Wednesday, September 30, 2020

n
https://drive.google.com/file/d/1sU9v5IkdHMBkwmKm_mzL_wIAsqEkUCkM/view?usp=drivesdk
Smt। Shailatai Paithankar 
Pravachan on Gnyanneshwari 

Monday, September 28, 2020

 मुंगीये मेरू नोलांडवे ।  मशका   सिंधू  न  तरवे ।  भेटलिया  न  करवे  । अतिक्रमू  ।। २५९ अ १३ श्लोक ७


 मुंगिला  ज्या प्रमाणे मेरू  मेरुपर्वताचे   उल्लंघन करता येत नाही , चिलटाला ज्याप्रमाणे समुद्र तरुन  जाता  येत नाही , त्याप्रमाणे कोणताहि  प्राणी भेटला असता ,  त्याच्याने त्याचे  उल्लंघन   करवत  नाही . 


पुढां  स्नेह पाझरे ।  मागा  चालती अक्षरे। शब्द पाठी अवतरे  ।  कृपा आधी ।।२६२।। अ १३ श्लोक ७


(तो कोणाशी बोलत असता)पुढे प्रेम पाझरते व मागून अक्षर चालतात आणि कृपा आधी प्रकट  होते व शब्द मागून प्रकट होतात . 




 


 

Sunday, September 27, 2020

Thursday, September 24, 2020

का कमलावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुचुंबेल  केसर । इया  शंका ।।२४७।। अ १३ श्लोक ७

 अथवा भ्रमर जसे कमळावर कमळातील  बारीक तंतू चुरगळतील या शंकेने नाजूक रीतीने पाय  ठेवतात . 


 तैसे परमाणू पा  गुंतले । जाणुनी जीव सानुले । कारुण्यामाजी  पाऊले । लपवूनि  चाले ।।२४८।। अ १३ श्लोक ७

त्याप्रमाणे परमाणूंमध्ये लहान जीव आहेत , असे जाणून दयेमध्ये आपली पावले लपवून चालतो . 


Wednesday, September 23, 2020

माझं असतेपण लोपो \नावरूप हरपो ।मझ झणे वासिपो । भूतजात  ।।१९७ ।। अ १३ श्लोक ७

मी एक अंमका आहे  , अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवण होऊ नये , माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळ्या समोर येऊ नये , कदाचित मला पाहून प्राणिमात्र भीतील ; तर तसे होऊ नये ;

Monday, September 21, 2020

पूज्यता डोळा ना देखवी ।स्वकीर्ती कानी नायकावी । हा अमुका ऐसे नोहावी । सोची लोका ।।।८८।। अ १३ श्लोक ७

आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये ,आपली कीर्ती आपण कानांनी ऐकू नये हा एक अमुक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये . 

Sunday, September 20, 2020

 जयाचेनि उजाळें  \ उघडती  बुद्धीचे डोळे \  जिवू  दोंदावरी लोळे \ आनंदाचिया  ।। १७३ ।।अ १३  श्लोक ६
ज्या ज्ञाननाचा प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते  व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो .  

Friday, September 18, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी शंकर वामन दांडेकर :

अगा  मुखमेळवीन  पिलियांचे पोषण \ करी निरीक्षण \ कुर्मी जेवी ।।१४० ।। अ १३ ।। श्लोक ६

अरे  अर्जुना , कासवी  ज्या प्रमाणे आपल्या पिलांचे पोषण मुख लावल्याशिवाय नुसत्या पाहण्याने  करते ।


पार्था तियापारी आत्मसंगती इये शरीरी| सजीवत्वाचा करी । उपेगु जडा ।।१४१।।

याप्रमाणे अर्जुना ,  या शरीरात आत्मसंगती हे जडला चेतनदशेला आणते . 

Thursday, September 17, 2020

             सार्थ ज्ञानेश्वरी  शंकर वामन दांडेकर:


तैसी छत्तीसही इये तत्वे \मिळती जेणे एकत्वें \ तेणे समूहपरत्वे क्षेत्र म्हणिपे । श्लोक ६ (५५) अ  १३


त्या प्रमाणे हि छत्तीस तत्वे ज्या एकत्वाने जमा होतात ,त्या समुदाय परत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते \ 



                                                                                                               

Friday, September 11, 2020

सर्व विद्याचे आश्रय स्थान जे आत्मरुप गणेशाचे स्मरण,तेच श्री गुरूंचे श्रीचरण होत। त्यांस नमस्कार करू। ज्या श्रीगुरूंचराणांच्या स्मरणाने शब्ध श्रुस्टी स्वाधीन होतें( म्हणजे शब्दमात्रांवर प्रभुत्व येऊन मनात स्फुरणारे विचार योग्य शब्दांनी स्पस्ट सांगण्याचे सामर्थ्य येते) व सकळ विद्या जिव्हेवर येतात; विकतृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर, असे म्हणते व नवरस हे वक्ततृवतील शब्दांची सेवा करतात;3 निरनिराळया तत्व्वतील फरक दाखवून अभिप्राायाची स्पष्टता करणारी जी मारमिक ती सर्वांच्या सर्व  स्वााधीन होते. जेंव््हा हृदय गुरुन चे पाय धरून एवढे देव प्राप्त होते.5