Monday, November 28, 2022

 सार्थ ज्ञानेश्वरी संपादक :शंकर वामन दांडेकर 


निवडक ओव्या अठरावा अद्याय :

हा अठरावा अद्ययावो नोहें } हे एकाध्यायी गीताचि  आहे । जै वासरूंची गे दुहे । तैं वेळु  कायसा ।।८४।।
हा अठरावा अध्याय नाही , तर हि एकाद्यायी गीताचं आहे . ज्या वेळेला वा सरूच स्तनाला लागेल ,त्या वेळेला पन्हा सोडण्यास गायीस कितीसा वेळ लागेल ?  ८४


आणि हा ग सव्यसाची । मूर्तीची होऊनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ।। २१८।।श्लोक।। ११।।

आणि अरे अर्जुना , देहाची मूर्तीच होऊन जे कर्म करण्याचा कंटाळा करतात, ते खेडवळ (अज्ञानी) होत . 

वाचे बर्वे कवित्व । कवित्त्वि बर्वे रसिकत्व । रसिकत्त्वि परतत्व । स्पर्शु जैसा ।।३४७।।
जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे व त्या कवित्वात जशी सुरसतेची बहा र असावी व ह्या सुरसतेत ज्याप्रमाणे परमात्मवर्णन् चा  संबंध यावा. 


हे  विहित कर्म पांडव । आपुला अनन्य वोलावा । आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ।।९०६।।श्लोक ४५
अर्जुना , हे विहित कर्म आपले केवळ एकच जीवन आहे, व हे विहित कर्म करणे हेच ,मी जो सर्वात्मक ,त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे. 


अगा जया जे विहित । ते ईश्वराचे मनोगत । म्हणौनि केलिया निभ्रांत । सांपडेची तो ।। ९११।।
अरे अर्जुना ज्याला जे विहित कर्म सांगितलेले आहे तेच त्याने करावे असेइश्वराचे मनोगत आहे ;म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर नि:संशय प्राप्त होतो. 


तया सर्वात्मका ईश्वरा ।स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपरा । तोषालागीं ।।९१७।। श्लोक ४६ अ १८
हे वीरा अर्जुना ,त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता , ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते.  


हे गीता नाम विख्यात । सर्व वाङ्मयाचें मथित । आत्मा जेणे हस्तगत । रत्न होय ।।१३२३।। श्लोक ६३ अ १८
हे गीता नावाने प्रसिद्द असलेल्या सर्व वाङ्मयाचें सार आहे व ज्याच्या योगाने आत्मरुपी रत्न स्वाधीन होते . 


मन्मना भव मद भक्तो माध्याजी माम नमस्कुरु । मामेवैष्यसि सत्यम ते प्रतिजा प्रियो-सी मे ।। श्लोक ६५।। अ १८
माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझा भक्त हो,माझे यजन करणारा हो,मला नमस्कार कर; (म्हणजे तू) माझ्याप्रत येशील . तू मला प्रिया असल्यामुळे हे मी तुला प्रतिज्ञेवर सत्य सांगत आहे. 


सर्वधर्मानं परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिश्यामि मा शूच :।।श्लोक ६६।। 

सर्व धर्माचा (धर्माधर्मा चा म्हणजे  त्यांना कारणीभूत असणारे जे अज्ञान ,त्यांचा)त्याग करून मला एकट्यालाच (अद्वैत भावाने) शरण ये (म्हणजे) मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन ; तू शोक करू नकोस . 

सुवर्णमणि सोनया ।ये कल्लोळु जैसा पांणिया । तैसा धनंजया । शरण ये तू ।।१४००।।
अर्जुना सोन्याचा मणि जसा सोन्याला शरण येतो, अथवा लाट जशी पाण्याला शरण येते (ऐक्याला पावते,) त्या प्रमाणे तू मला (अभिन्नत्त्वाने ) शरण ये.  



म्हणौनि मी होऊनि माते ।  सेवणे आहे आयिते । ते करी हाता येते । ज्ञाने येणे ।।१४०५।।
म्हणून मंद्रूप होऊन माझी सेवा (भक्ती) करणे , हि माझी सहज भक्ती आहे. ती माझी सहज भक्ती या ज्ञानाने हस्तगत होईल असे कर.


