Tuesday, December 27, 2011

हें शब्देविण संवादिजे / इंद्रिया नेणतां भोगिजे / बोला आदी झोंबिजे / प्रमेयासी //१०२//

जे अपेक्षिजे विरक्ती / सदा अनुभविजे संती / सोहंभावे पारंगतीं/ रमिजे जेथ //१०३//


Wednesday, September 21, 2011

श्री ज्ञानदेव वंदन

 
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत /
तो सत्काविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत //१//
स्मरण तयाचें होतां साचे चित्ती हर्ष न मावे /
म्हणुनी  वाटते पुन्हा पुन्हा  ते पावन चरण नमावे //२//
 
 
माझिया कीर्तीविण / जयाचे रिते नाही श्रवणं / जया सर्वांगी भूषण / माझी सेवा //७०//

Tuesday, September 20, 2011


जैसा निर्वातीचा दीपु / सर्वथा नेणे कंपु / तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपु / योगयुक्तु // ४१//
ज्याप्रमाणे निवार्याच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही , त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिरबुद्धीने राहतो //४१//

Thursday, September 8, 2011

तैसे हृदय प्रसन्ना  होये  / तरी दुःख कैचे के आहे / तेथ आपैसे बुद्धी राहे / परमात्मरूपी //३४०//
त्याप्रमाणे अन्तःकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले  आणि कोठले ? त्या वेळी परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी बुद्धि सहजच स्थिर होते.










Monday, September 5, 2011

देखे अखंडित प्रसन्नता / आथी जेथ चित्ता / तेथ रिगणे नाही समस्तां / संसार दुःखां //३८//

पाहा, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते , तेथे कोणत्याही संसार -दुःख चा प्रवेश होत नाही .  


जैसे अमृताचा निर्झरु / प्रसवे जायचा जठरु / तया क्षुधेतृशेचा अडदरु / काहीचि नाही //३९//

ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो  त्याला तहान भूकेची भीती कधी नसते.

Friday, September 2, 2011

परि कर्मफळी आस न करावी / आणि कुकर्मी संगति न व्हावी / हे सत्क्रिया चि आचरावी हेतूविण //२६६ (२)
परंतु कर्मफलाच्या ठिकाणी आशा ठेवू नये आणि निषिद्ध कर्म करण्याविशहि प्रवृत्ती होऊ देऊ नकोस ; हा सदाचारच निष्काम बुद्धी ने आचरावा.



Monday, August 22, 2011

आपणया उचिता / स्वधर्मातेची  राहाटता / जे पावे  ते निवान्ता / सहोनी जावे //२८//
आपल्याला  योग्य असे जे स्वधार्माचे आचरण , तेच करीत असताना जो प्रसंग येईल , तो मुकाट्याने सहन करावा. (२२८)

Friday, August 19, 2011


प्रज्ञाप्रभातसूर्या / सुखोदया //
ऊँ नमोजी आद्या /    वेदप्रतिपाद्या /
जय जय स्वसंवेद्या
  आत्मरुपा //
  नमन : अद्याय १४          
 जय जय आचार्या / समस्तसुरवार्या /  प्रज्ञाप्रभातसूर्या / सुखोदया // १//
जय जय सर्वविसावया/   सोऽहंभावसुहावया / नाना लोक हेलावया / समुद्रा तू //२// 
आईकें गा आर्तबंधू / निरंतरकरुण्यसिंधू / विशदविद्यावधू- वल्लभा जी //३//
           

Wednesday, July 13, 2011

सुखी संतोषा न यावे / दुखी विषादा न भजावे / आणि लाभालाभ न धरावे / मनामाजी //२२६//(२).
सुखाच्या वेळी संतोष माणू नये .  दुखाच्या वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानी मनात धरू नये .(२२६) (२)


जैसे मार्गेचीचालतां / अपावो न पवे सर्वथा / कां दीपाधारें वर्ततां / नाडळिजे (2) //८७//
ज्या प्रमाणे सरळ रस्त्यांनी चालले असतां मुळीच अपाय पोचत नाही .  किंवा दिव्याचा आधारानें चालले असतां ठेंच लागत  नाही. (२) (१८७)


तयापरी पार्था / स्वधर्मे राहाटतां / सकळकामपूर्णता सहज होय //८८//
त्याप्रमाणे पार्था स्वधर्माने वागले असतां, सर्व इच्छा  सहजच पुर्या होतातात //१८८//(२)


उपजे ते नाशे / नाशले पुनरपि दिसे / हे घटिकायं त्र तैसे / परिभ्रमे गा //१५९ (२)//
जे उत्पन्न होते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते //१५९ (२)//








Saturday, July 9, 2011

का आपुला ठावो न सांडिता / आलिंगिजे चंदू प्रगटतां / हा अनुरागु भोगितां / कुमुदिनी जाणे //६०// (१)


किंवा चंद्र दिसू लागतास चंद्रविकसि कमलिनी प्रफुल्ल होवून, आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते.(१)(६०)

Friday, July 1, 2011

तेथ हरू म्हणे नेणिजे / देवी जैसे कां स्वरूप तुझे / तैसे हें नित्य नूतन देखिजे / गीतातत्व // ज्ञान....(१) (७१)
त्यावर शंकर म्हणाले," हें देवी, जयाप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही, त्याच प्रमाणे गीतातत्वाचा विचार करावयास जावे, तेव्हा (ते) रोज नवीनच आहे असे दिसते .(१) (७१)

Tuesday, June 28, 2011

तेवीची ऐका आणिक एक / एथुनि शब्दश्री सच्छास्त्रिक   / आणि महाबोधी कोवळीक / दुणावली //  ज्ञां (१) (३४)

याच प्रमाणे येची आणखी एक महती ऐका.  या पासूनच शब्दाच्या संपतीला निर्दोष शाश्त्रीयाता आली व त्यामुळे ब्रह्माज्ञांनाची मृदुता वाढली . (१) (३४)

Thursday, June 23, 2011

हे शब्देविण संवादिजे / इंद्रीये नेणता भोगिजे /  बोलाआदी झोंबिजे / प्रमेयासी //५८ //ज्ञान  ...१

हिची चर्चा शब्दावाचून करावी (मनातल्या मनात   हिचा विचार करावा ) ,इंद्रीयाना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक धाब्दांच्या आगोदर त्यात सांगितलेय सिद्धांताचे आकलन करावे //५८//

जैसे भ्रमर परागु नेती / परी कमळ दळे नेणती / तैसे परी आहे सेविती / ग्रंथी इये // (५९)......(१)
कमळातील पराग भुंगे घेऊन जातात , परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते; या ग्रंथाचे सेवन करण्याची रीत तशी आहे.(५९)....(१)

Tuesday, June 21, 2011

जैसे शारदियेचे चंद्रकळे / माजी अमृतकण कोवळे / ते वेचिती मन मवाळें /चाकोरतलगे //ज्ञानेश्वरी१ (५६)

ज्या प्रमाणे शरदॠतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चाकोरांची पिले मृदु मानाने वेचतात ; 

तियापरी श्रोतां / अनुभवावी हे कथा / अति हळुवारपणा चित्ता आणोणिया //ज्ञानेश्वरी १ (५७)

त्याप्रमाणे चित्त अगदी हळुवार करून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी //                                                                                                                                                                                                                                                                                     
 
A human being is a part of the whole called by us universe, a part limited in time and space. He experiences himself, his thoughts and feeling as something separated from the rest, a kind of optical delusion of his consciousness. This delusion is a kind of prison for us, restricting us to our personal desires and to affection for a few persons nearest to us. Our task must be to free ourselves from this prison by widening our circle of compassion to embrace all living creatures and the whole of nature in its beauty…….Albert Einstein

Monday, June 20, 2011

म्हणोनि जाणतेनो गुरु भजिजे / तेणे कृतकार्य होईजे / जैसे मूळ सिंचने सहजे  / शाखापल्लव संतोषती //  ज्ञानेश्वरी १ (२५)

अहो ज्ञाते पुरुषहो, गुरूला भजावे आणि त्या योगाने कृत्यकृत्य व्हावे / ज्या प्रमाणे झाडाच्या मुळाना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते / 

Thursday, April 21, 2011

                                     करुणाष्टके

                                                         ( श्री समर्थ रामदास स्वामी )
अनुदिन अनुतापे तपलो रामराया / परमदिनदयाळा! नीरसी मोहमाया /
अचपळ मन माझे नावरे आवरीतां / तुजवीण शीण होतो धावं रे धावं आतां //१//

