Monday, June 10, 2019

Sarth Dnyaneshwari by Shankar Vaman Dandekar.

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर :  निवडक ओव्या अध्याय नववा (९)श्लोक (२६)

येर पत्र पुष्प फळ / ते भाजावया मिस केवळ / वाचूनि  आमु चा लाग निष्कल / भक्तितत्व //९६//अ ९

बाकी पान  फुल फळ यांचे  अर्पण करणे , ते मला भाजण्याचे केवळ निमित्त्य  आहे . वास्तविक पाहिले तर आम्हाला  आवडते असें म्हटले म्हणजे भक्तांच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्तितत्वच  होय . 

Sunday, June 9, 2019

पै भक्ति एकि मी जाणे /तेथ साने थोर न म्हणे / आम्ही भावाचे पाहुणे /भलतेया //९५//(९)

मी ऐक भक्तीच ओळखतो . मग त्या ठिकाणी लहानथोर अशी निवड करीत नाही . आम्ही वाटेल त्याच्या भक्तीरूपी मेजवानीचे पाहुणे होतो . 

Saturday, June 8, 2019

यालागी शरीरसांडोवा कीजे /सकळ  गुणांचे लोण उतरिजे /संपत्तीमदु  सांडिये / कुरवंडी  करुनि //८१//(९)

याकरिता  परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निंबलोण करावे  तसेच संपत्तीचा फुंज ओवाळून टाकून ध्यावा . //८१//(९)

Friday, June 7, 2019

म्हणौनि थोरपण पर्हचि सांडिजे / व्युत्पत्ति आघवी विसरिजे / जै जागा धाकुटे होईजे / तैं जवळीक माझी //३७८// अ ९
एवढ्याकरिता आपले ठिकाणचा मोठेपणा दूर टाकून द्यावा शास्त्रअध्यन केल्याचा फुंज असला तर तो सर्व टाकून, जसे काही आपण शास्त्रअध्यन केलेच नाही , अशी वृत्ती ठेवावी . जगतात अशा प्रकारचा सर्व प्रकारे लहानपण जेव्हा घ्यावा ; तेव्हा माजे सांन्निध्य  प्राप्त होते . 
तैसे लक्षमियेचे थोरपण न सरे / जेथ  शंभूचेही  तप न पुरे /तेथ  येर  प्राकृत  हेंदरे / केवी जाणो  लाहे //३८०// (९)

त्या प्रमाणे लाक्ष्मि चा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे  तपहि  पुरे पडत नाही ,  त्या   मला  (परमात्मा ) सामान्यं व  अजागळ  लोकं कशे जणू शकतील ?

Sunday, February 12, 2017

जैसे कल्पतरू तळवटी /बैसोनि झोळिये पाडी गांठी /मग निदेव निघे किरीटी / दैन्याची करू //३११//अ ९

कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळी ला गाठी मारतो आणि मग अर्जुना तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावयास निघतो . 

Tuesday, February 7, 2017

हे आतबाहेर मिया कोंदले / जग निखिल माझेचि वोतिले / कीं कैसे कर्म तया आले / जी मीचि नाही म्हणती //३०२//
हे सर्व जग आतबाहर माझ्याच रूपाने कोंदून भरले आहे . जग हे केवळ माझेच ओतलेले आहे. परंतु प्राण्याचे कर्म त्याच्या वर कसे ओढवले आहे कि ते मीच (देव) नाही असे म्हणतात . 

Wednesday, February 1, 2017

कां फळलिया तरूची शाखा / सहजे भूमीसी उतारे देखा / तैसे जीवमात्रा अशेखा / खालवती ते //२२५(अ ९)
अथवा पहा कि फळभाराने लगडलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांपुढे ते नम्रपणे लावतात ;

Saturday, January 28, 2017

कृष्णा विष्णू हरी गोविंद / या नामाचे निखळ प्रबंध / माजी आत्म चर्चा विशद / उदंड गाती //२१०//अ ९

ते महात्मे  कृष्णा विष्णू हरी गोविंद या नामाचेच केवळ कथन करतात व मधून मधून स्पस्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात . 

Wednesday, January 25, 2017

तो मी वैकुंठी नसे /एक वेळ भानुबिंबिही न दिसे / वारी योगियांचीही मानसे / उमरडोनी जाय //७//
परी तया पाशी पांडवा / मी हारपला गिवसावा / जेथ नामघोषु करती ते माझे //८//अ ९

तो मी एकवेळ वैकुंठात  नसतो एक वेळ या सूर्य  बिंबातही   असतं  नाही . या शिवाय मी एकवेळ योग्यांची  ह्रदय देखील उल्लंघन करून जातो . परंतु  अशा  रीतीने मी जरी हरवलो असलो , तरीपण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्यांजपाशी अर्जुना, मला शोधावा . 

Tuesday, January 24, 2017

एर्हवी मी तरी कैसा / मुखाप्रति भानु का जैसा / कही नसे न दिसे ऐसा / वाणी चा नव्हे //६३//अ ९

तसे पहिले तर मी कसा (सुलभ) आहे ? तर तोंडासमोर जसा सूर्य तसा मी सर्वाना सदा समोर आहे ; पण तो सूर्य केव्हा (रात्री) नसतो म्हणून दिसत नाही केव्हा  केव्हा (दिवसा) दिसत नाही असा त्याच्यात कमीपणा आहे माझ्यात नाही.  

