Thursday, August 29, 2019

एर्हवी मी कैसा केवढा / म्हणोनि अपानपयाही नव्हेचि फुडा / यालागी प्रधान जिया रूढा / तिच्या विभूती आइके //११ अ १० श्लोक १९.

खरोखर मी कैसा  व केवढा  आहे , हे माझे मला देखील ठाऊक नाही , म्हणून ज्या मुख्य नामाकीत विभूती आहेत त्या ऐक . 

Monday, August 19, 2019

अंगीचिया रोम किती / जयाचिये तयासी न गाणावती / तैसिया माझिया विभूती / असंख्य मज //२१०// अ १० श्लोक १९

आपल्या अंगावर किती केस आहेत , हे ज्याचे त्याला मोजता येत नाहीत , त्याचप्रमाणे माझ्याच विभूती असून त्यांची गणना मला होत नाही . 

Saturday, August 10, 2019

विषय विषाचा परिपडू / गोड  परमाथु  लागे कडू /विषय तो गोडु / जीवासी जाहला // ५९// अ १० श्लोक १३

विषय रूप विषाचा एवढा मोठा पराक्रम आहे कि,   वस्तुतः गोडं   असलेला पर मार्थ , तो त्या विषयाच्या योगाने कटू वाटू लागतो व स्वाभाविक कडू असलेले शब्दादिक जे विषय ते प्राण्यांना गोड  वाटतात . 

Tuesday, August 6, 2019

जी जन्मलेपण आपुले / हे आजि मि या डोळा देखील / जीवित हाता चढले मज आवडतसे //४६ //अ १० श्लोक ११

महाराज  मी आपला जन्म हा आज डोळ्यांनी पहिला ( आत्मज्ञान होणे  हा  नवा जन्म आहे  व तोआज  माझा झाला ) त्यामुळे माझे जीवित माझ्या हाती आले , असे मला वाटते .