Sunday, December 7, 2025

sansar dukh

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक: शंकर वामन दांडेकर      
अध्याय दूसरा 

प्रसादे सर्व दुःखानं ह्यानिरसयोपजायतें ।प्रसन्नचेतसो ह्यशु बुद्धि पर्यवतींष्टते ।। ३६५।।

देखे अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिंगणे नाही समस्ता । संसार दुःख ।।३८।।

पहा जेथे चित्ताला  निरंतर प्रसन्नता असते ,तेथे कोणत्याही  संसार दुःखाचा प्रवेश होत नाही . 


जैसे अमृताचा निरझरु । प्रसवे   जायचा जठरु । तया क्षुधे तृषे चा अडदरू । काहिची नाही ।।३९।।

ज्या प्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो ,त्याला 
                                                                  
तहान भुकेची भीती कधी नसते 



तैसै  हृदय प्रसन्न होय । तरी दुःख कैचे के आहे । तेथ आपैसी बुद्धी राहे । परमात्मरूपी ।।४०।।

त्या प्रमाणे अंतःकरण प्रसन्न झाले ,तर मग दुःख कसले आणि कोठले ? त्या वेळी  परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते।


जैसा निर्वातीचा दिपू । सर्वथा नेणे  कंपू   । तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपु ।  योगयुक्तु ।।४१।।

ज्या प्रमाणे निवाऱ्याच्या ठिकाणी असलेल्या दिव्याची ज्योत मुळीच हालत नाही ,त्या प्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरुपी स्थिर बुद्धीने राह








अध्याय तीसरा 

कर्मणैव हि संसिद्धीमास्थिता जनकादयह । लोकसंग्रहमेवापि साम्प्शयन कर्तुमरहसी ।।२०।।

देख पा  जनकादिक । कर्म जात अशेख । न सांडितां मोक्ष सुख पावते  जाहले ।।१५२।|

देखे प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरले । लोकालागीं ।।५५।।

मार्गी अंधासरिसा । पुढे देखणा ही  चाले जैसा । अज्ञाना प्रगटा वा धर्मु तैसा ।आचरोनी|| ५६।।

पहा कर्ममात्रा  चा  मुळीच त्याग न करता जनकादिकांना मोक्षाचे सुख मिळाले . 
पहा मिळवावं याचे ते ज्यांनी  मिळविले व म्हणून निरिछ झाले त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरिता कर्म करणे प्राप्त आहे 
रास्त्याने अंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा  डोळस मनुष्य आंधळ्यास सांभाळून घेऊन , त्याच्या बरोबर चालतो, त्या प्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषाने आपण आचरण कारून  धर्म स्पष्ट करून दाखवावा . 


यद यदाचरति श्रेष्ठस्थत्तदेवेतरो जनः । स यत  प्रमाणं कुरुते लोक स्तदनुवर्तते ।।२१।।









No comments:

Post a Comment