Monday, January 23, 2017

तैसा  हृदयामध्ये मी रामु / असता सर्वसुखाचा आरामु / की भ्रांतासी कमु विषयवरी //६०// 

त्याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा  जो मी राम , तो मी (सर्वांच्या ) हृदयात असतांना (त्या मला न जाणून ) मूर्ख लोक (सुखाकरिता) विषयांचीच  इच्छा  करतात . 

Monday, January 9, 2017

पाहे पा दूध पवित्र आणि गोड / पासी त्वचेचिया पदराआड /परि तेअव्हेरूनि गोचिड / अशुद काय नेघती  // ५७// अ ९

असे पहा दूध हे पवित्र असून शिवाय गोड आहे व ते जवळच (सडांच्या )  कातडीच्या पादारापलीकडे आहे  परंतु गोचीड ते टाकून देउन रक्त पीत नाही काय ?

Monday, February 8, 2016

मोटके गुरुमुखे उदैजत दिसे / आणि हृदयी स्वयंभचि असे / प्रत्यक्ष फावो लागे तैसे / आपैसया //४९//अ ९

त्याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम , तो मी( सर्वांच्या ) हृदयात असताना (त्या मला न जाणून) मूर्ख लोक (सुखाकरिता ) विषयाचीच  इच्छा  करतात 

Sunday, February 7, 2016

आहो  चंद्रकांतु द्रवता कीर होए / परि  ते हातवटी चंद्रिकी आहे / म्हणौनी वक्ता तो वाक्ताची नोहे / श्रोतेनविन // २९//अ ९

आहो  चंद्रकांतमणि पाझरनारा आहे खरा , परंतु त्याला पाझारावयास लावण्याची  युक्ती चान्द्रमाध्येच आहे( त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा पण त्याला बोलावयास लावण्याची हातवटी श्रोत्यांमध्ये आहे.) म्हणून श्रोत्यान शिवाय वक्ता हा वक्ताच नाहि. 

Saturday, February 6, 2016

येथ एकची लीला तरले / जे सर्व भावे मज भजले / तया ऐलिच थडिये सरले/ मायाजळ //९७// अ ७

या ठिकाणी जे सर्व भावाने मला भजले , तेच एक  ही मायानदी सहज तरुन गेले ; त्यांना मायानादीच्या काठावर तिचे पाणी संपले . 

Saturday, January 30, 2016


सहजे ब्रह्मरसाचे पारणे / केले अर्जुनलागी नारायणे / की तेचि अवसरी पाहुणे / पातलो आम्ही //२//(६)अ
श्रीकृषणानी  अर्जुनास ब्रह्मरसाचे पारणे केले . त्याच समयास आम्ही सहजगत्या पाहुणे प्राप्त झलो // 

Monday, November 2, 2015

ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल / त्यै  मोहांधकारू जाईल / जै गुरुकृपा होईल / पार्था गा // अ ४(७१)
आर्थ: अरे पार्था ज्या वेळी श्रीगुरूंची कृपा होईल त्या वेळी असा ग्यान्प्रकाशाचा उदय होईल ; आणि मग  त्या त्या वेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल .

Friday, October 30, 2015

तरी तनुमनु जीवे / चरणासी लागावे / आणि अगर्वता कराव /  दास्य सकळ // ६७//
अर्थ: ऐवढयाकरिता शरीराने, मनाने व  जीवाने त्याच्या चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा करवि.

 मग  अपेक्षित जे आपुले / तेहि  सांगती  पुसिले / जेणे अंतकरण बोधले / संकल्पा  न ये  //६८// अ ४ श्लो //३४//
मग आपले जे इच्छित असेल , ते त्यास विचारले असता ते  सांगतात ..

Wednesday, October 28, 2015

जे ज्ञानाचा कुरुठा / तेथ सेवा हा दारवंटा / तो स्वाधीन करी सुभटा / वोळगोनी //६६//
अर्थ :कारण ते ज्ञानाचे घर आहेत . त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे ; अर्जुना तू सेवा करून तो स्वाधीन करून घे .  (ज्ञ ४ (३४) (६६))

Saturday, August 8, 2015

तें ज्ञान पै गा बरवे / जरी  मनी आथि आणावे / तरि संता या भजावे / सर्वस्वैशि //अ ४ (३४) (६५)
अर्थ : अरे अर्जुना ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे मनात असेल तर या संतास सर्वस्वेकरुन तू भजावेस //

Thursday, August 6, 2015

एथ एकचि लीला तरले > जे सर्व भावे मज भजले > तया ऐलीच
थडिये सरले > मायाजळ |
अर्थ या ठिकाणी जे सर्व भावाने मला भजले तेच एक ही मायानदी सहज
तरून गेले| ch ७ (१४)९७

Wednesday, August 5, 2015

म्हणोनी  जाणतेनो गुरु भजिजे / तेणें कृतकार्य होईजे / जैसे मूळसिंचने सहजें शाखापल्लव संतोषती //२५// अ १ज्ञाननेश्वारी
अर्थ : एवढ्याकरिता अहो ज्ञाते पुरुषहो गुरूला भजावे आणि त्या योगाने क्रुत्यक्रुत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणि घातले असता अनायासे फांद्या व पाने यानां टवटवी येते .

Sunday, July 6, 2014

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन दांडेकर :निवडक ओव्या :

बालक बापचिये ताटी रीगे / रीगोनि बापतेच जेववू लागे / की तो संतोषलेनी वेगे / मुखची वोडवी //अ९(१५)