Friday, October 23, 2020

करतळावरी वाटोळा । डोलूंतू देखिजे आवळा ।तैसे ज्ञान आम्ही डोळा । दाविले तुज ।।६५१।।अ १३ श्लोक ११

तळहातावर डोलत असलेला आवळा  जसा सर्व अंगानी पूर्णपणे दिसतो, त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पस्ट दिसेल असे ज्ञान दाखविले . 

Thursday, October 22, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर ;

आणि मी वाचूनि काही| आणिक गोमटे नाही । ऐसा निश्चयोचि  तिही । जायचा केला ।।६०३।।अ १३ श्लोक १० 

आणि माझ्या  शिवाय दुसरे काहीच  नाही, असा ज्याच्या तिघांनीं (कायेने वाचेने व मानाने)निश्चय केलेला आहे;

Tuesday, October 20, 2020

वत्सा वरुनि  धेनूचे । स्नेह राना  न वाचे । नव्हती भोग सतियेचे प्रेमभोग ।।४८६।। अ १३ श्लोक ७ 

गाय जरी रानात गेली , तरी तिचे वासरावरील प्रेम रानात जात नाही . सतीजणाऱ्या स्त्रीचे भोग ,(म्हणजे वस्त्रालंकारादि उपचार, ) ते प्रेमाचे भोग नसतात कारण तिचे लक्ष पतीकडे लागलेले असते , ते भोगा कडे येत नाही ;
देह तरी वरिलीकडे। आपुलिया परी हिंडे ।परी बैसका  ना मोडे । मानसीची ।।४८५।। अ १३ श्लोक ७

त्या पुरुषाच्या देह तर वरच्या दृष्टीने पहिले असता आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो ; परंतु मनातील विचारांची स्थिरता बिघडत नाही. 

Monday, October 19, 2020

शिवतले गुरुचरणी \ भलते जे पाणी तया तीर्थयात्रे आणी । तीर्थे त्रैलोकीची  ।।४४८।। अ १३ श्लोक ७

ज्या कोणत्याही पाण्यालाश्रीगुरुचरणाचा स्पर्श झाला  आहे त्या पाण्याला तीर्थ असे समजून , त्रैलोक्यातील तीर्थे त्या पाण्यात आली आहेत असे तो समजतो. 

Sunday, October 18, 2020

जयाचे वक्त्र । वाहे गुरुनामाचे मंत्र| गुरुवाक्यावाचूनि शास्त्र । हाती ना शिवे ।।४४७।।

ज्याचे मुख गुरुनामाचा मंत्र धारण करते व गुरुवाक्या वाचून दुसऱ्या शास्त्राला हात लावीत नाही,

Wednesday, October 14, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन दांडेकर 
निवडक ओव्या : 
इये शरीरीची  माती  । मेळवीन तिये क्षिती । जेथ श्रीचरण  उभे ठाती । आराध्याचे ।।४३१।। अ १३ श्लोक ७

जेथे पूजनीय श्रीगुरूंचे चरण उभे राहतील त्या जागी मी या (माझ्या) शरीराची माती मिळवीन . 

Sunday, October 11, 2020

तिये करोनि येतसे वारा । देखोनि धावे सामोरा । आड पडे म्हणे घरा ।बीजें  कीजो ।। ३७५।। अ १३ श्लोक ७

गुरुच्या देशाकडून जो वारा येत असेल , त्या वाऱ्याला पाहून जो त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो 'आपण माझ्या  घरी यावे. '
गुरुगृहे जिये देशो । तो देशुची वसे मानसी । विरहिणी का जैसी । वल्लभाते|| ३७४।। अ १३ श्लोक ७


 ज्याप्रमाणे विरहिणी च्या चितात  प्रियकर  असतो , त्याप्रमाणे ज्या देशात  गुरूंचे घर  असते ,तो देश ज्याचा  मनामध्ये  असतो 

Friday, October 9, 2020

म्हणौनि   मनपण  मोडे । तैं  इंद्रिये  आधीच उबडे । सुत्राधारेंविण साईखडे  वावो जैसे  ।।३०१।। अ १३ श्लोक ७

म्हणून ज्याप्रमाणे सुताच्या  दोरीने हलणारी बाहुली   सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते ,तसे मनाचा मनपणा नाहीसा होतो त्या ,  आगोदरच इंद्रियांची कर्म  करण्याची शक्ती बंद पडते 


Tuesday, October 6, 2020

 तैसे प्राणियांसी होये \ जरी तो वास पाहे । तया अवलोकनाची सोये । कूर्मीही नेणे  ।।२७६।। अ १३ श्लोक ७


त्याप्रमाणे त्याने जर कोणा  प्राण्यांकडे पाहिले तर तसे होते . त्या पाहण्याचा प्रकार कासवी  सुद्धा जाणत नाही .  

