Wednesday, September 21, 2011

श्री ज्ञानदेव वंदन

 
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत /
तो सत्काविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत //१//
स्मरण तयाचें होतां साचे चित्ती हर्ष न मावे /
म्हणुनी  वाटते पुन्हा पुन्हा  ते पावन चरण नमावे //२//
 
 
माझिया कीर्तीविण / जयाचे रिते नाही श्रवणं / जया सर्वांगी भूषण / माझी सेवा //७०//

Tuesday, September 20, 2011


जैसा निर्वातीचा दीपु / सर्वथा नेणे कंपु / तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपु / योगयुक्तु // ४१//
ज्याप्रमाणे निवार्याच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही , त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिरबुद्धीने राहतो //४१//

Thursday, September 8, 2011

तैसे हृदय प्रसन्ना  होये  / तरी दुःख कैचे के आहे / तेथ आपैसे बुद्धी राहे / परमात्मरूपी //३४०//
त्याप्रमाणे अन्तःकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले  आणि कोठले ? त्या वेळी परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी बुद्धि सहजच स्थिर होते.










Monday, September 5, 2011

देखे अखंडित प्रसन्नता / आथी जेथ चित्ता / तेथ रिगणे नाही समस्तां / संसार दुःखां //३८//

पाहा, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते , तेथे कोणत्याही संसार -दुःख चा प्रवेश होत नाही .  


जैसे अमृताचा निर्झरु / प्रसवे जायचा जठरु / तया क्षुधेतृशेचा अडदरु / काहीचि नाही //३९//

ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो  त्याला तहान भूकेची भीती कधी नसते.

Friday, September 2, 2011

परि कर्मफळी आस न करावी / आणि कुकर्मी संगति न व्हावी / हे सत्क्रिया चि आचरावी हेतूविण //२६६ (२)
परंतु कर्मफलाच्या ठिकाणी आशा ठेवू नये आणि निषिद्ध कर्म करण्याविशहि प्रवृत्ती होऊ देऊ नकोस ; हा सदाचारच निष्काम बुद्धी ने आचरावा.