अध्याय दूसरा
प्रसादे सर्व दुःखानं ह्यानिरसयोपजायतें ।प्रसन्नचेतसो ह्यशु बुद्धि पर्यवतींष्टते ।। ३६५।।
देखे अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिंगणे नाही समस्ता । संसार दुःख ।।३८।।
पहा जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते ,तेथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही .
जैसे अमृताचा निरझरु । प्रसवे जायचा जठरु । तया क्षुधे तृषे चा अडदरू । काहिची नाही ।।३९।।
ज्या प्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो ,त्याला
तहान भुकेची भीती कधी नसते
तैसै हृदय प्रसन्न होय । तरी दुःख कैचे के आहे । तेथ आपैसी बुद्धी राहे । परमात्मरूपी ।।४०।।
त्या प्रमाणे अंतःकरण प्रसन्न झाले ,तर मग दुःख कसले आणि कोठले ? त्या वेळी परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते।
जैसा निर्वातीचा दिपू । सर्वथा नेणे कंपू । तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपु । योगयुक्तु ।।४१।।
ज्या प्रमाणे निवाऱ्याच्या ठिकाणी असलेल्या दिव्याची ज्योत मुळीच हालत नाही ,त्या प्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरुपी स्थिर बुद्धीने राह
अध्याय तीसरा
कर्मणैव हि संसिद्धीमास्थिता जनकादयह । लोकसंग्रहमेवापि साम्प्शयन कर्तुमरहसी ।।२०।।
देख पा जनकादिक । कर्म जात अशेख । न सांडितां मोक्ष सुख पावते जाहले ।।१५२।|
देखे प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरले । लोकालागीं ।।५५।।
मार्गी अंधासरिसा । पुढे देखणा ही चाले जैसा । अज्ञाना प्रगटा वा धर्मु तैसा ।आचरोनी|| ५६।।
पहा कर्ममात्रा चा मुळीच त्याग न करता जनकादिकांना मोक्षाचे सुख मिळाले .
पहा मिळवावं याचे ते ज्यांनी मिळविले व म्हणून निरिछ झाले त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरिता कर्म करणे प्राप्त आहे
रास्त्याने अंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस मनुष्य आंधळ्यास सांभाळून घेऊन , त्याच्या बरोबर चालतो, त्या प्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषाने आपण आचरण कारून धर्म स्पष्ट करून दाखवावा .
यद यदाचरति श्रेष्ठस्थत्तदेवेतरो जनः । स यत प्रमाणं कुरुते लोक स्तदनुवर्तते ।।२१।।