Saturday, January 28, 2017

कृष्णा विष्णू हरी गोविंद / या नामाचे निखळ प्रबंध / माजी आत्म चर्चा विशद / उदंड गाती //२१०//अ ९

ते महात्मे  कृष्णा विष्णू हरी गोविंद या नामाचेच केवळ कथन करतात व मधून मधून स्पस्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात . 

Wednesday, January 25, 2017

तो मी वैकुंठी नसे /एक वेळ भानुबिंबिही न दिसे / वारी योगियांचीही मानसे / उमरडोनी जाय //७//
परी तया पाशी पांडवा / मी हारपला गिवसावा / जेथ नामघोषु करती ते माझे //८//अ ९

तो मी एकवेळ वैकुंठात  नसतो एक वेळ या सूर्य  बिंबातही   असतं  नाही . या शिवाय मी एकवेळ योग्यांची  ह्रदय देखील उल्लंघन करून जातो . परंतु  अशा  रीतीने मी जरी हरवलो असलो , तरीपण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्यांजपाशी अर्जुना, मला शोधावा . 

Tuesday, January 24, 2017

एर्हवी मी तरी कैसा / मुखाप्रति भानु का जैसा / कही नसे न दिसे ऐसा / वाणी चा नव्हे //६३//अ ९

तसे पहिले तर मी कसा (सुलभ) आहे ? तर तोंडासमोर जसा सूर्य तसा मी सर्वाना सदा समोर आहे ; पण तो सूर्य केव्हा (रात्री) नसतो म्हणून दिसत नाही केव्हा  केव्हा (दिवसा) दिसत नाही असा त्याच्यात कमीपणा आहे माझ्यात नाही.  

Monday, January 23, 2017

तैसा  हृदयामध्ये मी रामु / असता सर्वसुखाचा आरामु / की भ्रांतासी कमु विषयवरी //६०// 

त्याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा  जो मी राम , तो मी (सर्वांच्या ) हृदयात असतांना (त्या मला न जाणून ) मूर्ख लोक (सुखाकरिता) विषयांचीच  इच्छा  करतात . 

Monday, January 9, 2017

पाहे पा दूध पवित्र आणि गोड / पासी त्वचेचिया पदराआड /परि तेअव्हेरूनि गोचिड / अशुद काय नेघती  // ५७// अ ९

असे पहा दूध हे पवित्र असून शिवाय गोड आहे व ते जवळच (सडांच्या )  कातडीच्या पादारापलीकडे आहे  परंतु गोचीड ते टाकून देउन रक्त पीत नाही काय ?