Sunday, July 21, 2019

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 
निवडक ओव्या : 
ऎसींनी जे निजज्ञानी  /  खेळत सुखे त्रिभुवनी /  जगद्रुपा मनी  / साठवूनि  माते //१७// अ १० श्लोक ८

अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले जे आत्मज्ञानी  ते आहेत ते,  मी जो जागद्रुप  त्या मला अंतःकरणात  साठवून   त्रैलोक्यात   अणे क्रीडा  व्यवहार करीत असतात .                                       





Friday, July 19, 2019

उदारीचा गर्भु जैसा / नेणे  मायेची वयसा / देवांसी मी तैसा / चोजवेना //६५// या १० श्लोक २

पोटात असलेल  मूल   ज्याप्रमाणे आईचे वय  जाणत नाही ,  देवांना  माझे ज्ञान  होत नाही . 

Sunday, July 14, 2019

तरी किरीटी तू माते / नेणसी  ना निरुते /  तरी  गा जो मी येथे /  ते विश्व ची हें //६३// अ १० श्लोक १

तरी अर्जुना तू  मला खरोखर जाणत नाहीस ना? (जर जाणत नसल्यास तर सांगतो ) येथे जो मी तुझ्या पुढे उभा आहे तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी म्हणजे हे विश्वच आहे . 

Friday, July 12, 2019

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 

ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या :

ऐके ऐके सुवर्मा / वाक्य माझे परम/ जे अक्षरे लेउनि परब्रह्म / तुज खेवासि  आले //६२// अ १० श्लोक १

तर ऐक मर्मज्ञ अर्जुना , आमचे श्रेष्ट् बोलणे ऐक हे आमचे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांचा अंगरखा घालून तुला आलिंगन देण्यास आले आहे . 

Wednesday, July 10, 2019

अहो अळुमाळ अवधान ध्यावें / येतुलेनी आनंदाचिया  राशीवरी  बैसावें / बाप श्रवणेंद्रिया  दैवें / घातली माळ //३४//अ ९ श्लोक ३४


अहो थोड कैसे  लक्ष  ध्यावे आणि एवढ्याने  आनंदाचा राशीवर बसावे , ध्यन आहे त्या कानाची कि आज त्यास भाग्याने माळ  घातली आहे . 

Monday, July 8, 2019

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 

ऐसा मिया  अथीला  होसी /तेथ माझियाची स्वरूप पावसी / हे अंत :करणीचे तुजपाशी / बोलीजत असें //१९//या श्लोक ३४

या प्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील , तेव्हा मद्रूपास पावशील ; हे माझ्या अंतःकरणातील (गुह्य गोष्ट ) तुझ्या जवळ मी सांगत आहे. 

Sunday, July 7, 2019

माझेनि अनुसंधाने देख  / संकल्पू  जाळणे नि;शेख / मध्यजी चोख / याचि   नांव //१८// अ ९ श्लोक ३४

पाहा  जो  माझ्या  वेधाने संकल्प पूर्णपणे जाळतो , त्यालाच  माझे चांगले भजन करणारा म्हणावे . 

Saturday, July 6, 2019


तूं  मन हे मीचि करीं / माझ्या भजनी प्रेम धरीं /    सर्वत्र  नमस्कारी मज एकाते // १७// अ ९ श्लोक ३४

तूं आपले मन मंद्रूप कर . माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर ; आणि सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे असे समजून मला एकाला नमस्कार कर . 

Friday, July 5, 2019

तरि  झड़झडोनि  वहिला  निघ / इये  भक्तीचीये  वाटे लाग / जिया पावशील  अव्यंग / निज धाम माझे //१६//अ ९ श्लोक ३३

तरी या मृत्यू लोकाच्या राहाटीतून झटकन मोकळा हो , आणि या भक्तीच्या मार्गाला लाग कि , त्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील . 

Wednesday, July 3, 2019

दर्दुरा  सापे  गिळिजतु आहे उभा/ कि तों मासिया वेटाळी जिभा / तैसे प्राणिये  कवणा लोभा / वाढविती  तृष्णा  //१४//

बेडूक सपाकडून उभा गिळला जात असतांना देखील, तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरिता जीभ बाहेर काढून वेताळीत असतो , तशाच तऱ्हेनं  प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवितात .कोण जाणे 

Monday, July 1, 2019

जन्मलिया दिवसादिवसें / हो लगे काळाचियाची ऐसे / कि वाढती करिती उल्हासें /  उभविती गुढिया //२//अ ९ श्लोक ३३

जन्मल्यापासून दिवसेंदिवस   मूल अधिकाधिक काळाच्या तावडीत  जाते . असेअसून (आई बाप  ) आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा करतात व आनंदप्रदर्शन गुढ्याही उभारतात. 
सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन दांडेकर 

जेथ चहूकडे जळत वणवा  / तेथुनि न निगिजे केवी पांडवा / तेवी लोकां येऊनिया सोपद्रवा / केवीं  न भजिजे माते //९२// अ ९ श्लोक ३३

अर्जुना , जेथे चोहोंकडून वणवा लागला आहे , तेथून बाहेर कसे पडू नये ? त्याप्रमाणे अनेक दुःखानी भरलेल्या  या मृत्यूलोकांत  येऊन , मला कसे भाजू नये बरे ?

