Tuesday, December 15, 2020

नळीकेवरुनी उठिला । जैसा शुक शाखे बैसला ।तैसा मूळ अहंते वेढीला । तो म्हणौनीया ।।३०२।।अ १४ श्लोक २०

जैसा रघु नळीकेवरून उठून (मोकळेपणाने) झाडाच्या फांदीवर बसावा , तसा तो देहअहंता सोडून स्वरूप(ब्रह्म) हेच मी आहे,, अश्या स्वरूपअहंतेने तो वेष्टिला गेला. 
आता निर्गुण असे आणिक । ते तो जाणे अचूक । जे ज्ञाने केले टीक । तयाचीवरी ।।३००।। अ  १४ श्लोक २०

आता निर्गुण म्हणून आंणखी आहे ; ते तो बिनचूक जाणतो . कारण कि ज्ञानाने आपले (राहण्याचे) ठिकाण त्याच्याच ठिकाणी केले आहेय. 

  







Monday, December 14, 2020

नाईकणे ते कांनचि वाळी ।ना पहाणे ते दिठीचि गाळी । अवाच्यते टाळी । जिभची गा ।।२०९।।

 जे ऐकू नये , ते कांनच वर्ज करतात ; जे पाहू नये , ते दृष्टीच टाकून देते ; ज्याचा उच्चर करू नये ते जीभच टाळते .  

Sunday, December 13, 2020

पैं राजतम् विजयें । सत्व गा देही इये ।  वाढता चिन्हे तिये ।ऐसी  हो ती ।।४।।अ १४श्लोक १५

बाबा अर्जुना रजोगुण व तमोगुण यांच्यावर जय मिळवून जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी असतात . 


Wednesday, December 9, 2020


तरी सत्वंरजतम् । तिघांसीही हे नाम । आणि प्रकृती जन्म । भूमिका यया ।।३८।।

तरि सत्वं  राज  तम् या तिघांनाही गुण  म्हणतात आणि प्रकृती हि त्यांची जन्मभूमी आहे.  

Thursday, December 3, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 
निवडया क ओव्या :
गुण  ते कैसे किती । बांधती  कवणे  रीती । नातरी गुणातिती । चिन्हे काई ।।३६।। अ १४ 


गुण ते कसे व किती आहेत व ते (आत्म्याला)  कोणत्या प्रकाराने बांधतात , अथवा गुणातीताची लक्षणे काय आहेत  . 

Tuesday, December 1, 2020

दिसो परतत्व डोळा । पाहो सुखाचा सोहळा । रिगो महाबोधसुकाळा - । माजी विश्व ।।११६१।।

 पॅरब्रहमा( सर्वांच्या )डोळ्यांना  दिसो , सुखाचा उत्सव उदयास येवो  व सर्व जाग ब्रह्मज्ञान्याच्या विपुल्तेत  प्रवेश करो .