सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर
[ओंकार हाच परमात्मा आहे असें कल्पून ज्ञानेश्वर महाराज येथे मंगल करतात] हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व
वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या श्री ओंकारा तुला नमस्कार असो ; व स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य
असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरुपी ओंकारा , तुला जय जयकार असो.
देवा तूचि गणेशु । सकलमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवाधारिजो जी ।।२।।
(वरील विशेषानी युक्त अशा ) देवा सर्वांच्या बुद्धी चा प्रकाश जो गणेश, तो तूच आहेस . निवृत्तीनाथांचे शिष्य
(ज्ञानेश्वर महाराज ) म्हणतात , महाराज एका .
हे शब्धब्रह्म अशेष । तेचि मूर्ती सुवेष । तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ।।३।।
।।
सम्पूर्ण वेद हीच (त्या गणपतीची ) उत्तम सजविलेली मूर्ती आहे; आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरुपी शरीराचे
सौन्दर्य शोभून राहिले आहे .
स्मृति तेचि अवयव । देखा आंगिकभाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ।।४।।
आता शरीराची ठेवणं पाहा (मन्वादिकांच्या ) स्मृति हेच त्याचे अवयव होत . या स्मृतीतील अर्थ सौन्दर्यानी
(ते अवयव म्हणजे ) लावण्याची केवळ खाणच बनले आहेत .
अष्टदश पुराणे । तिची मणिभूषणे । पदपद्धती खेवणे । प्रमेयरत्नांची ।। ५।।
आठरा पुराणे हेच (त्यांच्या ) अंगावरील रत्नखचित अलंकार; त्यात प्रतिपादिलेली तत्वे हीच रत्ने व
हीच शब्दांची छन्दोबद्ध रचना हीच त्यांची कोंदणे होत ..
पदबंध नागर । तेचि रंगाथिले अंबर । जेथ साहित्य वाणे सपुर ।उजाळाचे ।।६।।
उत्तम प्रकारची शब्दरचना (हेच त्या गणपतीच्या ) अंगावरील रंगविलेले वस्त्र आहे ;आणि त्या
शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम पोत आहे
देखा काव्यनाटका । जे निर्धारित सकौतुका । त्याची रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ।।७।।
पाहा , कौतुकाने काव्यनाटका विषयी विचार केला असता ती काव्यनाटके (त्या गणपतीच्या)
पायातील क्षुद्र घागऱ्या असून त्या अर्थरूप आवाज रुणझुणत आहेत ..
नाना प्रमेयांची परी । निपुणपणे पाहता कुसरी । दिसती उचित पदे माझारी रत्ने भली ।।८।।
त्यात प्रतिपादिलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता याचा बारकायीने विचार केला असता
यांमध्येही उचित पदाची काही चांगली रत्ने आदळतात .
तेथ व्यासादिकांचिया मती । तेचि मेखळा मिरवती । चोखाळपणे झळकती । पल्ल्वसॅडका ।।९।।
येथे व्यासादिकांची बुद्धि हीच कोणी (त्या गणपतीच्या ) कमरेला बांधलेली मेखला शोभत आहे व तिच्या
पदराच्या दशा निर्दोष पणाने झळकत आहे .
देखा षडदर्शने म्हणिपती । तेचि भुजांची आकृती । म्हणौनि विसंवादे धरिती आयुदे हाती ।।१०।।
पाहा , सहा शास्त्रे म्हणून जी म्हणतात , तेच गणपती चे सहा हात आणि म्हणून एकमेकांशी न मिळणारी
मते हीच कोणी त्या हातात शस्त्रे आहेत .
तरी तर्कू तोचि परशु । नीतिभेदु अंकुशु । वेदांतू तो महारसु| मोदकु मिरवे ।।११।।
(कानादशास्त्ररूपी) हातामध्ये अनुमानरूपी परशु आहे . (गौतमीयन्याय दर्शनरुपी ) हातात
प्रमाणप्रमेयादि षोडश पदार्थाचा तत्वभेदरूपी अंकुश आहे. (व्यासकृत वेदान्तसूत्ररूपी) हातात
ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे
एके हाती दंतु । जो स्वभावता खंडितु । तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ।।१२।।
बौद्धमताचें निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत , हाच कोणी स्वभावात;
खंडित असलेला दांत तो (पतंजलदर्शनरूपी) एकासां हातात धरला आहे.
मग सहजे सत्कारवादु । तो पद्माकरु वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू । अभयहस्तु ।।१३।।
मग बौद्धाच्या (शून्यवादाचे खंडनझाल्यावर ) सहजचे (निरीश्वर सांख्याचा )सत्कारवाद हाच
(गणपतीचा) वर देणारा कमलासारखा हात होय व (जेमिनीकृत धर्मसूत्रे) हा धर्माची सिद्धी
करणारा व अभय देणारा (गणपतीचा) हात होय.
देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु| । जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा|| १४।।
पाहा ,ज्या (गणपतीच्या) ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ ,अति निर्मल
व बऱ्यावाईटची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे .
तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु । देवो उन्मेष सू क्ष्मएक्षनु विघ्नराजु ।।१५।।
तर संवाद हाच दात असून त्यातील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा रंग आहे ;ज्ञानरूप बारीक डोळे असलेला
विघ्नांचा नियामक असा हा देव आहे .
मज अवगमालिया दोनी । मीमांसाश्रवणस्थानी । बोधमदामृत मुनी । अलि सोविती ।।१६।।
पूर्वमीमांसा व उत्तर मीमांसा हि शास्त्रे हीच त्या (गणपती) दोन्ही कानाच्या ठिकाणी मला वाटतात व
बोध हेच त्याचे मदरुपी अमृत असून मुनीरूपी भ्रमर त्याचे सेवन करतात ..