भजनरहित रामा! सर्वही जन्म गेला / स्वजनजनधनाचा    वेर्थ म्यां स्वार्थ केला /
रघुपति मति माझी आपुलीशी करावी / सकळ त्वजुनि  भावें कास तुझी धरावी //२//

तनुमनधन माझे राघवा! रूप तुझे / तुजवीण मज वाटे सर्व संसार वोझे /
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी /अचल भजनलीळा लागली आस तूझी //३//

चपळपण मनाचे मोडीता मोडवेना / सकलस्वजनमाया तोडीता तोडवेना /
घडीघडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा / म्हणुनी करुणा हे बोलते दीनवाचा /४//

जळत हृदय  माझें जन्म कोट्यानुकोटी / मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी /
तळमळ निवविरे राम कारुण्यसिंधु/  षडरिपूकुळ माझें तोडि  याचा समंधु //५//

 तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी /सिणत   सिणत   पोटी पाहिली  वास तुझी 
झडकरी झड घाली धांव पंचानना रे / तुजवीण मज नेती जम्बुकी वासना रे //६//

स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे / रघुपतिविण आता चित कोठे न राहे /
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनी जाती / विषय सकळ नेती मागुता जन्म देती //७//

उपरती मज रामी जाहली पूर्णकामी / सकळजनविरामी  रामविश्रामधामी /
घडी घडी मन आता रामरूपी भरावे / रविकुळटिळका रे आपुलेसे करावे //८//
जय जय रघुवीर समर्थ !






          

Monday, March 28, 2011


श्री ज्ञानेश्वरी गौरव......स्वामी स्वरूपानंद

श्री ज्ञानेश्वरी अमृत्गंगा /
बहुत सुकृते लाभली जगा /
पावन करी अंतरांगा /
अंगपअत्यंगा जीवाचिया //१//
भक्ती भावे करिता स्नान /
निर्मळ होये अंतकरण /
जिवासी परम समाधान /
साक्षात दर्शन शिवाचे //२//
जिवा- शीवा ची  होता भेटी /
मावळोनि ज्ञाता - ज्ञाएआदि  त्रिपुटी /
प्रगटे सोहं- भाव प्रतीति / 
उरे शेवटी ज्ञाप्ती मात्रे //३//







Sunday, March 27, 2011

आत्मानं रथिनं विद्वि शरीरं रथमेव च
बुद्धिं तु सारथिं विद्वि मनः प्रग्रहमेव च \

भौतिक देहरूपी रथामध्ये जीव हा स्वार आहे आणि बुद्धी ही त्याची सारथी आहे . मन लगाम आहे आणि इंद्रिये घोडे आहेत.

Saturday, March 26, 2011

GNYNESHWARI NITYA PATH  ज्ञानेश्वरी नित्य पाठ
                                
                                                                                                                                                
ऊँ नमोजी आद्या /                                     
वेदप्रतिपाद्या /
जय जय स्वसंवेद्या
आत्मरुपा //1//

देवा तूंची गणेश /
सकलमतीप्रकाश /
म्हणे निवृत्तीदास /
अवधारिजो //२//

आता अभिनववाग्विलासिनी /
जे चातुर्यार्थकलाकामिनी /
ते श्रीशारदा विश्वमोहिनी /
नमिली मियां //३//

मज हृदयी सदगुरू /
जेणें तारिलो हा संसारपूरू/
म्हणौनि विशेषे अत्यादरू /
विवेकावरी /४//

या उपाधीमाजी गुप्त /
चैतन्य असे सर्वगत /
ते तत्त्वज्ञ संत/
स्वीकारिती //५//

उपजे तें नाशे /
नाशले पुनरपि दिसे /
हें घटिकायंत्र तैसें /
परिभ्रमे गा //६//

जैसे मार्गे चि चालता /
अपावो न पवे सर्वथा /
कां दीपाधारेवर्ततां /
नाडळिजॆं //७//

तयापरी पार्था /
स्वधर्मे राहाटता /
सकाळकामपूर्णता /
सहजें होंय //८//

सुखी संतोषा न यावे /
दुखी विषादा न भजावे /
आणि लाभालाभ न धरावे /
मनामाजी / 9/

आपणयां उचिता /
स्वधर्मे राहाटतां /
जें पावेतें निवांता /
साहोनि जावे //१०/
contd..in Dnyaneshwari Nitya Path (Page) above.