ऐसे सर्व रूपरूपसें । सर्व द्रीष्टीडोळसै । सार्वदेशनिवासे । बोलिले श्रीकृष्णे ।।१४१७।।
सर्व रूपांच्या योगाने जो रूपवान आहे, सर्व द्रीष्टीच्या योगाने जो डोळस आहे व जो सर्व देशात राहाणारा आहे, त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला सांगितले



हृदया  ह्रुदय एक झाले ।  ये हृदयीचे ते हृदयी घातले । द्वैत न मोडिता केले 
आपणा ऐसे अर्जुनाला|| ।।१४२१।।


तेव्हा आलिंगनाच्या वेळी देवाचे व अर्जुनाचे हृदय एक झाले , देवांनी आपल्या हृदयात असलेला बोध अर्जुनाच्या हृदयात घातला आणि देवा व भक्त हे द्वैत न मोडता देवांनी अर्जुनाला आपल्यासारखे केले. 


मोक्षदानी  स्वतंत्र ।ज्ञानप्रधान हे शास्त्र । येतुलले दुजी सूत्र ।उभारले ।।१४३६।।
हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे . इतकेच दुसऱ्या अद्यायात थोडक्यात सांगितले आहे .



परी वतसाचेनि वोरसे । दुभते होय घरोद्देशें ।जालेपांडवाचेनि मिषें । जगद्द उद्धरण ।। १४६७।।
परंतु वासऱ्याच्या प्रेमाने लाभणारे गायीचे दुभते,जसे घरातील सर्व माणसाच्या उपयोगास येते, त्याप्रमाने अर्जुनाच्या निमित्याने जगाचा उद्धार झाला . 



ते हे मंत्र रहस्य गीता । मेळवी जो माझिया भक्ता । अनन्य जीवना माता । बाळका जैसी ।।श्लोक ६८ (१२)
आई शिवाय बालकाला दुसरे जीवन नाही त्या बालकाची व आईची जशी  गाठ घालून द्यावी त्या प्रमाणे गायत्री मंत्राचे रहस्य सांगणाऱ्या त्या गीतेची माझ्या  भक्तांना ओळख करून देतो . 

तैसी भक्ता गीतेसी । भेटी करी जो आदरेसी । तो देहापाठी मजसी एकचि होय ।।१३।।
(आईचीं  व तिच्याशी अनन्य असणाऱ्या बालकाची जशी गाठ घालून द्यावी )त्या प्रमाणे भक्ताची गीतेशी जो प्रेमाने भेट करील , तो देहपातानंतर मंद्रूपच होईल . 



यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: । तत्र श्रीविजयो भूतिरध्रुवा नीतिर्मतीर्मम ।।७८।।
जेथे योगेश्वर कृष्ण व जेथे धनुर्धर पार्थ असतील , तेथे श्री , विजय ,ऐश्वर्य आणि अढळ नीति हि आहेतच , असे माझे (निष्चित) मत आहे. 


गुरु तेथ ज्ञान । ज्ञानी आत्मदर्शन । दर्शनांनी समाधान । आथी जैसे ।।३६।।
\जेथे गुरु तेथे ज्ञान ,जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन तेथे असे समाधान असते . 



तैसा व्यासाचा मागोवा घेतु । भाष्यकाराते वाट पुसुतु| । अयोग्यही मी न पवतु। के जाईन ।।१७२२।।
त्याप्रमाणे व्यासाचा माग  चंदनाचेनि घेत घेत व भाष्यकारां ना वाट पुसत पुसत मी अयोग्य असलो तरी, तेथे (गीतार्थाच्या ठिकाणी ) प्रेअप्त न होता कोठे जाईन



चंदने वेधली झाडे । जाली चंदनाचेनि पाडे । वशिष्टे मंडली कि भांडे । भानूसी काठी ।।३१।।
चंदनाच्या परिमळाने व्यापिलेली झाडे चंदनाच्या जोडीची झाली ; वशिष्टने सूर्याच्या ऐवजी ,त्याच्या जागी ठेविलेली काठी ,सूर्याशी स्पर्धा करावयास लागली (तिने सूर्या सारखा प्रकाश पाडला . )



कीं बहूना तुमचे केले । धर्म कीर्तन हे सिद्धी गेले । येथ माझे जी उरले ।पाईक पण ।।९२।।
महाराज फार काय सांगावे तुमच्या कृपेने केलेले हे धर्माचे व्याख्यान शेवटला गेले . या ठिकाणी माझा काय तो फक्त सेवकपणाचं उरला.