Monday, November 30, 2020

फिटो विवेकाची वाणी । हो कानामना ची जीनी । देखो आवडे ते  खाणी । ब्रह्माविध्येची।।११।।

आत्मानात्मा विवेकाचा कमीपणा  नाहीसा होवो , कानाचे व  मनाचे              जगण्याचे सार्थक होवो   व  वाटेलत्याला ब्रह्मविद्येची खाण बघता  येवो  

Sunday, November 29, 2020

 सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 
निवडक ओव्या : 

तैसा वाविलास विस्तारू ।गीतार्थेसी विश्व भरू ।  आनंदाचे  आवारु । मांडू जागा ।। ११५९।। अ १३  श्लोक ३४ 

या प्रमाणे वाणीच्या विलासाचा विस्तार करू व  गीतार्थाने विश्व भरून टाकू व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू . 


Thursday, November 26, 2020

तेथ सुगरणी उदारे । रसज्ञ आणि जेवणारे ।मिळती मग अवतरे । हातु जैसा ।। १११४९।।अ १३ श्लोक ३४

जेथे उत्तम स्वयंपाकीण असून जेवणारे भोक्ते मिळाले आहेत  तेथे मग जेवण्यास व वाढण्यास हाथ जसा पुठे सरसावतो ;

Wednesday, November 25, 2020

  ते परमतत्व  पार्था । होती ते सर्वथा । जे आत्मानात्मव्यवस्था -। राजहंसु ।। १११४२।।

 अर्जुना असे जे परब्रह्म ते जे सत्पुरुष अनात्म व आत्मा याज विचाराने वेगळे जनाण्यात  राजहंसाप्रमाणे असतात ते पूर्ण होतात 

Tuesday, November 24, 2020

 आनंदु  ना निरानंदु । ऐकू ना विविधु । मोकळा ना बुधु। आत्मपणे ।।१११०।।

तो आत्मा असल्यामुळे आनंद ( सुख ) नाही अथवा आनंदरहित (दुःख) नाही , तो एक नाही अथवा नानाप्रकार चा नाही , तो मुक्त नाही अथवा बद्ध नाही 

Monday, November 23, 2020

सकळु  ना निष्कळु । अक्रियु ना क्रियाशीळु । कृश ना स्थुळु निर्गुणपणे ।।११०७।।

तो (आत्मा) निर्गुण असल्यामुळे भागसहित नाही , अथवा भागर  नाही तो कर्म सहित  नाही अथवा कर्म रहित नाही , तो रोकडा नाही किव्हा लठठहि नाही .  

Sunday, November 22, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 
निवडक  ओव्या :
या देहाची हे दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा । पैं  नित्य सिद्ध आपैसा आनंदीपणे ।।११०६।।अ १३  श्लोक  ३१


या देहाची अशी अव्यवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे कि अनादीपणा मुळे तो (आत्मा) स्वभावतः नित्य व सिद्ध आहे. 



Wednesday, November 11, 2020

हे काळनळाच्या  कुंडी ।  घातली लोणियांची उंडी । माशी पाखु पाखडी    तव हे सरे ।। ११०३।। अ १३ श्लोक ३१


काळरूपी अग्नीच्या रुंडात हा  देह लोण्याचा गोळा घातलेला आहे  व माशी आपले पंख  फडफडावते तितक्या  काळातच हा देह नाश पावतो  


Sunday, November 1, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी   :  संपादक शंकर   वामन दांडेकर 
निवडक ओव्या :

देह तव  पाचाचे जाले । हे कर्माचा गुणी गुंथले । भवतसे चाकी सुदले । जन्ममृत्यूचा ।।११०२।।अ १३ श्लोक ३१

हा देह तर पंच महाभूतांचा बनला आहे व कर्माच्या दोराने गुंफला आहे व जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे