Wednesday, June 17, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 

अभ्यासाहुनि  गहन । पार्था  मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ।।४१।। श्लोक १२ अ १२


अर्जुना , मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे , आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे आहे . 

Tuesday, June 16, 2020

माळिये   जेउते नेले  ।तेउते निवांतचि गेले । तया पाणिया ऐसे केले । होआवेगा ।।१२०।।

अरे माळ्याने जिकडे नेले तिकडे  काही एक तक्रार न करता जाणाऱ्या पाण्याप्रमाणे तुझे   जीवित् निरभिमान होऊन कर्म करणारे होऊ दे . 

Monday, June 15, 2020

म्हणौनि अभ्यासासी काही ।सर्वथा दुष्कर नाही । या लागी माझा ठायी । अभ्यासे मिळ ।।१३।। श्लोक ९ अ १२

म्हणून अभ्यासाला कोणतीही गोस्ट मुळीच कठीण नाही , या करीता  माझ्या स्वरूपी तू अभ्यासाने एक रूप हो .  

Sunday, June 14, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन  दांडेकर:
निवडक ओव्या :

आगा अभ्यास योगु म्हणिजे । तो हा ऐकू जाणिजे । येणे काही न निपजे ऐसे नाही ।।११०।।                                  
अरे अभ्यासयोग जे  म्हणतात तो हाच एक  आहे  असे समज  याच्या  योगाने  कोणतीही गोष्ट   होनार  नाही .असे नाही . 

Saturday, June 13, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपावदक शंकर  वामन दांडेकर : 
निवडक ओव्या :


तैसे भोगाआतुनि। चित्त माजमाजी रिगता । हळू  हळू  पांडुसुता  मीचि होईल ।।९।।सं श्लोक ९ अ १२

त्याप्रमाणे भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करता करताअर्जुन, ते तूझे चित्त  हळू हळू  मंद्रूप होईल   . 

Friday, June 12, 2020

मग पुनवेहूनि जैसे।  शशिबिंब दिसे दिसे ।   हारपत अवसे   नाहीचि होय  ।।१०८।। श्लोक ९ अ १२

मग  ज्या प्रमाणे पौर्णिमेपासून  दीवसे दिवस चंद्राचे बिंब  कमी होत होत अमावस्याला अगदी नाहीसे होते 
 मग जे जे का निमिख । देखेल माझे सुख तेतुले आरोचक । विषयी घेईल ।।१०६।। श्लोक ९ अ १२

मग जितके जितके निमिष , तुझे चित्त माझे सुख पाहिलं , तितके तितके तुझे चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल . 
तरी गा ऐसे करी । या आठा पाहारामाझारी । मोटके निमिषभरी । देतू  जाय ।।१०५।।श्लोक ९ अ १२

तर अर्जुना , असे कर कि, या आठ प्रहरामध्ये नेमके निमिषभर (चित्त) मला देत जा  . 

Wednesday, June 10, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक  शंकर  वामान दांडेकर :

अथवा हे चित्त मनबुद्धीसहित ।  माझ्या हाती अचुंबित । न शकसी देवो ।।४।। श्लोक ९ अ १२

अथवा जर  मनबुद्धीसहित हे चित्त माझ्या हाती  (साकळवासना रहित असे ) संपूर्ण तू देऊ शकणार नाहीस 

Wednesday, June 3, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 
  अध्याय बारावा :नमन 

जय जय शुद्धे । उदारे प्रसिद्धे । अनव्रत  आनंदे वर्षतिये ।।१।
विषयव्याळे  मिठी । दीधलीया नुठी ताठी । ते तुझिये गुरुकृपाद्रीष्टी निर्विष होय ।।२।।
तरि कवणाते तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी । जरी प्रसादरसकल्लोळी  । पूरे येसी  तू ।।३।।
योगसुखाचे सोहळे । सेवका तुझेनि स्नेहाळे । सोSहंसिद्धीचे लळे । पाळीसी तू ।।४।।
आधारशक्तीचा अंकी । वाढविसी कौतुकी । हृदयाकाश पल्लकी । परिये देसी निजे ।।५।।
प्रत्यगज्योतीची वॊवाळणी । करिसी मानपवनाची खेळणी । आत्मसुखाची बाळलेणी । लेवविसी ।।६।।
सतरावियचे स्तन्य देसी । अनाहताचा हल्लरू  गासी । समाधिने बोधे निजविसी ।बुझाउनि ।।७।।
म्हणौनी साधका तू माउली। पिके  सारस्वत  तू झा पावली । या कारणे मी साउली न  सँडी तुझी ।।८।।
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी ।  तुझे  कारुण्य जयते   आधष्टी । तो सकळ विध्याची ये सृष्टी  धात्री होय ।।९।।
म्हणौनि आंबे  श्रीमंते । निजजनकल्पलते । आज्ञापी माते । ग्रंथनिरूपणी ।।१०।।



  तू शुद्ध आहेस , तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस . गुरुकृपादृष्टीरुपी माते तुझा जयजयकार असतो . १. 
विषय रुपी सर्पाने दंश केला असता मूर्च्छा येते , ती काहीकेल्यास जात नाही ,हे गुरुकृपादृष्टी , तुझ्या योगाने ती मूर्च्छा नाहींशीं होते आणि जर सर्पदंश झालेल्या (त्या) प्राण्याची त्या (विषय ) विषापासून सुटका होते. २. 
जर प्रसन्नतारूप  पाण्याच्या लाटांची तुला भरती येईल , तर संसाराच्या त्रासाचे (अध्यात्मदि त्रिविध (तापाचे )
चटके कोणाला बसतील ? व खेद कसा बरे जळू शकेल ? ३.  
हे प्रेमळ माते ,भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्या मुळे प्राप्त  होतात व भक्तांची , ते ब्रम्ह मी आहे अशा  स्वरूपस्थितिच्या प्राप्तीची हौस तू पुरवितेस ( ती कशी पुरवितेस हे स्पष्ट  करतात ) ४. 
आधारवि चक्रावर  असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवितेस व त्यांना  झोप येण्याकरिता  हृदयाकाश रुपी पाळण्यात घालून झोके देतेस ५. 
आत्मप्रकाशरूप ज्योती ने साधकरूपी बालकास ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा निरोध करणे हि खेळणी त्यांच्या हातात देतेस व स्वरूपानंदांचे (लहान मुलांना घालावयाचे ) दागिने साधकरूपी  बालकांच्या 
अंगावर घालतेस ६.ती 
सतरावी जीवनकलारुपी (व्योमचक्रातील चंद्रामृतरुपी दूध देतेस आणि अनाहत ध्वनी चे गाणे गातेस , आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून (स्वरूपी) निजवीतेस.७.  
म्हणून साधकांना तू आई आहेस व सर्व विध्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात ; म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही.. ८.. 
हे सद्गुरूंची कृपादृष्टि ,तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल तो  सर्व विघ्या रूप श्रुष्टी चा (उत्पन्नकर्ता ) ब्रह्म  देवाचं बनतो  .९. 
एवढ्या करिता हे आपल्या भक्तांचा कल्पतरू व श्रीमंत अशा आई तू मला हा ग्रंथ सांगण्याला आज्ञा दे . १०. . 


Tuesday, June 2, 2020

भरुनी सद्भावाची अंजुळी । मिया ओविया फुले मोकळी । अर्पिली अंघरी युगली विश्वरूपाचा  ।।७०८।।श्लोक ५५ अ ११

मी शुद्ध भावनारूप ओंवजळीत हि ओव्यारुपी मोकळी फुले भरून विश्व रूपाच्या दोन्ही पायावर अर्पण केले, (असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 

Monday, June 1, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन वामन दांडेकर 

निवडक ओव्या 

भुते हे भाष् विसरला । जे दिठी मीचि आहे बांधला । म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे  ।। ९८।।श्लोक ५५अ ११

तो भुते हि भाषा विसरला ; कारण त्याचा दृष्टीला माझ्या शिवाय दुसरा विषय नाही ; म्हणून तो निर्वैर झाला असता तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझी भक्ती करतो .



Saturday, May 30, 2020

किंबहुना अनंतें । धरिले धाकुटेपण मागुते । परी आश्वासिले पार्थातें । बिहालियासी ।।५४।। श्लोक ५० अ ११

फार काय सांगावे ! श्रीकृष्णाने पुन्हा मर्यादित सांगून रूप धारण केले , पण भ्यालेला अर्जुनाला धीर दिला . 

Friday, May 29, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेक
निवडक  ओव्या 

तैसे शिष्याचीये प्रीती जाहले ।   कृष्णत्व  होते ते   विश्वरूप  केले। ते मना नयेचि  मग । कृष्णपण मागुते ।।४५।।श्लोक ५०अ ११

 त्याप्रमाणे शिष्या च्या  प्रीती करता वरील दृष्टांत प्रमाणे गोष्ट घडली प्रथम श्रीकृष्णामूर्ती  होती त्याचे विश्वरूप केले , ते . अर्जुनाच्या मनाला  येईना , मग सांगून कृष्णारूप पुन्हा आणले . 

Thursday, May 28, 2020

मोडोनि भंगाराचाया  रवा । लेणे घडिले आपलिया सवा । मग नावडे जरी जीवा । तरीआटीजे पुडती ।।४४।।श्लोक५० अ ११

सोन्याची लगड मोडून त्याचा जसा  आपल्या इच्छेनुरुप दागिना करावा व मग तो दागिना जर आपल्या मनाला आवडला नाही , तर तो पुन्हा जसा आटवून टाकावा . 

Monday, May 25, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 
निवडक ओव्या ;

नाना गाय चरे डोंगरी ।परी चित्त बांधिले वत्से घरी ।तैसे प्रेम एथीचे करी । स्थानपती ।। ३५।।
अथवा गाय डोंगरात चरत असते , परंतु तिचे सर्व लक्ष्य घरी आपल्या वासरावर अडकून राहिलेले असते ,त्या प्रमाणे या (विश्वरूप)ठिकाणचे तू आपले प्रेम मालक कर. 

Saturday, May 23, 2020

हे रूप जरी घोर ।विकृति आणी थोर । तरी कृतनिष्चयाचे घर । हेचि करी ।।३२।। श्लोक ४९ अ ११

हे विश्व रूप जरी भयंकर  अक्राळविक्राळ आणि अवाढव्य असे आहे , तरी  (चतुर्भुज रूपापेक्षा ) हे विश्वरूप माझे खरे रूप असल्याकारणाने हेच खरे आहे ,असा तू पक्का निश्चय कर  . 

Friday, May 22, 2020

परी  नेणंसीच गावंढिया । काय कोपो आता धनंजया । अंग सांडोनि छाया । आलिंगितासी मा ।।२९।।श्लोक ४९ अ ११

परंतु हे अडाण्या तुला काही कळत नाही . अर्जुना आता तुझ्या वर काय राग वायचे आहे . प्रतक्ष्य अंग सोडून पडछायेला आलिंगन तू देतो आहेस नव्हे काय ?

Thursday, May 21, 2020

म्हणे जयजयाजी स्वामी//।नवल कृपा केली तूम्ही  ।/जे  हे विश्वरूप किआम्ही प्प्राकृत  देखो।५५।श्लोक १५ अ ११

अर्जुन म्हणाला हे प्रभु ,तूमचा जयजयकार असो . आम्ही सामान्य असूनही हे विश्वरूप पहान्यास समर्थ झालो हि  तुम्ही अद्भुतच कृपा केली . 

Monday, May 18, 2020

तुझे विश्वरूपपण आघवे/माझिये दिठिसी गोचर होआवें /ऐसी थोर आस जीवे / बांधोनि आहे // ८८]]श्लोक//३//अ ११

तूच या  विश्वात भरलाआहेस हे पूर्ण पणे  माझ्या  या डोळ्यांना  दिसावे ,अशी  मोठी  इच्छा  मी मनात बाळगून  राहिलो 

Sunday, May 17, 2020

ऐसे अगाध जे तुझे / विश्व्ररूप कानी  ऐकिजे / ते देखावंया चित्त माझे /उतावीळ देवा //८६//श्लोक ३//अ ११//

असे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप  कानांनी जे मी ऐकतो ,ते पाहण्याकरिता देवा,माझे चित्त  फारच उत्कंठित   झाले आहे .    

Saturday, May 16, 2020

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन दांडेकर
 निवडक ओव्या

उपनिषदे जे गाती / योगिये ह्रिदेयी  रिगोनी पाहती / जायते सनकादिक / आहाती पोटाळूनीया //८५// श्लोक ३ अ ११
उपनिषदे ज्यांचे वर्णन करतात , योगी लोको आपल्या ह्रद्यात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात ,ज्याला सनकादिक संत मिठी मारून राहिलेले आहेत

Friday, May 15, 2020

मागा जळत  काढिलो जोहरी / तैं ते देहासीस भय अवधारी /  जोहरवाहर दुसरी चैतन्य सकट //६०//श्लोक १ अ ११
ऐका मागे पूर्वी एकदा जेव्हा आम्ही अग्नित (लाक्षागृहात ) जाळण्याचा बेतात होतो ,तेव्हा तू आम्हाला बाहेरकाढलेस  काय  ते एक स्थूल देहासच  भय होते पण आता या   मोहःरुपी    दुसऱ्या अग्नीच्या पीडे पासून चैतन्यसकट  भय होते 

Wednesday, May 13, 2020

हे  सारस्वताच् गोड /  तुम्ही चि  लाविलेजी   झाड / तरी  आता अवधानामृते वाढ /सिम्पोनी कीजो //१९//
                                       
महाराज हे सारस्वताच्चे सुंदर झाड आंपणच  लावले आहे तर आता याकडे , आंपण लक्ष देणे हेच कोणी एक अमृत ते शिंपून मोठे करावे //१९//अ ११//



Sunday, October 20, 2019

म्हणौनि भलतेणे ऐथ सद्भावे नाहावे /प्रयाग माधव विश्वरूप पाहावे / येतुलेनी संसारासि ध्यावे  तिलोदक //१०//अ ११

म्हणून या त्रिवेणीसंगमात  हवे  त्याने आस्तिकबुद्धीने स्नान करून, जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात , तसे येथे विश्वरूप माधवा चे दर्शन घ्यावे , अशा रीतीने संसाराला तिलांजली ध्यावी