Sunday, June 30, 2019

अजुनी पाऊलांची  मुद्रा / मी ह्रदयी वाहतेय गा सुभद्रा / जे आपुलिया दैवसमुद्रा / जतनेलागी //८१//९ श्लोक ३३

अर्जुना अजूनपर्यंत (त्या ) पावलांची खूण मी ह्र्दयाच्या ढिकाणी   वागवीत आहे, ती मी का वागवितो म्हणून म्हणशील , तर आपल्या षडगुण ऐश्वर्याभाग्यरूप समुद्राचे रक्षक होण्या करीता .

Thursday, June 27, 2019


सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 

मिया लक्ष्मी डावलोनी केली पारोती / फेडोनी कौस्तुभ  घेतला हाती /मग वोढविली वक्षस्थळांची वाखती / चरणरजा //४८०//अ ९ श्लोक ३३

मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली,  गळ्यांतील कौस्तुभ काढून हातात घेतला व मग ज्याचा पायधुळीकरितां छातीचा खळगा पुढे केला . 

Monday, June 24, 2019

तैसे क्षत्री  वैश्य स्त्रिया / का शूद्र अंत्यादि  इया /  जाति तवचि वेगळालिया/ जव   न पवति मातें //६०// अ ९ श्लोक ३२

त्या प्रमाणे क्षत्रिय वैश्य  शूद्र व अंत्यज आणि स्त्रिया , या जाति जेथपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झाले  नाही तेथपर्यंत  वेगवेगळ्या असतात.


Saturday, June 22, 2019

तेचि भलतेने भावे / मन मजआंतु येते होआवे  / आले तरी आघवे / मागील वावो //५७//अ ९ श्लोक ३२

तेच मन वाट्टेल त्या हेतूने का होईना , पण माझ्या स्वरूपात येईल असे करावे आणि एकदा माझ्या स्वरूपात आले तर मागील(जातिकूल)गोष्टी निष्फळ होतात. 

Thursday, June 20, 2019

पाहेपा  भक्तीचेनि आथिलेपणे / दैत्यी  देवा आणिले उणें / माझेरनार्सिहत्व  लेणे / जयाचिये  माहिमे //४५०//अ ९ श्लोक ३२

अर्जुना पहा  , भक्तीच्या संपन्नतेने राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला ज्या प्रल्हादाच्या भक्तिमाहात्म्यासाठी मला नार्सिहरूप अलंकार धारण करावा लागला


Monday, June 17, 2019

Sarth Dyaneshwari sampadak Shankar Vaman Dandekar

 ते पापयोनीही होतु कां / ते श्रुताधितही  न होतु कां / परि मजसी तुकिता / तुटी  नाही //४९//अ ९ श्लोक ३२

ते दुष्ट   देखील जन्माला आलेले असेनातं  का ? ते एकुन  व शिकून विद्धवान झ्हालेले नसेनात  का ; परुंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता , ते वजनात कमी भारत नाही 

Saturday, June 15, 2019

जयाचिये  वाचे माझे आलाप / द्रीष्टी भोगी माझे चि रूप / तयाचे मन संकल्प माझ चि  वाहे //६९//अ ९ श्लोक ३२

ज्यांचा वाणीत माझीच कथा आहे . ज्याचे डोळे माझंच रूप पाहण्यात गुंतले आहेत , ज्यांचे मन माझ्या विषयांचा विचार करीत राहते . //६९// अ ९ श्लोक ३२

Friday, June 14, 2019

माझीया भक्तिवीण / जळो ते जियालेपण / आगा पृथ्वीवरी पाषाण / नसती काई //३६//अ ९ श्लोक ३१

त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे आहे त्याला आग लागो.  अर्जुन, या पृथ्वीवर दगड नाहीत काय ?३६ अ ९ श्लोक ३१

Thursday, June 13, 2019

Gyaniyancha raja Guru maharaj guru


Sarth Dnyaneshwari sampadak Shankar Vaman Dandekar

जैसा दीपे  दीपू लाविजे / तेथ आदील कोण हे नोळखिजे / तैसा सर्वस्वे जो मज भजे / तो मी होऊनि ठाके //२८//अ (९) श्लोक ३१//

ज्या प्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता , त्यातील पहिला कोणता , हे ओळखता येत नाही ; त्या प्रमाणे जो सर्व भावांनी माझे  भजन करतो तो मंद्रूपच होऊन राहतो .//२८//अ (९) श्लोक ३१

Wednesday, June 12, 2019

सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर 

या देहचिया बंदोडी न पडिजे / सुखदुःखाचा सागरी न बुडिजे / सुखे सुखरूपा घडिजे / माझीयाची  अंगा //६//श्लोक २८  अ ९

(वर सांगितलेली युक्ती अमलात आणली असता )  देह रुपी बंदीखान्यात पडावे लागत नाही .  आणि सुखरूप जे माझं स्वरूप त्या होते त्याच्याशी  अनायासे एकक होते .