Monday, January 2, 2023

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक : शंकर वामन दांडेकर 

                          पसायदान 


आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे } पसायदान हे ।।९३।। जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।।९४।। दुरितांचे तिमिर जावो ।विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ।।९५।।
वर्षत सकळ मंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।अनवरत भूमंडळी। भेटतु भूता  ।।९६।। चला कल्पतरूंचे आरव । चेतनाचिंतामणीचे गाव| ।
बोलते जे अर्णव पियूषाचे ।।९७।। चंद्रमे  जे अलांछन । मार्तंड जे ताप हीन  । ते सर्वा हि सदा सज्जन।  सोयरे हो तू।।९८।। किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होउनी तिन्ही लोकी । भाजीजो आदि पुरुखी । अखंडित ।।९९।। आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इये । द्रिष्टद्रिष्ट  विजये ।होआवेजी ।।१८००।।येथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दान पसावो । येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला ।। १।।