Sunday, October 4, 2020

 https://drive.google.com/file/d/1wWe73y6enT7AhZmhGveJuMHcdmz3zgJc/view

Saturday, October 3, 2020


तरि चंद्रबिंबोनि धारा । निघती  नव्हती गोचरा । परि  एक्सरे चकोरा । निघती दोंदे ।।२७५।। अ १३ श्लोक ७

तर चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी निघताना डोळ्यांना दिसत नाहीत , परंतु त्या धारांच्या  योगाने चकोर पक्षी पुष्ट होतात ।।२७५।।

Friday, October 2, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन दांडेकर ;

तैसे साच आणि मावाळ । मिटले परि  सरळ  । बोले जैसे कल्लोळ । अमृताचे ।।२६९।। अ १३ श्लोक ७

त्याप्रमाणे खरे आणि कोणास न खुपणारे, मोजके परंतु सरळ ; त्याचे बोलणे म्हणजे जशा काही  अमृताच्या लाटाच. 

Wednesday, September 30, 2020

n
https://drive.google.com/file/d/1sU9v5IkdHMBkwmKm_mzL_wIAsqEkUCkM/view?usp=drivesdk
Smt। Shailatai Paithankar 
Pravachan on Gnyanneshwari 

Monday, September 28, 2020

 मुंगीये मेरू नोलांडवे ।  मशका   सिंधू  न  तरवे ।  भेटलिया  न  करवे  । अतिक्रमू  ।। २५९ अ १३ श्लोक ७


 मुंगिला  ज्या प्रमाणे मेरू  मेरुपर्वताचे   उल्लंघन करता येत नाही , चिलटाला ज्याप्रमाणे समुद्र तरुन  जाता  येत नाही , त्याप्रमाणे कोणताहि  प्राणी भेटला असता ,  त्याच्याने त्याचे  उल्लंघन   करवत  नाही . 


पुढां  स्नेह पाझरे ।  मागा  चालती अक्षरे। शब्द पाठी अवतरे  ।  कृपा आधी ।।२६२।। अ १३ श्लोक ७


(तो कोणाशी बोलत असता)पुढे प्रेम पाझरते व मागून अक्षर चालतात आणि कृपा आधी प्रकट  होते व शब्द मागून प्रकट होतात . 




 


 

Sunday, September 27, 2020

Thursday, September 24, 2020

का कमलावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुचुंबेल  केसर । इया  शंका ।।२४७।। अ १३ श्लोक ७

 अथवा भ्रमर जसे कमळावर कमळातील  बारीक तंतू चुरगळतील या शंकेने नाजूक रीतीने पाय  ठेवतात . 


 तैसे परमाणू पा  गुंतले । जाणुनी जीव सानुले । कारुण्यामाजी  पाऊले । लपवूनि  चाले ।।२४८।। अ १३ श्लोक ७

त्याप्रमाणे परमाणूंमध्ये लहान जीव आहेत , असे जाणून दयेमध्ये आपली पावले लपवून चालतो . 


Wednesday, September 23, 2020

माझं असतेपण लोपो \नावरूप हरपो ।मझ झणे वासिपो । भूतजात  ।।१९७ ।। अ १३ श्लोक ७

मी एक अंमका आहे  , अशी माझ्या अस्तित्वाची कोणास आठवण होऊ नये , माझे नाव अथवा रूप कोणाच्या डोळ्या समोर येऊ नये , कदाचित मला पाहून प्राणिमात्र भीतील ; तर तसे होऊ नये ;

Monday, September 21, 2020

पूज्यता डोळा ना देखवी ।स्वकीर्ती कानी नायकावी । हा अमुका ऐसे नोहावी । सोची लोका ।।।८८।। अ १३ श्लोक ७

आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू नये ,आपली कीर्ती आपण कानांनी ऐकू नये हा एक अमुक मनुष्य आहे अशी आपली लोकांना आठवणच होऊ नये . 

Sunday, September 20, 2020

 जयाचेनि उजाळें  \ उघडती  बुद्धीचे डोळे \  जिवू  दोंदावरी लोळे \ आनंदाचिया  ।। १७३ ।।अ १३  श्लोक ६
ज्या ज्ञाननाचा प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते  व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो .  

Friday, September 18, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी शंकर वामन दांडेकर :

अगा  मुखमेळवीन  पिलियांचे पोषण \ करी निरीक्षण \ कुर्मी जेवी ।।१४० ।। अ १३ ।। श्लोक ६

अरे  अर्जुना , कासवी  ज्या प्रमाणे आपल्या पिलांचे पोषण मुख लावल्याशिवाय नुसत्या पाहण्याने  करते ।


पार्था तियापारी आत्मसंगती इये शरीरी| सजीवत्वाचा करी । उपेगु जडा ।।१४१।।

याप्रमाणे अर्जुना ,  या शरीरात आत्मसंगती हे जडला चेतनदशेला आणते . 

Thursday, September 17, 2020

             सार्थ ज्ञानेश्वरी  शंकर वामन दांडेकर:


तैसी छत्तीसही इये तत्वे \मिळती जेणे एकत्वें \ तेणे समूहपरत्वे क्षेत्र म्हणिपे । श्लोक ६ (५५) अ  १३


त्या प्रमाणे हि छत्तीस तत्वे ज्या एकत्वाने जमा होतात ,त्या समुदाय परत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते \