Thursday, September 30, 2021

तया सर्वात्मका इश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपरा ।

तोषालागी ।।९१६।। श्लोक ४६ अ १८

Tuesday, September 28, 2021

अगा  जया जे विहित । ते  ईश्वरा चे मनोगत । म्हणौनि केलीय निभ्रांत । 
सापडेची तो ।।९११।। श्लोक ४५ अ १८

Monday, September 27, 2021

हे विहित  कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा । आणि   हेचि परम सेवा । मज  सर्वातमकाची ।। श्लोक ४५।। ९०६ अ १८

अर्जुन, हे विहित कर्म आपले केवळ एकच जीवन आहे व हे विहित कर्म करणे हीच , मी जो सार्वात्मक त्या माझी श्र्स्ट   सेवा आहे. 

Thursday, September 23, 2021

सार्थ ज्ञानेश्वरी: संपादक शंकर वामन दांडेकर 

आणि हा गा सव्यसाची ।मूर्तीचि होऊनि देहाची ।खंती करिती कर्माची ।ते गावढे गा ।।११८।। अ १८ श्लोक ९
आणि अरे अर्जुना , देहाची मूर्तीस होऊन जे कर्म करण्याचा कंटाळा ,करतात ते खेडवळ (अज्ञानी ) होत . 

Friday, September 10, 2021

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर
नमन १८
जय जय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ ।    जनमजराजलदजाळ -प्रभंजन \\।।१।।

हे निष्पापा आपल्या सेवकाचे संपूर्ण कल्याण करणाऱ्या आणि जन्म   आणि म्हातारपण  रुपी मेघाच्या फळीची धूळधाण करणाऱ्या हे वायूरुपी श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो 

जय  जय देव प्रबळ । विदळीतामंगळकुळ निगमागम  दृमफळ फलप्रद ।।२।।
हे अतिशय सामर्थ्यवान (अहंकार) आदी अशुभ समुदायाचा ज्याने नायनाट 
 केला आहेय , अशा वेद शास्त्ररुपी  वृक्ष चे  फळ असलेल्या व त्या फळा ची प्राप्ती करून देणाऱ्या , श्रीगुरुदेवा तुमचा जय जयकार असो . 

जय जय देव सकाळ  विगतविषयवत्सल । कलितकाळ कौतुहल । कालातीत ।।३।।
हे स्वरूपपत: पूर्ण असलेल्या , ज्यांचा विषयवासना नाहीसा झाल्या  आहेत  
त्यांचा कैवार घेणाऱ्या  कालाच्या कारामतीहि अंकित करून ठेवीले  व ल्या अंशा दि विभागापलीकडे असलेल्या , गुरुदेवा तुमचा जय  जयकार  असो. .


जय जयदेव  निशकळ ।  स्फुरदमंदानंद बहळ । नित्य  निरसत्ताखिलमळ 
मूळभूत ।।४।।
हे निरुपाधिक ज्याचा ठिकाणी जोराचा विपुल आनंद प्रगत आहे अशा, संपूर्ण दोष नेहमीच नाहीसे केलेल्या सर्वांस कारण असलेल्या ,श्रीगुरुदेवा तुमचा जय जयकार असो .   
  

जय जय देव स्वप्रभा । जागदमबुदगर्भनभ  भूवनोद्भवारॅभस्तमभ  झालेल्या झालेल्या 
भवध्वन्स ।।५।।
हे स्वयं प्रकाशा जगतरुपी ढगांचा गर्भ ज्यात संभवतोउन्मील  आकाशा ,स्वर्गादि लोकांच्या उत्पत्ती चे आधारभूत खाम्बच , असलेल्या, , संसाराच्या फडशा पाडणाऱ्या  श्रीगुरो , तुमचा जय जयकार असो . 


जय जय  देव निश्चळ चालितचितपानतुंदिल । जगदुन्मीलनाविरल केलिप्रिय ।।६।।
हे स्थिर असणाऱ्या  , साधकाचे चंचल चित्त पिउन तुंदिल झालेल्या ,जगत प्रगत करण्याचा एकसारखा खेळ खेळण्याची आवड असलेल्या गुरुदेवा तुमचा जय जयकार असो . 