प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसें एकवटत इम --। मस्तकावरी ।।१७।।
वर सांगितलेल्या श्रुती स्मृत्यादिकांत प्रतिपादिलेली तत्वेहीच (गणपतीच्या) अंगावरील तेजदार पोवळी
होत व द्वैत आणि अद्वैत मते हीच त्या गाजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून, ती तुल्यबळाने
तेथे एकत्र राहिली आहेत .
उपरी दशोउपनिषदें । जिये उदारे ज्ञानमकरंदे । तिये कुसुम मुगुटीं सुगंधे । शोभती भली ।।१८।।
ज्ञानरूप मध देण्यात उदार असलेली ईशावास्यादि दशोउपनिषद सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुगुटावर
चांगली शोभतात .
आकार चरणयुगल । उकार उदर विशाल । मकार महामंडळ मस्तकाकारे ।।१९।।
ओंकाराची प्रथम या अकार मात्रा , हे (गणपतीचे) दोन पाय असून , दुसरी उकारमात्रा , हे त्याचे
मोठे पोट आहे ; आणि तिसरी मकारमात्र हाच त्याचा मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे.
हे तिन्ही एकवटले । तेथे शब्धब्रह्म कवळले । ते मियाँ गुरुकृपा नेमिले । आदिबीज ।।२०।।
ह्य तिन्ही मात्रा एकवटल्या म्हणजे त्यात संपूर्ण वेद कवटळला जातो . त्या बीजरुप ओंकारूप गणपतीला मी गुरुकृपेने नमस्कार करतो .
आता अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमस्कारिली मियाँ ।।२१।।
आता त्यानंतर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून , चातुर्य वागर्थ व कला याची देवता आहे व जिने सर्व जग मोहून टाकले आहे, त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो .
मज हृदयीं सद्गुरू । जेणे तारिलो हा संसारपुरू । म्हणउनि विशेषे अत्यादरु । विवेकवारी ।।२२।।
ज्यांनी मला या संसारपुरातून तारिले , ते सद्गुरू माझ्या हृदयात आहेत , म्हणुन माझे विवेकावर फार प्रेम आहे .
म्हणौनि जाणतेनो गुरु भजिजे । तेणे कृतकार्य होईजे । जैसे मूळ सिंचन सहज ।शाखापल्लव संतोषती ।।२५।।
एवढ्याकरिता अहो ज्ञाते पुरुषहो गुरूला भाजावे आणि त्या योगाने कृत्याकृत्य व्हावे . ज्या प्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते.
तेवीची ऐका आणिक एक । एथुनी शब्दश्री सच्चछाश्रिक । आणि महाबोध कोवळीक । दुणावली ।।३४।।
या च प्रमाणे याची आणखि एक महति एका . यापासूनच शब्दाच्या संपतीला निर्दोष शास्त्रीयता आली व त्यामुळे
ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली .
ऐथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले । आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ \\३५।।
येथे चतुरता शहाणी झाली तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर्य येथे पुष्ट झाले .
जे अपेक्षिजे विरक्ती । सदा अनुभविजे संती । सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ ।।५३।।
वैराग्यशील पुरुष ज्याची इछ्या करतात , संत जे नेहमी अनुभवितात व सोहंभावनेने पार पावलेले जेथे रममाण
होतात.
जैसे शारदियेचे चंद्रकळे । माजी अमृतकण कोवळे । ते वेंचिती मने मवाळे । चकोरतलगे ।।५६।।
ज्या प्रमाणे शरदऱ्हीतुच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिले मृदु मानाने वेचतात ..
तियापरी श्रोता । अनुभवावी हे कथा । अति हळुवारपण चित्ता । आणूनिया ।।५७।।
त्याप्रमाणे चित्त अगदी हळुवार करून ( वासनाने जाड्य काढून ) मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी .
हे शब्देविण संवादिजे । इंद्रिया नेणता भोगिजे । बोलाआदि झोंबिजे । प्रमेयासी ।।५८।।
हिची चर्चा शब्दावाचून करावी (मनातल्यामनात हीचा विचार करावा) , इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रदीपदक शब्दांचा अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांताचे आकलन करावे.
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळे नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये ।।५९।।
कमलातील पराग भुंगे घेऊन जातात , परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्यांची खबरहि नसते ;या ग्रंथाचे सेवन
करण्याची रीत तशी आहे ;
का आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंदू प्रगटता । हा अनुरागु भोगिता } कुमुदिनी जाणे ।।६०।।
किंवा चंद्र दिसू लागताच चंद्राविकासी कमलिनी प्रफुल्ल होऊन , आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते ;
हे प्रेमसौख कसे भोगावे हे एक तिचे तिलाच ठाऊक .
अहो अर्जुनाचिये पान्ति । जे परिसणया योग्य होती । तीही कृपाकरुनिया संती । अवधान द्यावे ।।६२।।
अहो, अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेलं त्या
संतांनी कृपाकरुन इकडे लक्ष द्यावे .
हे सलगी म्या म्हणितले । चरणा लागोनी विनविले । प्रभू सखोल हृदय आपुले । म्हणउनिया ।।६३।।
अहो महाराज आपले अंतःकरण सखोल आहेय म्हणून हे (वरील ओवीतील) विधान मी केवळ
लडिवाळपणाने केले हे (वास्तविक) आपल्या पायाजवळ विनंती आहे.
No comments:
Post a Comment