http://prajaktad.blogspot.com http://prajakta-dighe.blogspot.in http://kundha.blogspot.in http://prajaktadighe.wordpress.com
Sunday, January 15, 2012
Tuesday, December 27, 2011
Tuesday, October 4, 2011
Gayatri Mantra
<iframe width="420" height="315" src="http://www.youtube.com/embed/nDnamSM3Z3s" frameborder="0" allowfullscreen></iframe>
Sri Suktam by Anuradha Paudwal
<iframe width="420" height="315" src="https://www.youtube.com/embed/lYaccUhK2zg" frameborder="0" allowfullscreen></iframe>
Thursday, September 29, 2011
Thursday, September 22, 2011
Wednesday, September 21, 2011
श्री ज्ञानदेव वंदन
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत /
तो सत्काविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत //१//
स्मरण तयाचें होतां साचे चित्ती हर्ष न मावे /
म्हणुनी वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे //२//
Tuesday, September 20, 2011
Thursday, September 8, 2011
Monday, September 5, 2011
देखे अखंडित प्रसन्नता / आथी जेथ चित्ता / तेथ रिगणे नाही समस्तां / संसार दुःखां //३८//
जैसे अमृताचा निर्झरु / प्रसवे जायचा जठरु / तया क्षुधेतृशेचा अडदरु / काहीचि नाही //३९//
ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो त्याला तहान भूकेची भीती कधी नसते.
पाहा, जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते , तेथे कोणत्याही संसार -दुःख चा प्रवेश होत नाही .
जैसे अमृताचा निर्झरु / प्रसवे जायचा जठरु / तया क्षुधेतृशेचा अडदरु / काहीचि नाही //३९//
ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो त्याला तहान भूकेची भीती कधी नसते.
Friday, September 2, 2011
Monday, August 22, 2011
Friday, August 19, 2011
प्रज्ञाप्रभातसूर्या / सुखोदया //
![]() |
| ऊँ नमोजी आद्या / वेदप्रतिपाद्या / जय जय स्वसंवेद्या आत्मरुपा // |
नमन : अद्याय १४
जय जय आचार्या / समस्तसुरवार्या / प्रज्ञाप्रभातसूर्या / सुखोदया // १//
जय जय सर्वविसावया/ सोऽहंभावसुहावया / नाना लोक हेलावया / समुद्रा तू //२//
आईकें गा आर्तबंधू / निरंतरकरुण्यसिंधू / विशदविद्यावधू- वल्लभा जी //३//
Wednesday, July 13, 2011
सुखी संतोषा न यावे / दुखी विषादा न भजावे / आणि लाभालाभ न धरावे / मनामाजी //२२६//(२).
सुखाच्या वेळी संतोष माणू नये . दुखाच्या वेळी खिन्नता धरू नये आणि लाभ व हानी मनात धरू नये .(२२६) (२)
जैसे मार्गेचीचालतां / अपावो न पवे सर्वथा / कां दीपाधारें वर्ततां / नाडळिजे (2) //८७//
तयापरी पार्था / स्वधर्मे राहाटतां / सकळकामपूर्णता सहज होय //८८//
त्याप्रमाणे पार्था स्वधर्माने वागले असतां, सर्व इच्छा सहजच पुर्या होतातात //१८८//(२)
उपजे ते नाशे / नाशले पुनरपि दिसे / हे घटिकायं त्र तैसे / परिभ्रमे गा //१५९ (२)//
जे उत्पन्न होते ते नाश पावते व नाश पावलेले पुन्हा दिसते //१५९ (२)//
Saturday, July 9, 2011
Friday, July 1, 2011
Tuesday, June 28, 2011
Thursday, June 23, 2011
हे शब्देविण संवादिजे / इंद्रीये नेणता भोगिजे / बोलाआदी झोंबिजे / प्रमेयासी //५८ //ज्ञान ...१
हिची चर्चा शब्दावाचून करावी (मनातल्या मनात हिचा विचार करावा ) ,इंद्रीयाना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक धाब्दांच्या आगोदर त्यात सांगितलेय सिद्धांताचे आकलन करावे //५८//
जैसे भ्रमर परागु नेती / परी कमळ दळे नेणती / तैसे परी आहे सेविती / ग्रंथी इये // (५९)......(१)
कमळातील पराग भुंगे घेऊन जातात , परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते; या ग्रंथाचे सेवन करण्याची रीत तशी आहे.(५९)....(१)