जय जय देव विशुद्ध ।  विदुदयोद्यांद्विरद । शमदममदनमदभेद  दयार्णव ।।७।।
हे अत्यंत शुद्धा ज्ञाननोदय रुपी अरण्यातील हत्ती (म्हणजे ज्ञानाभिमान गळीत करणारे ) अशा ,तशेच शम दमे करून मदनाधुव्वा च्या भयाचा नाश करणाऱ्या  दयासागरा  श्री गुरुदेवा तुमचा जयजयकार असो . 

जय जय  देवैकरूप । अतिक्रूतकंदर्पसर्पदर्प । भक्तभावभुवनदीप । तपापह \।।८।।
हे अविकारी मदनरुपी रुपी सापाच्या घमेंडीच्या धुव्वा उडविणाऱ्या , भक्तांच्या प्रेमरूपी घरातील दिवा असणाऱ्या व तापाचा नायनाट करणाऱ्या श्रीगुरुदेवा , तुमचा जयजयकार असो .  



जय जय देव अद्वितीय । परिणतोपरमैकप्रिय } निजजनजित भजनीय । मायागम्य ।।९।।
PREVIEW

हे अद्वितीया , परिपक्व झालेल्या वैराग्यवासनाचेच काय ते फक्त प्रेम असलेल्या ,आपल्या दासाच्या स्वाधीन होऊन राहिलेल्या ,भजन करण्यास योग्य असलेल्या ,मायेच्या ताब्यात न सापडणाऱ्या श्री गुरु देवा , तुमचा जयजयकार असो . 


जय जय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो । स्वसंविदद्रुमबीजप्ररो । हणाव नी ।।१०}}
कल्पनारहित अशी ज्याची प्रसिद्धी आहे अशा (परमात्म-)स्वरूपास प्राप्त करून देणाऱ्या कल्पवृक्षा ,स्वरूपज्ञानरूपी वृक्षा चे बी वाढण्याची जमीन असलेल्या देवा, श्री गुरो तुमचा जयजयकार असो . 














                                          




Wednesday, September 8, 2021

उपजलिया  बाळकासी । नाव  नाही तयापासी । ठवीलेंनी  नावेसी । ओ देत उठी ।।३३ ०।। श्लोक २३ अ १७

Sunday, September 5, 2021

 सार्थ ज्ञानेश्वरी संपादक  शंकर  वामन दांडेकर 

पाहे  पा ओम  तत् सत ऐसे । हे बोलणे तेथ नेत से जेथूनि का हे प्रकाशे । दृष्यजात ।।४०१।। अ १७ श्लोक २६
हे पहा ज्याच्याकडून , हे सर्व दृश्यमात्र ,प्रकाशिलें  जाते, त्या ठिकाणी "ओम तत् सत " हे बोलणे (हा नामउच्चार ) नेते 

Monday, August 9, 2021

सार्थ  ज्ञानेषवरी संपादक : शंकर वामन दांडेकर
नमन १६ अं
मावळवीत विश्वभासू । नवल उदयाला  चंडांशु  ।अद्वयअबजीनी विकाशू  । वंदू आता  ।।१।।

विशवाच्या आभासाला  नाहीसा करणारा व अद्वैत स्थितीरुपी  कमळाचा विकास कर् णा रा हा (श्री गुरु निवृत्तीरुपी ) आश्रयाकारक  सूर्य  उगवला आहे. हा सूर्य  आश्चर्यकारक  ; कारण लौकिक सूर्य हा उगवला असता जगताचे प्रकाशन करतो व द्वैत वाढवतो . आणि हा श्रीगुरुरूपी सूर्य  जगदाभास  नाहीसा करतो व अद्वैत स्थिती चा विकास ) करतो त्याला आता आम्ही  नमस्कार करतो 

