थाच्या ठिकाणी ) प्रेअप्त न होता कोठे जाईन
चंदने वेधली झाडे । जाली चंदनाचेनि पाडे । वशिष्टे मंडली कि भांडे । भानूसी काठी ।।३१।।
चंदनाच्या परिमळाने व्यापिलेली झाडे चंदनाच्या जोडीची झाली ; वशिष्टने सूर्याच्या ऐवजी ,त्याच्या जागी ठेविलेली काठी ,सूर्याशी स्पर्धा करावयास लागली (तिने सूर्या सारखा प्रकाश पाडला . )
कीं बहूना तुमचे केले । धर्म कीर्तन हे सिद्धी गेले । येथ माझे जी उरले ।पाईक पण ।।९२।।
महाराज फार काय सांगावे तुमच्या कृपेने केलेले हे धर्माचे व्याख्यान शेवटला गेले . या ठिकाणी माझा काय तो फक्त सेवकपणाचं उरला.
Thursday, September 30, 2021
Tuesday, September 28, 2021
Monday, September 27, 2021
Thursday, September 23, 2021
Friday, September 10, 2021
सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर
नमन १८
जय जय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ । जनमजराजलदजाळ -प्रभंजन \\।।१।।
हे निष्पापा आपल्या सेवकाचे संपूर्ण कल्याण करणाऱ्या आणि जन्म आणि म्हातारपण रुपी मेघाच्या फळीची धूळधाण करणाऱ्या हे वायूरुपी श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो
जय जय देव प्रबळ । विदळीतामंगळकुळ निगमागम दृमफळ फलप्रद ।।२।।
हे अतिशय सामर्थ्यवान (अहंकार) आदी अशुभ समुदायाचा ज्याने नायनाट
केला आहेय , अशा वेद शास्त्ररुपी वृक्ष चे फळ असलेल्या व त्या फळा ची प्राप्ती करून देणाऱ्या , श्रीगुरुदेवा तुमचा जय जयकार असो .
जय जय देव सकाळ विगतविषयवत्सल । कलितकाळ कौतुहल । कालातीत ।।३।।
हे स्वरूपपत: पूर्ण असलेल्या , ज्यांचा विषयवासना नाहीसा झाल्या आहेत
त्यांचा कैवार घेणाऱ्या कालाच्या कारामतीहि अंकित करून ठेवीले व ल्या अंशा दि विभागापलीकडे असलेल्या , गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. .
जय जयदेव निशकळ । स्फुरदमंदानंद बहळ । नित्य निरसत्ताखिलमळ
मूळभूत ।।४।।
हे निरुपाधिक ज्याचा ठिकाणी जोराचा विपुल आनंद प्रगत आहे अशा, संपूर्ण दोष नेहमीच नाहीसे केलेल्या सर्वांस कारण असलेल्या ,श्रीगुरुदेवा तुमचा जय जयकार असो .
जय जय देव स्वप्रभा । जागदमबुदगर्भनभ भूवनोद्भवारॅभस्तमभ झालेल्या झालेल्या
भवध्वन्स ।।५।।
हे स्वयं प्रकाशा जगतरुपी ढगांचा गर्भ ज्यात संभवतोउन्मील आकाशा ,स्वर्गादि लोकांच्या उत्पत्ती चे आधारभूत खाम्बच , असलेल्या, , संसाराच्या फडशा पाडणाऱ्या श्रीगुरो , तुमचा जय जयकार असो .
जय जय देव निश्चळ चालितचितपानतुंदिल । जगदुन्मीलनाविरल केलिप्रिय ।।६।।
हे स्थिर असणाऱ्या , साधकाचे चंचल चित्त पिउन तुंदिल झालेल्या ,जगत प्रगत करण्याचा एकसारखा खेळ खेळण्याची आवड असलेल्या गुरुदेवा तुमचा जय जयकार असो .
जय जय देव विशुद्ध । विदुदयोद्यांद्विरद । शमदममदनमदभेद दयार्णव ।।७।।
हे अत्यंत शुद्धा ज्ञाननोदय रुपी अरण्यातील हत्ती (म्हणजे ज्ञानाभिमान गळीत करणारे ) अशा ,तशेच शम दमे करून मदनाधुव्वा च्या भयाचा नाश करणाऱ्या दयासागरा श्री गुरुदेवा तुमचा जयजयकार असो .
जय जय देवैकरूप । अतिक्रूतकंदर्पसर्पदर्प । भक्तभावभुवनदीप । तपापह \।।८।।
हे अविकारी मदनरुपी रुपी सापाच्या घमेंडीच्या धुव्वा उडविणाऱ्या , भक्तांच्या प्रेमरूपी घरातील दिवा असणाऱ्या व तापाचा नायनाट करणाऱ्या श्रीगुरुदेवा , तुमचा जयजयकार असो .
जय जय देव अद्वितीय । परिणतोपरमैकप्रिय } निजजनजित भजनीय । मायागम्य ।।९।।
PREVIEW
हे अद्वितीया , परिपक्व झालेल्या वैराग्यवासनाचेच काय ते फक्त प्रेम असलेल्या ,आपल्या दासाच्या स्वाधीन होऊन राहिलेल्या ,भजन करण्यास योग्य असलेल्या ,मायेच्या ताब्यात न सापडणाऱ्या श्री गुरु देवा , तुमचा जयजयकार असो .
जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो । स्वसंविदद्रुमबीजप्ररो । हणाव नी ।।१०}}
कल्पनारहित अशी ज्याची प्रसिद्धी आहे अशा (परमात्म-)स्वरूपास प्राप्त करून देणाऱ्या कल्पवृक्षा ,स्वरूपज्ञानरूपी वृक्षा चे बी वाढण्याची जमीन असलेल्या देवा, श्री गुरो तुमचा जयजयकार असो .
Wednesday, September 8, 2021
Sunday, September 5, 2021
Monday, August 9, 2021
सार्थ ज्ञानेषवरी संपादक : शंकर वामन दांडेकर
नमन १६ अं
मावळवीत विश्वभासू । नवल उदयाला चंडांशु ।अद्वयअबजीनी विकाशू । वंदू आता ।।१।।
विशवाच्या आभासाला नाहीसा करणारा व अद्वैत स्थितीरुपी कमळाचा विकास कर् णा रा हा (श्री गुरु निवृत्तीरुपी ) आश्रयाकारक सूर्य उगवला आहे. हा सूर्य आश्चर्यकारक ; कारण लौकिक सूर्य हा उगवला असता जगताचे प्रकाशन करतो व द्वैत वाढवतो . आणि हा श्रीगुरुरूपी सूर्य जगदाभास नाहीसा करतो व अद्वैत स्थिती चा विकास ) करतो त्याला आता आम्ही नमस्कार करतो
जो अविद्या रात्री रुसोनिया ।गिळी ज्ञाइवलतीये नाज्ञानचांदणिया । जो सुदीनु करी ज्ञानिया । स्वबोधाचा ।।२।।
जो (गुरुरूपी) सूर्य, मायेच्या रात्रीच्या नाश करून , ज्ञान व अज्ञानरुपी चांदण्या नाहीश्या करतो व जो ज्ञानी लोकांना अध्यात्म ज्ञानाच्या चांगल्या निरभ्र दीवसाची जोड करून देतो
जेणे विवळतिये सवळे । लाहोनि आत्माज्ञानाचे डोळे । सांडिती
देहाहंतेचि अविसाळे । जीवपक्षी ।।३।।
ज्याचा उदयाने प्रकाशित होणाऱ्या प्रांतकाळी आत्मज्ञानरूपी द्रीष्टी प्राप्त होऊन , जीव रूपी पक्षी "मी देह आहे" अशी समजुतीची घरटी सोडतात .
लिंगदेह कमळाचा । पोटी वेचताया चीदभ्रमराचा बंदिजयाचा । उदैला होय ।।४।।
ज्या श्रीगुरुरुपी सूर्या चा उदय झाला असता ,लिंग देह रुपी कमळाच्या
पोटात (अडकल्या ) मुळे नाश पावणाऱ्या जीव चैतन्य रुपी भ्रमराची
(त्या लिंग देहरुपी कमळाच्या ) बंधनांपासून सुटका होते .
शब्दाअंकांचे चिया आसकाडी । भेद नदीच्या दोही थंडी । आर् डा ते वीरहवेंडी । बुध्दिबोधु ।।५}}
भेदरुपी नदीच्या दोन्ही काठावर बुद्धीला मोह पाडणाऱ्या शास्त्रादिकांचा विसंगतपणा हीच कोण अडचणीची जागा; त्या जागेत एकमेकांचा वियोगाने वेडी होउन बुद्धी व बोध (हेच कोणी चक्रवाक पक्षी ) ओरडणारे .
तया चक्रवाक्यांचे मिथुन । समरस्याचे समाधान । भोगावी जो चिदग्ग्न -।भुवनदिवा ।।६।।
Saturday, August 7, 2021
Friday, August 6, 2021
Wednesday, August 4, 2021
Friday, February 5, 2021
सार्थ ज्ञानेश्वरी : संपादक शंकर वामन दांडेकर
अध्याय १५ नमन
आता हृदय हे आपुले । चौफ़ळुणिया भले । वरी बैसवू पावले । श्री गुरूंची ।।१।।ऐक्य भावांची अंजुळी । सर्वेंद्रियकुडमुळे । भरुनीया पुष्पांजली अर्घु देवो ।।२।।
अनन्योदके धुवट । वासना जे तनिष्ठ । ते लागलेसे अबोट ।चन्दनाचे ।।३।।
प्रेमाचेनि भांगारे । निर्वाळुनी नूपुरे । लेवऊ सुकुमारें पदे तिये ।।४।।
घणावली आवडी । अव्यभिचारे चोखडी । तिये घालू जोडी । आंगोळीया ।।५।।
आनंदामोद बहळ । सात्विका चे मुकुल । ते उमलले अष्टदळ । ठेऊ वरी ।।६।।
तेथे अहं हा धूप जाळू । नाहंतेजेवोवाळू । साम्रस्ये पोटाळू । निरंतर ।।७।।
माझी ताणू आणि प्राण । इया दोनी पाऊवा लेवू । श्री चरण । करू भोगमोक्षनिंबलोण । पाया तया ।।८।।
इया गुरुचरणसेवा । हो पात्र तया दैवा । जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ।।९।।
आता आपल्या शुद्ध अंतःकरणाचा चौरंग करून त्यावर श्रीगुरुंच्या पावलांची स्थापना करू ।।१।।
श्री गुरु व आपण एक आहोत , अश्या एक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत , सर्व इंद्रियारुपी कमळकळ्या भरून, त्या पुष्पांजळी चे अरंघ्या श्री गुरूंच्या चरणा वर देउ .।।१।।
ऐक्य भावांची अंजुळी । सर्वेंद्रियकुडमुळी भरुनीया । पुष्पांजली अर्घु देवो ।।२।।
श्री गुरु व आपण एक आहोत . अशा ऐक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत सर्व इंद्रियरूपी कमळ कळयां भरून , त्या पुष्पांजळी चे अर्घ श्रीगुरूंच्या चरणावर देऊ ।।२।।
अननयॊदके धुवट \। वासना जे तननिष्ठ । ते लागलेसे अबोट । चंदनाचे ।।३।।
एक निष्ठारूप स्वछ पाण्याने स्नान घालून श्री गुरूंच्या विषई असलेली वासना , तेस श्रीगुरुस गंधाचे बोट लावू .।।३ }}
(श्री गुरूंविशई चे) प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घाघरांचे वाळे सद्गुरुंच्या सुकुमार पायात घालू ।।४।।
अनन्यतने शुद्ध झालेले सद्गुरुविषयीचे दृढ प्रेम , हीच कोणी जोडवी ती सद्गुरुंच्या पायाच्या अंगठ्यात घालू ।।५।।
आनंदरुपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमळलेली कमळ कळी हेच कोणी एक आठ पाकळ्यांचे कमळ ते सद्गुरूच्या पायावर वाहू .||६।।
देहादिकांचा अभिनिवेश घेणारी जी अहंवृत्ती , हाच कोणी एवरून क धूप तो श्री गुरुचरणां जवॅळ जाळू .या देहादिकांपैकी मी कोणी नाही , अशी जी उत्पन्न झालेली निराभिमान बोध वृत्ती , हेच कोणी तेज त्या तेजाने
श्री गुरूस ओवाळू व त्या सद्गुरुचरणास तदाकार्तेने नेहमी आलिंगन देऊ .
। ।७।।
श्री गुरूंच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण (स्थूल देह व लिंग देह ) या दोन खडावा करून घालू व ऐहिकपार्त्रिक भोग व मोक्ष हे श्री गुरुचणावरून उतारा म्हणून ओवाळून टाकू .।।८।।
ज्याच्या योगाने धर्म अर्थ काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थाच्या सिहासनावर राज्याभिषेक होतो , त्या दैवास या श्रीगुरूंच्या चरणाच्या उपासनेने आम्ही योग्य होतो ।।९।।
Tuesday, December 15, 2020
Monday, December 14, 2020
Sunday, December 13, 2020
Wednesday, December 9, 2020
Thursday, December 3, 2020
Subscribe to:
Posts (Atom)