Wednesday, August 1, 2012

. स्वामी माधवनाथ म्हणतात :-...

आपण फार मोठे पुण्य केले म्हणून हा नरजन्म प्राप्त झालेला आहे .  आता मला तर वाटते प्रत्येक क्षणात  ब्रहमानंद आहे .  आपण हा आनंद किती घेऊ शकतो ते पहा .....एक कर्माचा आनंद आहे, एक भक्तीचा आनंद आहे,एक योगाचा आनंद आहे .  ज्ञानाचा आहंद तर अपरंपार आहे .  आपल्यापैकी कोणी एखादा ज्ञानी झाला तर त्याचा आनंद गगनात मावणार नाही .  रामकृष्ण परमहंस , रमण महर्षी, गोंदवलेकर महाराज श्रीधर स्वामी स्वामी स्वरूपानंद या संत मंडळींच्या चेहेर्याकडे आपण पहा कसे शांत तृप्त प्रसन्ना दिसतात . मग ते काय कर्म करीत नाही! रमण महर्षी स्वतः भाजी चिरत शेणाने जमीन सारवत स्वतः केरसुणी घेऊन झाडून काढत स्वैपाक करत. .......राम कृष्ण  आपल्या शिष्यांना भरवत असत.  विवेकानंद-नरेंद्र  १७-१८ वर्षांचे होते.  रामकृष्ण त्यांना मिठाई भरवत असत.. ..