Sunday, February 12, 2017

जैसे कल्पतरू तळवटी /बैसोनि झोळिये पाडी गांठी /मग निदेव निघे किरीटी / दैन्याची करू //३११//अ ९

कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळी ला गाठी मारतो आणि मग अर्जुना तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावयास निघतो . 

Tuesday, February 7, 2017

हे आतबाहेर मिया कोंदले / जग निखिल माझेचि वोतिले / कीं कैसे कर्म तया आले / जी मीचि नाही म्हणती //३०२//
हे सर्व जग आतबाहर माझ्याच रूपाने कोंदून भरले आहे . जग हे केवळ माझेच ओतलेले आहे. परंतु प्राण्याचे कर्म त्याच्या वर कसे ओढवले आहे कि ते मीच (देव) नाही असे म्हणतात . 

Wednesday, February 1, 2017

कां फळलिया तरूची शाखा / सहजे भूमीसी उतारे देखा / तैसे जीवमात्रा अशेखा / खालवती ते //२२५(अ ९)
अथवा पहा कि फळभाराने लगडलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांपुढे ते नम्रपणे लावतात ;