Saturday, October 31, 2020

बेडूक  सापाच्या तोंडी । जातअसे सबुडबुडी । तो मक्षिकाचिया  कोडी । स्मरेना काही ।।७३०।। अ १३ श्लोक ११

बेडूक सापाच्या तोंडात सगळा  गिळला जात असतांनाही माशाचे समुदाय तो गिळतो पण आपण मारतो , हि आठवण त्याला नसते; 

Monday, October 26, 2020

तयाच्या ठाई उदंड । अज्ञान असे वितंड । जो चांचल्ये भावंडं । मार्केटाचे ।। ६९१।।अ १३ श्लोक ११

जो चांचलपणाने माकडाचे भावंडं आहे ; त्याच्या ठिकाणी मोठे अज्ञान पुष्कळ आहे . 

Sunday, October 25, 2020

तैसे ज्ञान  जेथ नाही । तेचि अज्ञान पाही| तरि सांगो काही काही । चिन्हे तिये ।। ६५५।।अ१३ श्लोक ११

त्याप्रमाणे जेथे ज्ञान नाही , तेच अज्ञान समाज .  तरी पण मी काही काही लक्षणे सांगतो . 

Friday, October 23, 2020

करतळावरी वाटोळा । डोलूंतू देखिजे आवळा ।तैसे ज्ञान आम्ही डोळा । दाविले तुज ।।६५१।।अ १३ श्लोक ११

तळहातावर डोलत असलेला आवळा  जसा सर्व अंगानी पूर्णपणे दिसतो, त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पस्ट दिसेल असे ज्ञान दाखविले . 

Thursday, October 22, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर ;

आणि मी वाचूनि काही| आणिक गोमटे नाही । ऐसा निश्चयोचि  तिही । जायचा केला ।।६०३।।अ १३ श्लोक १० 

आणि माझ्या  शिवाय दुसरे काहीच  नाही, असा ज्याच्या तिघांनीं (कायेने वाचेने व मानाने)निश्चय केलेला आहे;

Tuesday, October 20, 2020

वत्सा वरुनि  धेनूचे । स्नेह राना  न वाचे । नव्हती भोग सतियेचे प्रेमभोग ।।४८६।। अ १३ श्लोक ७ 

गाय जरी रानात गेली , तरी तिचे वासरावरील प्रेम रानात जात नाही . सतीजणाऱ्या स्त्रीचे भोग ,(म्हणजे वस्त्रालंकारादि उपचार, ) ते प्रेमाचे भोग नसतात कारण तिचे लक्ष पतीकडे लागलेले असते , ते भोगा कडे येत नाही ;
देह तरी वरिलीकडे। आपुलिया परी हिंडे ।परी बैसका  ना मोडे । मानसीची ।।४८५।। अ १३ श्लोक ७

त्या पुरुषाच्या देह तर वरच्या दृष्टीने पहिले असता आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो ; परंतु मनातील विचारांची स्थिरता बिघडत नाही. 

Monday, October 19, 2020

शिवतले गुरुचरणी \ भलते जे पाणी तया तीर्थयात्रे आणी । तीर्थे त्रैलोकीची  ।।४४८।। अ १३ श्लोक ७

ज्या कोणत्याही पाण्यालाश्रीगुरुचरणाचा स्पर्श झाला  आहे त्या पाण्याला तीर्थ असे समजून , त्रैलोक्यातील तीर्थे त्या पाण्यात आली आहेत असे तो समजतो. 

Sunday, October 18, 2020

जयाचे वक्त्र । वाहे गुरुनामाचे मंत्र| गुरुवाक्यावाचूनि शास्त्र । हाती ना शिवे ।।४४७।।

ज्याचे मुख गुरुनामाचा मंत्र धारण करते व गुरुवाक्या वाचून दुसऱ्या शास्त्राला हात लावीत नाही,

Wednesday, October 14, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन दांडेकर 
निवडक ओव्या : 
इये शरीरीची  माती  । मेळवीन तिये क्षिती । जेथ श्रीचरण  उभे ठाती । आराध्याचे ।।४३१।। अ १३ श्लोक ७

जेथे पूजनीय श्रीगुरूंचे चरण उभे राहतील त्या जागी मी या (माझ्या) शरीराची माती मिळवीन . 

Sunday, October 11, 2020

तिये करोनि येतसे वारा । देखोनि धावे सामोरा । आड पडे म्हणे घरा ।बीजें  कीजो ।। ३७५।। अ १३ श्लोक ७

गुरुच्या देशाकडून जो वारा येत असेल , त्या वाऱ्याला पाहून जो त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो 'आपण माझ्या  घरी यावे. '
गुरुगृहे जिये देशो । तो देशुची वसे मानसी । विरहिणी का जैसी । वल्लभाते|| ३७४।। अ १३ श्लोक ७


 ज्याप्रमाणे विरहिणी च्या चितात  प्रियकर  असतो , त्याप्रमाणे ज्या देशात  गुरूंचे घर  असते ,तो देश ज्याचा  मनामध्ये  असतो 

Friday, October 9, 2020

म्हणौनि   मनपण  मोडे । तैं  इंद्रिये  आधीच उबडे । सुत्राधारेंविण साईखडे  वावो जैसे  ।।३०१।। अ १३ श्लोक ७

म्हणून ज्याप्रमाणे सुताच्या  दोरीने हलणारी बाहुली   सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते ,तसे मनाचा मनपणा नाहीसा होतो त्या ,  आगोदरच इंद्रियांची कर्म  करण्याची शक्ती बंद पडते 


Tuesday, October 6, 2020

 तैसे प्राणियांसी होये \ जरी तो वास पाहे । तया अवलोकनाची सोये । कूर्मीही नेणे  ।।२७६।। अ १३ श्लोक ७


त्याप्रमाणे त्याने जर कोणा  प्राण्यांकडे पाहिले तर तसे होते . त्या पाहण्याचा प्रकार कासवी  सुद्धा जाणत नाही .  

Sunday, October 4, 2020

 https://drive.google.com/file/d/1wWe73y6enT7AhZmhGveJuMHcdmz3zgJc/view

Saturday, October 3, 2020


तरि चंद्रबिंबोनि धारा । निघती  नव्हती गोचरा । परि  एक्सरे चकोरा । निघती दोंदे ।।२७५।। अ १३ श्लोक ७

तर चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी निघताना डोळ्यांना दिसत नाहीत , परंतु त्या धारांच्या  योगाने चकोर पक्षी पुष्ट होतात ।।२७५।।

Friday, October 2, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन दांडेकर ;

तैसे साच आणि मावाळ । मिटले परि  सरळ  । बोले जैसे कल्लोळ । अमृताचे ।।२६९।। अ १३ श्लोक ७

त्याप्रमाणे खरे आणि कोणास न खुपणारे, मोजके परंतु सरळ ; त्याचे बोलणे म्हणजे जशा काही  अमृताच्या लाटाच.