Tuesday, June 21, 2011
जैसे शारदियेचे चंद्रकळे / माजी अमृतकण कोवळे / ते वेचिती मन मवाळें /चाकोरतलगे //ज्ञानेश्वरी१ (५६)
ज्या प्रमाणे शरदॠतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चाकोरांची पिले मृदु मानाने वेचतात ;
तियापरी श्रोतां / अनुभवावी हे कथा / अति हळुवारपणा चित्ता आणोणिया //ज्ञानेश्वरी १ (५७)
त्याप्रमाणे चित्त अगदी हळुवार करून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी //
A human being is a part of the whole called by us universe, a part limited in time and space. He experiences himself, his thoughts and feeling as something separated from the rest, a kind of optical delusion of his consciousness. This delusion is a kind of prison for us, restricting us to our personal desires and to affection for a few persons nearest to us. Our task must be to free ourselves from this prison by widening our circle of compassion to embrace all living creatures and the whole of nature in its beauty…….Albert Einstein
Monday, June 20, 2011
Thursday, April 21, 2011
करुणाष्टके
( श्री समर्थ रामदास स्वामी )
अनुदिन अनुतापे तपलो रामराया / परमदिनदयाळा! नीरसी मोहमाया /
अचपळ मन माझे नावरे आवरीतां / तुजवीण शीण होतो धावं रे धावं आतां //१//
भजनरहित रामा! सर्वही जन्म गेला / स्वजनजनधनाचा वेर्थ म्यां स्वार्थ केला /
रघुपति मति माझी आपुलीशी करावी / सकळ त्वजुनि भावें कास तुझी धरावी //२//
तनुमनधन माझे राघवा! रूप तुझे / तुजवीण मज वाटे सर्व संसार वोझे /
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी /अचल भजनलीळा लागली आस तूझी //३//
चपळपण मनाचे मोडीता मोडवेना / सकलस्वजनमाया तोडीता तोडवेना /
घडीघडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा / म्हणुनी करुणा हे बोलते दीनवाचा /४//
जळत हृदय माझें जन्म कोट्यानुकोटी / मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी /
जळत हृदय माझें जन्म कोट्यानुकोटी / मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी /
तळमळ निवविरे राम कारुण्यसिंधु/ षडरिपूकुळ माझें तोडि याचा समंधु //५//
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी /सिणत सिणत पोटी पाहिली वास तुझी
झडकरी झड घाली धांव पंचानना रे / तुजवीण मज नेती जम्बुकी वासना रे //६//
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे / रघुपतिविण आता चित कोठे न राहे /
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनी जाती / विषय सकळ नेती मागुता जन्म देती //७//
जय जय रघुवीर समर्थ !
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे / रघुपतिविण आता चित कोठे न राहे /
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनी जाती / विषय सकळ नेती मागुता जन्म देती //७//
उपरती मज रामी जाहली पूर्णकामी / सकळजनविरामी रामविश्रामधामी /
घडी घडी मन आता रामरूपी भरावे / रविकुळटिळका रे आपुलेसे करावे //८//जय जय रघुवीर समर्थ !
Monday, March 28, 2011
श्री ज्ञानेश्वरी गौरव......स्वामी स्वरूपानंद
श्री ज्ञानेश्वरी अमृत्गंगा /
बहुत सुकृते लाभली जगा /
पावन करी अंतरांगा /
अंगपअत्यंगा जीवाचिया //१//
भक्ती भावे करिता स्नान /
निर्मळ होये अंतकरण /
जिवासी परम समाधान /
साक्षात दर्शन शिवाचे //२//
जिवा- शीवा ची होता भेटी /
साक्षात दर्शन शिवाचे //२//
जिवा- शीवा ची होता भेटी /
मावळोनि ज्ञाता - ज्ञाएआदि त्रिपुटी /
प्रगटे सोहं- भाव प्रतीति / उरे शेवटी ज्ञाप्ती मात्रे //३//
Subscribe to:
Posts (Atom)