जो अविद्या रात्री  रुसोनिया ।गिळी  ज्ञाइवलतीये नाज्ञानचांदणिया ।  जो सुदीनु  करी ज्ञानिया  । स्वबोधाचा ।।२।।

जो (गुरुरूपी) सूर्य, मायेच्या रात्रीच्या नाश करून  , ज्ञान व अज्ञानरुपी चांदण्या  नाहीश्या करतो व जो ज्ञानी लोकांना अध्यात्म ज्ञानाच्या चांगल्या निरभ्र  दीवसाची जोड करून देतो 

जेणे विवळतिये सवळे । लाहोनि आत्माज्ञानाचे डोळे । सांडिती 
देहाहंतेचि  अविसाळे । जीवपक्षी ।।३।।   

ज्याचा उदयाने प्रकाशित होणाऱ्या प्रांतकाळी आत्मज्ञानरूपी द्रीष्टी प्राप्त होऊन , जीव रूपी पक्षी "मी देह आहे" अशी समजुतीची घरटी सोडतात . 
 
लिंगदेह कमळाचा । पोटी वेचताया चीदभ्रमराचा बंदिजयाचा । उदैला होय ।।४।।         
ज्या  श्रीगुरुरुपी सूर्या  चा उदय झाला असता ,लिंग देह रुपी कमळाच्या  
पोटात  (अडकल्या ) मुळे  नाश   पावणाऱ्या  जीव चैतन्य रुपी भ्रमराची 
(त्या लिंग देहरुपी कमळाच्या ) बंधनांपासून सुटका होते . 

शब्दाअंकांचे चिया आसकाडी । भेद नदीच्या दोही थंडी । आर् डा ते   वीरहवेंडी । बुध्दिबोधु ।।५}}
भेदरुपी नदीच्या दोन्ही काठावर बुद्धीला मोह पाडणाऱ्या शास्त्रादिकांचा विसंगतपणा हीच कोण अडचणीची जागा; त्या जागेत एकमेकांचा वियोगाने वेडी होउन बुद्धी व बोध (हेच कोणी चक्रवाक पक्षी ) ओरडणारे . 

तया  चक्रवाक्यांचे मिथुन । समरस्याचे समाधान । भोगावी जो चिदग्ग्न -।भुवनदिवा ।।६।।




Saturday, August 7, 2021

साचचि बोलाचे नव्हे हे शास्त्र । पै संसारु जीणते हे शस्त्र । आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरे इये ।। श्लोक २० (५७६)

खरोखर गीता हे (नुस्ते) शब्द पांडित्याचे शास्त्र नाही तर हे गीता, संसार जिंकणारे शास्त्र आहे .( फार काय सांगावे ) या गितेची हि अक्षरे , आत्माला प्रकट करणारे मंत्र आहेत  

Friday, August 6, 2021

म्हणुनिया रिकामे तोंड । करू गेले  बडबड । कि गीता ऐसे गोड  । आतुडलें ।। २१।। नमन 

म्हणून माझे रिकामे (शास्त्र वगरे न पढलेले ) तोंड बडबड करू गेले , तो त्या  बोलण्यात गीते सारखे म्हणजे ब्रह्म रसाने भरलेले , गोड शास्त्र सहज सापडले. 

Wednesday, August 4, 2021

 पाहेपा भरोवरी आघवी । मेघ चातकासी रिचवि । मज लागी गोसावी। तैसे केले ।। २०।। नमन 

पहा चातक पक्षाकरीता  मेघ  जसा आपल्यातीळ सर्व पाण्याच्या सामग्रीची वृष्टी करतो त्याप्रमाणे सद्गुरूंनि   माझ्या करि ता  केले आहे (त्यांनी आपल्या कृपेचा सर्व साठा माझ्यात ओतला )

