Sunday, October 20, 2019

म्हणौनि भलतेणे ऐथ सद्भावे नाहावे /प्रयाग माधव विश्वरूप पाहावे / येतुलेनी संसारासि ध्यावे  तिलोदक //१०//अ ११

म्हणून या त्रिवेणीसंगमात  हवे  त्याने आस्तिकबुद्धीने स्नान करून, जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात , तसे येथे विश्वरूप माधवा चे दर्शन घ्यावे , अशा रीतीने संसाराला तिलांजली ध्यावी 

Saturday, October 19, 2019

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक  शंकर वामन दांडेकर 

निवडक ओव्या 

माजी गीता सरस्वती गुप्त/ आणि दोन्ही रस ते ओघ मूर्त / यालागी  त्रिवेणी हे उचित फावले बाप //७// अ ११ 

ज्या प्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांच्या ओघानंचा  संगम झाला आहे , त्या प्रमाणे या 
अध्यायात शांत व अद्भुत या दोन रसांचा मिलाफ़ होऊन , अकरावा अध्याय हा प्रयाग क्षेत्रच ,बनला आहे म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते . 


Thursday, October 17, 2019

मिया इहीच दोन्ही डोळा / झोम्बा वे विश्वरूपा सकळा / एवढी हाव तो  दैवआगळा //म्हणुनी करी//३२//अ १०श्लोक ४२

मी याच दोन डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून तो करीत होता . 

Tuesday, October 15, 2019

म्हणे हेचि  हृदयआतुली प्रतीती / बाहेरी अवतरो का डोळ्याप्रती / इये आरतीचा पाऊली मती  उठती  झाली //३१//अ १० श्लोक ४२

अर्जुन आपल्याशी  असे म्हणावयास लागला कि, (हा सर्व  विश्वात एक भगवंटाचे स्वरूप व्याप्त आहे) माझ्या अंतःकरणातील अनुभव माझ्या बाह्य दृष्टी ला दिसावा , अशा इच्छेच्या प्रवृत्ति ने माझ्या बुद्धीने  उचल घेतली .