नमन १६ अं
मावळवीत विश्वभासू । नवल उदयाला चंडांशु ।अद्वयअबजीनी विकाशू । वंदू आता ।।१।।
विशवाच्या आभासाला नाहीसा करणारा व अद्वैत स्थितीरुपी कमळाचा विकास कर् णा रा हा (श्री गुरु निवृत्तीरुपी ) आश्रयाकारक सूर्य उगवला आहे. हा सूर्य आश्चर्यकारक ; कारण लौकिक सूर्य हा उगवला असता जगताचे प्रकाशन करतो व द्वैत वाढवतो . आणि हा श्रीगुरुरूपी सूर्य जगदाभास नाहीसा करतो व अद्वैत स्थिती चा विकास ) करतो त्याला आता आम्ही नमस्कार करतो
जो अविद्या रात्री रुसोनिया ।गिळी ज्ञाइवलतीये नाज्ञानचांदणिया । जो सुदीनु करी ज्ञानिया । स्वबोधाचा ।।२।।
जो (गुरुरूपी) सूर्य, मायेच्या रात्रीच्या नाश करून , ज्ञान व अज्ञानरुपी चांदण्या नाहीश्या करतो व जो ज्ञानी लोकांना अध्यात्म ज्ञानाच्या चांगल्या निरभ्र दीवसाची जोड करून देतो
जेणे विवळतिये सवळे । लाहोनि आत्माज्ञानाचे डोळे । सांडिती
देहाहंतेचि अविसाळे । जीवपक्षी ।।३।।
ज्याचा उदयाने प्रकाशित होणाऱ्या प्रांतकाळी आत्मज्ञानरूपी द्रीष्टी प्राप्त होऊन , जीव रूपी पक्षी "मी देह आहे" अशी समजुतीची घरटी सोडतात .
लिंगदेह कमळाचा । पोटी वेचताया चीदभ्रमराचा बंदिजयाचा । उदैला होय ।।४।।
ज्या श्रीगुरुरुपी सूर्या चा उदय झाला असता ,लिंग देह रुपी कमळाच्या
पोटात (अडकल्या ) मुळे नाश पावणाऱ्या जीव चैतन्य रुपी भ्रमराची
(त्या लिंग देहरुपी कमळाच्या ) बंधनांपासून सुटका होते .
शब्दाअंकांचे चिया आसकाडी । भेद नदीच्या दोही थंडी । आर् डा ते वीरहवेंडी । बुध्दिबोधु ।।५}}
भेदरुपी नदीच्या दोन्ही काठावर बुद्धीला मोह पाडणाऱ्या शास्त्रादिकांचा विसंगतपणा हीच कोण अडचणीची जागा; त्या जागेत एकमेकांचा वियोगाने वेडी होउन बुद्धी व बोध (हेच कोणी चक्रवाक पक्षी ) ओरडणारे .
तया चक्रवाक्यांचे मिथुन । समरस्याचे समाधान । भोगावी जो चिदग्ग्न -।भुवनदिवा ।।६।।