Friday, February 5, 2021

सार्थ ज्ञानेश्वरी : संपादक शंकर वामन दांडेकर 
अध्याय १५ नमन 
आता हृदय हे आपुले । चौफ़ळुणिया भले । वरी बैसवू पावले । श्री गुरूंची ।।१।।ऐक्य भावांची अंजुळी । सर्वेंद्रियकुडमुळे । भरुनीया पुष्पांजली अर्घु  देवो ।।२।।
अनन्योदके धुवट । वासना जे तनिष्ठ । ते लागलेसे अबोट ।चन्दनाचे  ।।३।।
प्रेमाचेनि भांगारे । निर्वाळुनी नूपुरे । लेवऊ सुकुमारें पदे तिये ।।४।।
घणावली आवडी । अव्यभिचारे  चोखडी । तिये घालू जोडी । आंगोळीया  ।।५।।
आनंदामोद  बहळ । सात्विका चे मुकुल । ते उमलले अष्टदळ  । ठेऊ वरी ।।६।। 
तेथे अहं हा धूप जाळू । नाहंतेजेवोवाळू । साम्रस्ये पोटाळू । निरंतर ।।७।।
माझी ताणू आणि प्राण । इया दोनी पाऊवा लेवू । श्री चरण । करू भोगमोक्षनिंबलोण । पाया तया ।।८।। 
इया गुरुचरणसेवा । हो पात्र तया दैवा । जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ।।९।।


आता आपल्या शुद्ध अंतःकरणाचा चौरंग करून त्यावर श्रीगुरुंच्या पावलांची स्थापना करू ।।१।।
श्री गुरु व आपण एक आहोत , अश्या एक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत , सर्व इंद्रियारुपी कमळकळ्या भरून, त्या पुष्पांजळी चे अरंघ्या  श्री गुरूंच्या चरणा वर देउ .।।१।।
ऐक्य भावांची अंजुळी । सर्वेंद्रियकुडमुळी  भरुनीया । पुष्पांजली  अर्घु देवो ।।२।।
श्री गुरु  व आपण एक आहोत  . अशा ऐक्यतेच्या  समजूतरूपी ओंजळीत सर्व इंद्रियरूपी कमळ कळयां भरून , त्या पुष्पांजळी चे अर्घ  श्रीगुरूंच्या चरणावर देऊ ।।२।।
अननयॊदके धुवट \। वासना जे तननिष्ठ । ते लागलेसे अबोट । चंदनाचे ।।३।।
एक निष्ठारूप स्वछ पाण्याने स्नान घालून श्री गुरूंच्या विषई असलेली वासना , तेस श्रीगुरुस गंधाचे बोट लावू .।।३ }}
(श्री गुरूंविशई चे) प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घाघरांचे वाळे सद्गुरुंच्या सुकुमार पायात  घालू ।।४।।
अनन्यतने  शुद्ध झालेले सद्गुरुविषयीचे दृढ प्रेम , हीच कोणी  जोडवी ती सद्गुरुंच्या पायाच्या अंगठ्यात घालू ।।५।।
आनंदरुपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमळलेली कमळ कळी हेच कोणी एक आठ पाकळ्यांचे कमळ ते सद्गुरूच्या पायावर वाहू .||६।। 
देहादिकांचा अभिनिवेश घेणारी जी अहंवृत्ती , हाच कोणी एवरून क धूप तो श्री गुरुचरणां जवॅळ  जाळू  .या देहादिकांपैकी मी कोणी  नाही , अशी जी  उत्पन्न झालेली निराभिमान बोध वृत्ती , हेच कोणी तेज त्या तेजाने 
श्री गुरूस ओवाळू व त्या सद्गुरुचरणास तदाकार्तेने नेहमी आलिंगन देऊ .
। ।७।।
श्री  गुरूंच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण (स्थूल देह व लिंग देह ) या दोन खडावा करून घालू व ऐहिकपार्त्रिक भोग व मोक्ष हे श्री गुरुचणावरून उतारा म्हणून ओवाळून टाकू .।।८।।
ज्याच्या  योगाने धर्म अर्थ काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थाच्या सिहासनावर राज्याभिषेक होतो ,  त्या दैवास या श्रीगुरूंच्या चरणाच्या उपासनेने आम्ही  योग्य होतो ।।९।।